जाहिरात

इंस्टावर स्टोरी का बघतोस? आधी दमबाजी मग कोयत्याने वार, नक्की काय घडलं?

काही महिन्यापूर्वी मिरजेत कोयता गँगची दहशत बघायला मिळाली होती. तर आता किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर कोयता आणि चाकूनेच वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.

इंस्टावर स्टोरी का बघतोस? आधी दमबाजी मग कोयत्याने वार, नक्की काय घडलं?
सांगली:

इन्स्टाग्रामवर स्टोरी का बघतोस म्हणून एका युवकावर कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आला आहे. सांगलीच्या मिरजमध्ये ही घटना घडली आहे. कोयत्याचे हल्ले करण्याच्या घटना मिरजमध्ये पुन्हा एकदा झाली आहे. किरकोळ कारणावरुनही थेट कोयत्याने हल्ले होत आहेत. इन्स्टाग्रामवर स्टोरी का बघतोस या शिल्लक कारणा वरून एका युवकावर चक्क कोयता आणि चाकूने हल्ला करण्यात आल्याने मिरज हादरून गेलं आहे. धीरेन उर्फ यश रवी पालेकर वय 21 रा मिरज, असं गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धीरेनवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या दोन संशयित आरोपी राजकुमार माने, वय 23  आणि सरफराज सय्यद वय 34 यांच्या विरोधात मिरज शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे आरोपी हे मिरज इथेच राहाणार आहेत. या घटनेमुळे मिरजेत खळबळ माजली आहे. काही महिन्यापूर्वी मिरजेत कोयता गँगची दहशत बघायला मिळाली होती. तर आता किरकोळ कारणावरून दोन युवकांनी एकावर कोयता आणि चाकूनेच वार करून त्याला गंभीर जखमी केले आहे.

ट्रेंडिंग बातमी - बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!

मिरज शहरात सध्या गुन्हेगारीचा प्रमाण वाढले आहे. अल्पवयीन मुलांसह 26 वर्षाच्या आसपास वयोगटातील युवक मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीकडे वळल्याचे चित्र आहे. युवक व्यसनाधीनतेने ग्रासले आहेत. कायद्यातील पळवाटामुळे आणि ठोस उपाययोजना होत नसल्यामुळे व योग्य वेळी कारवाई होत नसल्याने गुन्हेगार शेपारले आहेत अशीच स्थिती झाल्याचे मिरजची जनता म्हणत आहे. 

ट्रेंडिंग बातमी - सिडकोची लॉटरी, स्वप्नातल्या घराच्या किंमती कितीने वाढल्या?

शहरात पोलीसांचा धाक आहे का नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.  मिरज शहरातील स्टेशन आणि स्टॅन्ड परिसरात बहुतांश झोपडपट्टी भाग आहे. त्याचबरोबर शहरातल इंदिरानगर परिसरात अशा घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मिरज एसटी स्टँड आणि मिरज रेल्वे जंक्शन परिसरात हल्ले करून लुटमारीचे प्रकार वाढले आहे. तर  नशा करून लुटण्याचे प्रमाणही आहे. त्यांच्यावर कारवाई केली तरी अशा घटना आजही होत आहेत. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
बदलापूर पुन्हा हादरलं! चिमुरडी पुन्हा एकदा ठरली बळी, सख्ख्या नात्याने गाठली क्रौर्याची परिसीमा!
इंस्टावर स्टोरी का बघतोस? आधी दमबाजी मग कोयत्याने वार, नक्की काय घडलं?
thane-couple-sold-their-5-day-old-son-for-rs-1-lakh
Next Article
बदलापुरात काय चाललंय? आई-वडिलांनीच केली 5 दिवसांच्या मुलाची विक्री!