सध्याच्या डिजिटल युगात स्कॅमर्स लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी नव्या -नव्या युक्ती शोधत आहेत. कधी लकी व्हॉट्सअप नंबर सांगून स्क्रॅच कार्डचं आमिष दाखवलं जातं. त्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जाते. या फसवणुकीचा एक धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात बेरोजगार तरुणाला व्हॉट्सअपवर नोकरी मिळाल्याचा मेसेज पाठवून त्याची फसवणूक करण्यात आली आहेत. त्याच्या घरी तब्बल 250 कोटींचं बिल आल्यानंतर त्याला या सर्व प्रकरणाची माहिती मिळाली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
काय आहे प्रकरण?
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये हा प्रकार घडलाय. या जिल्ह्यातली बडसू गावचा अश्वनी कुमार बऱ्याच काळापासून नोकरीच्या शोधात होता. काही दिवसांपूर्वी त्याला व्हॉट्सअपवर नोकरी मिळाल्याचा मेसेज आला. नोकरी मिळेल या आशेनं अश्वनीनं मेसेजमध्ये मागितलेली सर्व माहिती त्यांना दिली. त्याचबरोबर त्यांनी मागितलेली सर्व कागदपत्रंही स्कॅन करुन आणि PDF फॉर्मेटमध्ये पाठवली.
अश्वनी कुमारनं दिलेल्या माहितीनुसार व्हॉट्सअप मेसेजमधून त्याला नोकरीच्या रजिस्ट्रेशनसाठी 1750 रुपये मांगण्यात आली होती. ती रक्कमही त्यांनी पेटीएम केली. अश्वनीला नोकरी तर मिळालीच नाही. पण, त्याच्या नावानं एक बोगस कंपनी आणि बोगस अकाऊंट उघडण्यात आलं. स्कॅमर्सनी बोगस कंपनी आणि बँक अकाऊंटच्या माध्यमातून जवळपास 250 कोटी रुपयांच्या GST चे ई वे बिलिंग फ्रॉड केले. त्यामुळे अश्वनीला 250 कोटींची घरी नोटीस आली.
बेरोजगार को मिला 257 करोड़ का GST बिल😳
— NDTV India (@ndtvindia) September 3, 2024
UP: मुजफ्फरनगर में एक बेरोजगार युवक के पैरों तले उस समय ज़मीन निकल गई जब उसके घर का दरवाजा GST विभाग के कर्मचारियों ने खटखटाकर उसे बताया कि तुम्हारे नाम से एक कंपनी चल रही है जिसमें तकरीबन 250 करोड़ की GST ई वे बिलिंग का लेनदेन किया गया… pic.twitter.com/709lTA3Iuk
'माझ्या नावावर कुणीतरी कंपनी बनवली आणि इतका मोठा घोटाळा झाला आहे, हे मला GST विभागाकडून आलेल्या नोटिशीनंतर समजलं. GST विभागानं मला बोलवून याबाबत कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. मी या प्रकरणाची पोलिसांमध्ये तक्रार केली आहे,' असं अश्वनीनं सांगितलं.
( नक्की वाचा : 12 वेळा UPSC परीक्षा दिली, पण 7 परीक्षांचा विचार करुन नका, पूजा खेडकरचा अजब युक्तीवाद )
पोलिसांनी काय सांगितलं?
पोलीस अधिक्षक आदित्य बंसल यांनी याबाबत सांगितलं की, 'कोणत्याही व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये ही रक्कम आलेली नाही. अश्वनी कुमारला नोकरीचं आमिष दाखवण्यात आलं होतं. त्यानंतर स्कॅमर्सनं व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्याच्याकडून कागदपत्रं घेतली. त्या कागदपत्रावर बोगस कंपनी बनवली आणि बोगस बँक अकाऊंट उघडले. हा जवळपास 250 कोटींचा घोटाळा आहे. GST विभागाशी कॉर्डिनेशन केलं जात आहे.'
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world