
एका महिनेनं कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचललं आहे. त्यात तिचा मृत्यू झाला आहे. पण तिच्या एका कृतीने तिच्या दोन चिमुकल्यांनाही नाहक जीव गमवावा लागला आहे. अंगावर काटा आणणारी ही घटना जालना जिल्ह्यातील पिंपळगाव इथं घडली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्यामागचे कारण समोर आल्यानंतर सर्वांनीच डोक्याला हात लावला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सविता संतोष खरात ही विवाहीत महिला आपल्या कुटुंबासह सिद्धेश्वर पिंपळगाव या गावात राहात होती. तिला भावेश हा पाच वर्षाचा तर आबा हा तीन वर्षाचा मुलगा होता. पण गुरुवारी अचानक या महिलेने कुठलाही विचार न करता टोकाचं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. ती गावा जवळ उसलेल्या विहीरी जवळ गेली. त्यावेळी तिच्या बरोबर तिची दोन लहान लेकरं ही होती. त्यातील मोठा भावेश याला तिने विहीर फेकले. त्याच्या मागून तिने तीन वर्षाचा चिमुकला आबा यालाही विहीरीत फेकले.
त्या दोघांनाही विहीरीत टाकल्यानंतर सविता हिनेही विहीरीत उडी घेतली. काही वेळांनी विहीरीत काही तरी पडले असल्याचे गावकऱ्यांना जाणवले. त्यांनी पाहीले असता त्यांना मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. घनसावंगी पोलिस लगेचच गावात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी तक्रार नोंदवून याबाबत चौकशी सुरू केली. त्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सविता संतोष खरात ही कुटुंबा बरोबर गावात राहात होती. त्यावेळी तिचा किरकोळ कारणावरून घरात वाद झाला. त्याचा राग तिने मनात धरला होता. या रागातूनच तिने टोकाचे पाऊल उचलले. तिने स्वत: बरोबरच दोन चिमुकल्यांचे जीवनही संपवले. त्यामुळे दावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शिवाय संपूर्ण गाव या घटनेनं हादरून गेलं आहे. शिवाय तिच्या कुटुंबीयांना ही या घटनेनं मोठा धक्का बसला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world