वादग्रस्त माजी ट्रेनी आयपीएस अधिकारी पूजा खेडकर (Puja Khedkar) यांना अटकेपासून सध्या दिलासा मिळाला आहे. पण, 5 सप्टेंबर रोजी काय होणार? ही काळजी त्यांना नक्की भेडसावत असेल. स्वत:वरील आरोपांना उत्तर देण्यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्रक सादर केलं आहे. त्यामध्ये त्यांनी एक अजब दावा केला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पूजा खेडकरांचा अजब दावा
'मी दिव्यांग श्रेणीमध्ये दिलेल्या UPSC परीक्षांनाच योग्य मानावं,' असा दावा पूजानं केला आहे. पूजा खेडकर यांनी एकूण 12 वेळा ही परीक्षा दिली आहे. त्यापैकी फक्त दिव्यांग श्रेणीतून दिलेल्या परीक्षांनाच योग्य मानावं अशी याचिका पूजा यांनी केली आहे. त्याचबरोबर आपण नाव किंवा आडनाव बदललं नसल्याचा दावाही त्यांनी केलाय.
पूजाच्या प्रतिज्ञापत्रकात काय ?
- मी एकूण 12 वेळा परीक्षा दिली आहे.
- पाच वेळा दिव्यांग श्रेणीतून परीक्षा पास केली. त्यामुळे अन्य 7 प्रयत्नांचा विचार करण्यात येऊ नये.
- मला सर्व विभागांनी कायदेशीर प्रमाणपत्र दिलं आहे.
- नाव आणि आडनाव बदलेलं नाही. फक्त मिडल नेम बदललं आहे.
- मी नावामध्ये मोठा बदल केल्याचा आरोप खोटा आहे.
( नक्की वाचा : Puja Khedkar : 'मला अपात्र ठरवण्याचा UPSC ला अधिकार नाही,' पूजा खेडकरांचं कोर्टात उत्तर )
पूजावर काय आहेत आरोप?
पूजा खेडकर यांना अटकेपासून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकेवरील अंतरिम स्थगिती 5 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. पूजा खेडकर यांच्यावर फसवणूक आणि चुकीच्या पद्धतीनं ओबीसी आणि दिव्यांग कोट्याचा फायदा घेतल्याचा आरोप आहे. न्या. सुब्रमण्यम प्रसाद यांनी खेडकर यांच्या अंतरिम जामिनावरील याचिकेची सुनावणी 5 सप्टेंबरपर्यंत स्थगित केली आहे. त्या दरम्यान पोलिसांना ताज्या स्थितीचा अहवाल सादर करण्याचे स्वातंत्र्य त्यांनी दिलंय.
UPSC आणि दिल्ली पोलिसांनी पूजा खेडकर यांच्या जामीन अर्जावरील याचिका रद्द करण्याची मागणी केलीय. तर, पूजा यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. मला निलंबित करण्याचा अधिकार UPSC ला नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world