रेवती हिंगवे, पुणे:
Pune Crime: राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वारंवार उघडकीस येत असतानाच पुण्यामधून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यामध्ये एका महिलेने गुंगीचे औषध पाजून तरुणावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
महिलेचा पुरुषावर अत्याचार...
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यामध्ये एका वकील महिलेने तरुणावर अत्याचार केल्याचा आणि त्याचे अश्लील फोटो काढून त्याला ब्लॅकमेल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तरुणावर अत्याचार करुन त्याचे अश्लील फोटो काढत पैशांची मागणीही करण्यात आली. गौरी वांजळे असं या महिलेचे नाव असून कोथरुड पोलिसांनी तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
VIDEO: काँग्रेस नेत्याला कारमध्ये कोंबलं, किडनॅप करुन बेदम मारलं; CCTV फुटेजने राज्यात खळबळ!
पीडित तरुणाच्या फिर्यादीनुसार, आरोपी महिला गौरी वांजळे ही 'वकील' असल्याची बतावणी करून फिर्यादी पुरुषाला सतत धमकी देत होती. या महिलेने फिर्यादीला गुंगीचे औषध देऊन त्याच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला, तसेच त्याचे काही अश्लील फोटो काढले. याच फोटोंच्या आधारावर ती फिर्यादीकडे मोठ्या रकमेची मागणी करत होती. पैशांची मागणी पूर्ण न केल्यास 'खोट्या केसमध्ये अडकवण्याची' धमकीही ती देत होती.
अश्लील फोटो अन् ब्लॅकमेलिंग...
गुन्हा दाखल केलेल्या फिर्यादी पुरुषाचा कोल्हापूरचा रहिवासी असून, आरोपी महिला पुण्यात राहते. आरोपी महिलेने तिच्या पुणे येथील राहत्या घरी तसेच तर कोल्हापूर येथील फिर्यादीच्या घरी जाऊनही त्याच्यावर बळजबरीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक बाब म्हणजे तिने फिर्यादीला बळजबरीने वाराणसी (काशी विश्वनाथ) या धार्मिक स्थळीही नेले आणि तिथेही त्याच्यावर अत्याचार केला.
महिलेने या तरुणाचे अश्लील फोटो काढले, हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिने त्याच्याकडे पैशाची मागणी केल्याचंही फिर्यादीने म्हटलं आहे. पोलिसांनी आरोपी महिला गौरी वांजळे हिच्यावर कलम विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, महिलेने पुरुषावर केलेल्या या अत्याचाराच्या बातमीने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world