जाहिरात

Pune News: पुणे हादरले! पीजीत राहणाऱ्या मद्यधुंद तरुणीवर मालकाची घाणेरडी नजर, पुढे घडला अतिशय संतापजनक प्रकार

Pune News: तुम्ही महिला आहात? पुणे शहरात पीजीमध्ये राहताय? मग वेळीच व्हा सावध, अन्यथा...

Pune News: पुणे हादरले! पीजीत राहणाऱ्या मद्यधुंद तरुणीवर मालकाची घाणेरडी नजर, पुढे घडला अतिशय संतापजनक प्रकार
"Pune News: पुणे शहरात पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत भयंकर घडलं"
Canva

Pune News: पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललाय. पुण्यात पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत अतिशय संतापजनक प्रकार घडलाय. पुण्यात पीजीत राहणाऱ्या तरुणीचा मालकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

पुण्यात नेमके काय घडलं? | Pune Crime News In Marathi

पीडित तरुणी मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करण्यासाठी गेली होती. दारू जास्त प्यायल्याने तिला चालताही येत नव्हतं. म्हणून मित्रमैत्रिणींनी तिला पीजीच्या गेटपर्यंत आणून सोडले. तरुणी नशेत असल्याचे मालकाने पाहिले आणि मदत करण्याच्या बहाण्याने गैरफायदा घेतला. घरमालकाने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप पीडित तरुणीने केलाय. 12 डिसेंबर रोजी बालाजीनगर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय. या प्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

(नक्की वाचा: Pune News: येरवडा कारागृहात राडा, एका कैद्याचा मृत्यू, जेलच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर)

पीजी मालकाविरोधात गुन्हा दाखल 

तक्रारीनुसार पोलिसांनी तिरुमला उर्फ रघूराम तिरुम लाय्या कोथाविरोधात गुन्हा दाखल केलाय. पीडित तरुणी पुण्यात एका खासगी कंपनीमध्ये जॉब करते. 12 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास तिच्यासोबत ही भयंकर घटना घडली. जास्त प्रमाणात दारू प्यायलेली असल्याने तरुणीला चालणं कठीण झालं होतं. म्हणून मित्रांनी तिला राहत्या ठिकाणी सोडलं. काही वेळ ही तरुण पायऱ्यांवर बसून राहिली. तरुणी रुमच्या दिशेनं जात असताना घरमालकाने परिस्थितीचा फायदा घेत तिला जबरदस्तीने मिठी मारत तिच्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप तिनं केलाय.

(नक्की वाचा: Pune News: निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात खळबळ! AI च्या मदतीने गांजाची शेती, MBA इंजिनिअर आरोपींना अटक, Video)

महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

दरम्यान या घटनेमुळे पुण्यासारख्या शहरांमध्ये कामानिमित्त कुटुंबापासून दूर राहणाऱ्या नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित होतोय. पीजी मालक आणि वसतिगृह चालकांनी महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस पावलं उचलणं आवश्यक असताना घरमालकांचेच वर्तन धोकादायक असल्याचे उदाहरण समोर आलंय. पोलीस अधिकाऱ्यांनीही पीजीमध्ये राहणाऱ्या महिलांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केलंय. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com