राज्यात अंधश्रद्धा निर्मुलन कायदा अस्तित्वात आहे. असं असतानाही अनेक ठिकाणी जादूटोणा, करणी, काळीजादू या सारख्या गोष्टी सर्रास होताना दिसत आहेत. अजूनही अशा थोतांडावर विश्वास ठेवला जातो. त्याचा त्याचा फटका ही काहींना बसत आहे. अशीच एक घटना कोल्हापुरात घडली आहे. काळीजादू, अघोरी शक्तीपासून मुक्ती याचे अमिष दाखून इथे एका 70 वर्षाच्या वृद्धाला भोंदूबाबाच्या टोळीनं मोठा गंडा घातला आहे. ज्या पद्धतीने या वृद्धाला फसवण्यात आलं त्यावरून कायद्याचा धाक राहीला आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
सुभाष हरी कुलकर्णी हे 70 वर्षाचे आहेत. ते कोल्हापुरच्या दत्त गल्ली गंगावेश या परिसरात राहातात. त्यांची नणंद्रे येथे शेती आहे. मात्र या शेतीवरून वाद आहे. त्याचा खटला अनेक वर्षापासून कोर्टात सुरू आहे. दुसरीकडे त्यांच्या मुलाचेही लग्न जुळत नाही. त्यामुळे ते मानसिक तणावाखाली सतत वावरत होते. आपल्या बरोबरच हे का होत आहे? याचा विचार नेहमी त्यांच्या मनात येत होता. असा वेळी त्यांनी ही बाब आपल्या मावस भावाला सांगितली. त्याने यावर आपण काही तरी उपाय करू असे कुलकर्णी यांना सांगितली.
ट्रेंडिंग बातमी - मविआच्या 96-96-96 फॉर्म्यूल्या मागचे सत्य काय? पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले
मावस भावाने ही बाब शशिकांत गोळे या व्यक्तीला सांगितली. या शशिकांत गोळे बरोबर आणखी नऊ जण होते. या सर्वांनी मिळून तुमच्यावर अघोरी शक्तीने काळी जादू केली आहे. कोणी तरी करणी केली आहे. हा त्रास काढून टाकण्यासाठी पूजा, धार्मिक विधी करावा लागेल. ते केल्यास तुमच्या मागे लागलेपी पिडा नष्ट होईल असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या सांगण्यावर सुभाष कुलकर्णी यांनी विश्वास ठेवला. यातून आपली आता सुटका होईल असं त्यांना वाटलं. त्यानंतर सुरू झाला लुटीचा घटनाक्रम.
ट्रेंडिंग बातमी - विकृत कोण? विषय गाजणार? गुहागरमध्ये आजी-माजी आमदार भिडले
सुरूवातीला धार्मिक विधी आणि जागेचे शुद्धीकरण करायचे आहे असे त्यांना सांगण्यात आले. त्यासाठी त्यांनी तब्बल वेळोवेळी वेगवेगळ्या पुज्यांसाठी 54 लाखांची रोख रक्कम घेतली. ऐवढ्यावरच हे भामटे थांबले नाहीत. तर त्यांनी 59 तोळे सोने आणि चांदीचे दागिने ही त्यांच्याकडून घेतले. त्यात भर म्हणून सागवानी वस्तू ही त्यांच्याकडून घेतल्या. असे एकूण जवळपास 84 लाख 69 हजारांची फसवणूक केली. सोने,चांदीच्या वस्तू, बंदूक,जुने शिसम, सागवानी वस्तू, रोख रक्कम तर काही रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून खात्यात वर्ग करून घेतली होती.
ट्रेंडिंग बातमी - LIVE UPDATE: नवापूर तालुक्यात भूकंपाचे धक्के,नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
हा सर्व प्रकार 2023 ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीत सुरू होता. या सगळ्या गोष्टी करूनही काही बदल होत नव्हता. शिवाय या भामट्यांच्या मागण्या या वाढत होत्या. त्यामुळे कुठे तरी आपली फुसवणूक होत आहे असे कुलकर्णी यांना जाणवले. त्यांनी तातडीने या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात या नऊ जणां विरूद्ध गुन्हा दाखल केला. या आरोपींच्या शोधासाठी पथके बारामतीकडे रवाना केली आहेत. या प्रकरणी दादा पाटील,अण्णा उर्फ नित्यानंद नारायण नायक, सोनाली पाटील उर्फ धनश्री गणपत काळभोर, शशिकांत नीळकंठ गोळे, पुंडलिक झगडे (रा. जेजुरी), तृप्ती मुळीक यांच्यासह अन्य तिघे अशा एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world