
Solapur Crime : सोलापुरातून एका दाम्पत्याचा कारनामा समोर आला आहे. हे पती-पत्नी एकत्रितपणे लोकांची लूट करीत होते. त्यांनी आतापर्यंत कोट्यवधींची फसवणूक केली आहे. गेल्या वर्षभरापासून ते दोघेही फरार होते. अखेर त्यांना तामिळनाडूतून अटक करण्यात आली आहे.
सोलापुरात भिशीच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्या पती-पत्नी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भिशीच्या माध्यमातून नागरिकांना कोटींची फसवणूक केल्याचं पती-पतिविरोधात तक्रार करण्यात आली. दोघेही गेल्या वर्षभरापासून फरार होते. आंध्रप्रदेश येथे गेल्या वर्षभरापासून लपून बसले होते. त्यांना 17 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. श्री ओम साई फायनान्सचा मालक रमेश अंबादास चिप्पा आणि पत्नी सुजाता रमेश चिप्पा यांनी 2020 ते 2024 दरम्यान भिशी चालवून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप आहे.
नक्की वाचा - Youtuber Arrest: रील्समध्ये काम, बलात्कार, ब्लॅकमेल... 43 लाख सबस्क्रायबर्स असलेल्या यूट्यूबर बाप-बेट्याचा अटक
श्री ओम साईनाथच्या माध्यमातून जवळपास 131 ठेवीदारांकडून दोन कोटी 69 लाख 19 हजार रुपयांची आमिष दाखवून ठेवी ठेवल्या होत्या. या पती-पत्नीने फायनान्समध्ये गुंतवणूक करून जास्तीत जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवलं होतं. मात्र त्यानंतर पैसे मिळत नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर शिवाजी लक्ष्मण पवार यांच्यासह 131 जणांनी जेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. याप्रकरणी जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world