वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर ( IAS officer Pooja Khedkar's mother Manorama Khedkar) यांना महाडमधील हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. त्या हॉटेलमध्ये लपून बसल्या होत्या. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन त्यांना घेऊन पुणे ग्रामीण पोलीस पुण्याला रवाना झाले आहेत. मंत्र्याला लाच दिल्याप्रकरणी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची एसीबीकडून चौकशी सुरू आहे. दुसरीकडे आता पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातील एका शेतकऱ्याला पिस्तुल दाखवून धमकावल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. हा व्हिडिओ जुना होता. त्यानंतर मुळशी तालुक्यातील पौंड येथील पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज पहाटे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
नक्की वाचा - ACB कडून मोठी कारवाई; मंत्र्याला लाच दिल्या प्रकरणी पूजा खेडकरांच्या वडिलांच्या अडचणी वाढल्या!
का केली अटक ?
पंढरीनाथ कोंडीबा पासलकर (वय 65) या शेतकऱ्याने मनोरमा खेडकर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. 4 जून 2023 रोजी दुपारी 1 वाजता पुण्यातील धडवली येथील जागा प्रकरणावरून मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला पिस्तुल दाखवित धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला होता. यावेळी त्यांच्यासोबत काही बाउन्सरदेखील होते. मारहाण, शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी, दमदाटी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world