विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. महायुतीला मोठं बहुमतही मिळालं. निकाल लागून चार दिवस झाले आहेत. तरही महायुतीला आपला मुख्यमंत्री ठरवता आला नाही. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात सध्या मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच सुरू आहे. अशात आता एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आलेल्या शिवसेनेच्या सर्व आमदारांना आपल्या मतदार संघात जाण्याचे आदेश दिले आहेत. अचानक दिलेल्या या आदेशमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहे. कधीही शपथविधी होवू शकतो असं सांगितलं जात असताना, आमदारांना मुंबई सोडण्याचे आदेशा का देण्यात आले याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र त्यामागचे कारण आता समोर आले आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
शिवसेना शिंदे गटाने विधानसभेच्या 57 जागा जिंकल्या आहेत. तर चार अपक्षांनी शिंदेंना पाठिंबा दिला आहे. अशा 61 आमदारांचा शिंदेंकडे पाठिंबा आहे. तर भाजप 132 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचाच व्हावा अशी भाजप श्रेष्ठींची इच्छा आहे. पण निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वात झाली होती. त्यामुळे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेचं व्हावेत अशी भूमीका शिवसेनेची आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाबाबतचा पेच फसला आहे. निवडणुकीनंतर निवडून आलेल्या सर्व आमदारांना तातडीने मुंबईत बोलावण्यात आलं होतं.
ट्रेंडिंग बातमी - ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार? पराभूत उमेदवारांच्या बैठकीत काय घडलं?
या आमदारांनी पक्षाचा नेताही निवडला. शिवसेना विधीमंडळ पक्ष नेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. त्यानंतर शपथविधी होईल असं बोललं जात होतं. त्यामुळे आमदारांना मुंबईत राहाण्याच्या सुचना करण्यात आल्या होत्या. पण कोणताही तोडगा निघाला नाही. शेवटी या आमदारांना त्यांच्या मतदार संघात जाण्याच्या सुचना एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. शिंदेंनी असा निर्णय का घेतला याची चर्चा आता सुरू झाली आहे. सगळ्या आमदारांना गटनिदान निवडीसाठी मुंबईत बोलवण्यात आलं होतं असं अर्जुन खोतकर यांनी सांगितलं.
ट्रेंडिंग बातमी - राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मविआच्या मोठ्या नेत्याकडून प्रयत्न सुरू
आमदारा आल्यानंतर गटनेता निवडला गेला. गटनेता निवडण्याचं काम आत संपलं आहे. पुढचे सगळे अधिकार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहेत. निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी आमदार मुंबईत दाखल झाले होते. त्यामुळे मतदारसंघातल्या लोकांना देखील भेटायचं आहे. त्यासाठी मतदार संघात गेलं पाहीजे अशी मागणी आमदारांनी केली. त्यामुळे त्यांना मतदार संघात परत जाण्यासाठी परवानगी देण्यात आल्याचे खोतकर यांनी सांगितलं. शिवाय आमच्या पक्षाचा नेता हा मुख्यमंत्री व्हावा असं वाटणं स्वाभाविक आहे असंही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - विरोधकांकडून EVM घोटाळ्याचा आरोप, 'या' मतदारसंघात फेरमतमोजणीचे संकेत
निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला मोठ यश मिळालं असे ही ते म्हणाले. अशावेळी मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय तिन्ही नेते मिळून घेतील. अजित पवारांना उद्या जर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असेल तर पाठिंबा देणार का असे विचारल्यास ते हो म्हणतील असंही खोतकर म्हणाले. महायुतीत कोणतीही नाराजी नाही. जो निर्णय सर्व मिळून घेतील तो आम्हाला मान्य असेल असंही ते म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world