जाहिरात

Shocking news: 'माझ्या आईला फाशी द्या!, 10 वर्षांच्या चिमुकलीचा टाहो, त्या मागचं कारण ऐकून व्हाल सुन्न

राहुल असं तिच्या पतीचे नाव होते. तो 35 वर्षांचा होता. जवळपास पंधरा वर्षा पूर्वी या दोघांचे लग्न झाले होते.

Shocking news: 'माझ्या आईला फाशी द्या!, 10 वर्षांच्या चिमुकलीचा टाहो, त्या मागचं कारण ऐकून व्हाल सुन्न
  • उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील चंदौसी परिसरात रुबी नावाच्या महिलेनं पती राहुलची क्रूर हत्या केली आहे
  • राहुलचा मृतदेह ओळखता येऊ नये म्हणून रुबी आणि तिच्या प्रियकराने तो ग्राइंडरमध्ये तुकडे तुकडे केला
  • राहुलच्या मृत्यूचा तपास करताना पोलिसांना घरातून रक्ताचे डाग आणि हत्या करण्यासाठी वापरलेले साहित्य सापडले
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

विवाहबाह्य संबंधामुळे काही क्रुर हत्या झाल्याची अनेक उदाहरणं समोर आली होती. त्या पेक्षा ही भयंकर काड आता परत एकदा समोर आला आहे. ही घटना ऐकून तुमच्या तळ पायाची आग मस्तकात गेल्या शिवाय राहाणार नाही. उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील चंदौसी परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेने आपल्या पतीची हत्या केली आहे. ही हत्या इतक्या क्रुरपणे केली आहे की ते पाहून तुमच्या अंगाचा थरकाप उडाल्या शिवाय राहणार नाही. हे प्रकरण समोर आल्यानंतर सर्वच जण हादरून गेले आहेत. पण या हत्येमुळे पोरक्या झालेल्या दोन जीवांचे मात्र हाल होणार आहे. 

रूबी नावाची एक महिला आपल्या पती सोबत या गावात राहात होती. राहुल असं तिच्या पतीचे नाव होते. तो 35 वर्षांचा होता. जवळपास पंधरा वर्षा पूर्वी या दोघांचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा 12 वर्षांचा आहे. तर लहान मुलगी  10 वर्षांची आहे. या रुबीचं अभिषेक नावाच्या मुलासोबत संबंध होते. तो नेहमी रुबीला भेटण्यासाठी घरात कोणी नसताना येत होता. या प्रेम संबंधामध्ये पती राहुल आडवा येत होता. त्यामुळे या दोघांनी त्याचा काटा काढण्याचा ठरवला. त्यानुसार घरात कुणी नसताना या राहुलचा खून करण्यात आला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी ग्राइंडरचा वापर करण्यात आला. 

नक्की वाचा - Satara news: अभिजीत बिचुकले हरले पण मतं मिळवण्याचे जुने रेकॉर्ड मोडले! नगराध्यक्षपदासाठी किती मतं मिळाली?

त्याचा मृतदेह ओळखता येवू नये यासाठी रुबी आणि अभिषेकने राहुलच्या मृतदेहाचे तुकडे तुकडे केले. त्यानंतर ते ग्राइंडरमध्ये टाकण्यात आले. त्यानंतर हे सर्व तुकडे एका पोत्यात भरण्यात आले आणि लांब नाल्यात फेकण्यात आले. 18 नोव्हेंबरला  हा कांड झाला. राहुल १८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. २४ नोव्हेंबर रोजी रूबीनेच तो बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. मात्र, 15 डिसेंबर रोजी ईदगाह जवळील एका नाल्यात मानवी मृतदेहाचे अवशेष सापडल्याने या प्रकरणाला वाचा फुटली. पोलीसांनी आपली सुत्र फिरवली. एकएक धागा जोडला गेला. 

नक्की वाचा - Kalyan News: आधी एकमेकांना फुटेपर्यंत मारले, मग गळ्यात गळे घातले!, ठाकरे गटात तुफान राडा

हातावर गोंदलेल्या नावावरून राहुलची ओळख पटली. तपासात समोर आले की, रूबीने तिच्या प्रियकरासोबत मिळून राहुलचा गळा आवळून खून केला आहे. शिवाय पुरावे नष्ट करण्यासाठी इलेक्ट्रिक ग्राइंडरने मृतदेहाचे तुकडे केले.या प्रकरणात राहुलच्या 10 वर्षांच्या मुलीने दिलेली साक्ष अत्यंत महत्त्वाची ठरली. आईच्या वागणुकीबद्दल आणि घरात येणाऱ्या संशयास्पद व्यक्तींबद्दल तिने पोलिसांना माहिती दिली. आरोपी पत्नी रूबी हिने पती बेपत्ता झाल्याचे नाटक रचले होते. मात्र, पोलिसांनी जेव्हा घराची झडती घेतली, तेव्हा तिथे रक्ताचे डाग आणि हत्येसाठी वापरलेले साहित्य सापडले. 

नक्की वाचा - BJP News: मालवणमध्ये हार, चव्हाणांचा नारायण राणेंवर 'प्रहार'!, पराभवानंतर रविंद्र चव्हाणांनी राणेंना सुनावलं

या वेळी राहुलच्या मुलीची ही साक्ष नोंदवण्यात आली. तिने चौकशीत  सांगितले की, अभिषेक नावाचा व्यक्ती घरात यायचा. ते आम्हाला आवडत नव्हते. तरही तो येत होता. त्याच्या सोबत आणखी एक व्यक्ती नेहमी येत होता. त्याच वेळी त्याने "काही दिवसात तुझ्या बाबांना रस्त्यातून हटवू," असे म्हणले होते. तो आम्हाला चॉकलेटचे आमिष दाखवून तोंड बंद ठेवण्याचा प्रयत्न करत होता. आईनेच आपल्या वडिलांना संपवल्याचे समजताच मुलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्या मुलीने बाबांना मारणाऱ्या आपल्या आईला फाशी द्या शिवाय तिच्या सोबत असलेल्या लोकांनाही शिक्षा द्या अशी मागणी केली. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com