जाहिरात

विरोधकांकडून EVM घोटाळ्याचा आरोप, 'या' मतदारसंघात फेरमतमोजणीचे संकेत

विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर सवाल उपस्थित केले जात आहे.

विरोधकांकडून EVM घोटाळ्याचा आरोप, 'या' मतदारसंघात फेरमतमोजणीचे संकेत
नाशिक:

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. यावेळी महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. महायुती 230 जागांवर तर महाविकास आघाडीला 46 जागा जिंकता आल्या आहेत. यानंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर सवाल उपस्थित केले जात आहे. त्याशिवाय मनसेच्या काही उमेदवारांनीही याबाबत सवाल केले आहेत. 

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मविआच्या मोठ्या नेत्याकडून प्रयत्न सुरू

नक्की वाचा - राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार? मविआच्या मोठ्या नेत्याकडून प्रयत्न सुरू

दरम्यान नाशिकमधून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नाशिक पश्चिम मतदारसंघात फेर मतमोजणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंबंधित पत्र पाठवले आहे. पश्चिम मधील 413 केंद्रांपैकी  20 मतदान केंद्रांची तपासणी करण्यात येणार आहे. 

सुधाकर बडगुजर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फेरमतमोजणीसाठी अर्ज केला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार बडगुजर यांना  पाच टक्के मतदान केंद्रावरील मतमोजणी करता येणार असल्याचं सांगितलं. यासाठी बडगुजर यांना प्रति युनिट 40 हजार आणि पाच टक्के जीएसटी रक्कम लेखा विभागात भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे नाशिक पश्चिममधील पाच टक्के मतदान केंद्रांची फेर मतमोजणी होणं निश्चित झालं आहे. 

अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं

नक्की वाचा -​​​​​​​ अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांना पसंती का आहे? 3 कारणं

नाशिक पश्चिम मतदारसंघातील लढत...
नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे यांचा 1,41,725 मतांनी विजय झाला आहे. येथून ठाकरे गटाचे सुधाकर बडगुजर यांना 73,548 मतं मिळाली आहे. त्यांचा तब्बल 68,177  मतांनी पराभव झाला आहे. 


 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com