जाहिरात

'बटेंगे तो कटेंगे, आमच्याकडे चालत नाही ते...' अजित पवारांनी कुणाला सुनावलं?

बटेंगे तो कटेंगे हे आमच्याकडे चालत नाहीत. ते तिकड नॉर्थकडे चालतं असा दमच अजित पवारांनी भरला आहे.

'बटेंगे तो कटेंगे, आमच्याकडे चालत नाही ते...' अजित पवारांनी कुणाला सुनावलं?
पुणे:

बटेंगे तो कटेंगे वरून महायुतीत चांगलच घमासान सुरू आहे. या घोषणेला अजित पवारांनी विरोध केला आहे. या घोषणेमुळे अजित पवारांनाच फटका बसू शकतो. हे लक्षात आल्यानंतर अजित पवार आता यावर खुले पणाने बोलू लागले आहेत. जुन्नर इथे झालेल्या प्रचास सभेत त्यांनी यावर आपली स्पष्ट भूमिका मांडली. अल्पसंख्याकांनी घाबरू नये. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. बटेंगे तो कटेंगे हे आमच्याकडे चालत नाहीत. ते तिकडे नॉर्थकडे चालतं असा दमच त्यांनी भरला. त्यांचा रोख उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे होता. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, शाहू,फुले आंबेडकरांचा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा या राज्याला मिळाला आहे. सर्वांना सोबत घेवून जाणारा महाराष्ट्र आहे. पण काही लोक बाहेरून येतात. महाराष्ट्रात काही वक्तव्य करतात. त्यांना एकच सांगायचं आहे. कटेंगे तो बटेंगे वैगरे महाराष्ट्रात चालत नाही. ते सर्व नॉर्थला चालत असेल आमच्याकडे चालत नाही. अशा शब्दात त्यांनी योगी आदित्यनाथ यांचे नाव न घेता त्यांना सुनावले. आम्ही सर्वधर्म समभाव विचारांचे आहोत. एकमेकाबाबत आकस दरी निर्माण करून काही मिळणार नाही. जे देश राज्य गुण्यागोविंदाने राहातात त्यांचाच विकास होतो. ती राज्य पुढे जातात असंही ते म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - भन्नाट हिंदी , सॉलिड कविता! प्रियांका गांधींची सभा घोगरे काकींनी गाजवली

अल्पसंख्यांक समाजाने मनात कोणतीही भिती ठेवू नयेत. कुठल्या ही समाजाला धक्का लागणार नाही ही माझी जबाबदारी आहे असे अजित पवार म्हणाले. कोणाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही असंही ते म्हणाले. पण रात्रीत फतवा आला आणि सगळं गेले असं होवू देवू नका. आम्ही काम करतो. भेदभाव करत नाही. तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. तुम्ही तुमचं काम करा. बाकी माझ्यावर सोडा. असं त्यांनी उपस्थित अल्पसंख्याक समाजाला सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - 'नरेंद्र मोदींची मेमरी लॉस' राहुल गांधींचा हल्लाबोल

ठाकरेंच्या सरकारमध्ये होतो. पण त्यावेळी कोरोना आला. कोरोना काळातही काम केलं. मधली एक वर्ष विरोधी पक्षात होतो. त्यावेळी मतदार संघातील कामं थांबली होती. त्यामुळे सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व कामं मार्गी लागली असं अजित पवार म्हणाले. लोकसभेत आम्हाला दणका बसलाय. असं वाटलं नव्हतं आम्हाला फटका बसेल. आघाडी आणि महायुतीत मतांचा जास्त फरक नव्हात.  पण शेतकरी नाराज होता. कांद्याला भाव नव्हता. निवडणुकीनंतर सर्वात आधी जर कोणतं काम केलं असेल तर ते कांद्यावरची निर्यात बंदी उठवली. आता कांद्याला भाव मिळत आहे असे अजित पवार म्हणाले. 

ट्रेंडिंग बातमी - बीडमध्ये राडा! 'वंचित'च्या उमेदवाराला पक्षातील नेत्यांनीच काळं फासलं, चाबकाने फोडलं; कारण काय?

त्यानंतर काही योजना आणण्याचा निर्णय घेतला. त्यातून लाडकी बहीण योजना आणली. शेतकऱ्याचे वीजबील माफ केले. असंही अजित पवार म्हणाले. आतापर्यंत दहा वेळा अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यामुळे सर्व काही विरोधकांनाच समजतं असं नाही. मी काय गोट्या खेळायला बसलो नाही असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जास्तीत जास्त उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन यावेळी अजित पवारांनी केले.