
विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवारांनी जोर लावला होता. अनेक युक्त्या केल्या होत्या. सोशल मीडियाचाही वापर केला होता. जास्तीत जास्त मतदारांना आकर्षित करण्यासाठी त्यांचा प्रयत्न होता. पण काही उमेदवार असेही होते ज्यांनी अशा काही गोष्टी केल्या त्यामुळे ते आता अडचणीत आले आहे. त्या पैकीच एक होते जळगाव शहर मतदार संघातील अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम. त्यांनी मतदारांची सहानुभूती मिळावी यासाठी असं काही षडयंत्र रचलं ज्यामुळे सर्वच जण आवाक झाले आहेत. त्यांच्या या षडयंत्राचा आता पर्दाफाश झाला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
जळगाव शहर मतदार संघातून शेख अहमद शेख हुसेन गुलाम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. निवडणुकीत विजय मिळवता यावा. लोकांची सहनुभूती मिळावी यासाठी त्यांनी एक भयंकर डाव रचला होता हे आता समोर आले आहे. ते शहरातील मेहरून परिसरातील शेरा चौकात राहातात. मतदानाला दोन दिवस शिल्लक होते. त्यावेळी 18 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास त्यांच्या घराबर गोळीबार झाला होता.
ट्रेंडिंग बातमी - महाराष्ट्रात महायुतीचं सरकार, मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांनी घेतली शपथ
या घटनेनंतर संपुर्ण मतदार संघात एकच खळबळ उडाली होती. मात्र निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन यांनी हे षडयंत्र रचलं होतं. हे आता स्पष्ट झालं आहे. आपली मुलं, भाचा, यांच्यासह अन्य साथीदारांसह हे षडयंत्र रचण्यात आलं. त्यातून आपल्या स्वतःच्याच घरावर गोळीबार करून घेण्यात आला. या प्रकरणाचा तपास करत असताना ही धक्कादायक माहिती पोलीसांच्या हाती लागली आहे.
ट्रेंडिंग बातमी - 'देवेंद्रजी तुम्ही पुन्हा आला आहात...' शपथविधी आधी अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
या प्रकरणात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तीन संशयीताना अटक केली आहे. दोन संशयित आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. विशेष म्हणजे मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्याच घरावर गोळीबार करून घेणारे संशयीत अपक्ष उमेदवार शेख अहमद शेख हुसेन गुलाम हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. तर त्यांचा लहान मुलगा हा कायद्याचे एलएलबी शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world