जाहिरात
Story ProgressBack

Big News : आगामी विधानसभेसाठी कोण किती जागा लढवणार? मविआचा संभावित फॉर्म्युला NDTVच्या हाती

मविआचा संभावित फॉर्म्युला NDTVच्या हाती लागला आहे.

Read Time: 2 mins
Big News : आगामी विधानसभेसाठी कोण किती जागा लढवणार? मविआचा संभावित फॉर्म्युला NDTVच्या हाती
मुंबई:

येत्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. राज्यभरात सर्वच पक्षांकडून त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. दरम्यान एक महत्त्वाची बातमी NDTV च्या हाती लागली आहे. मविआचा संभावित फॉर्म्युला NDTVच्या हाती लागला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी पाहता त्यांना विधानसभेत सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा असून काँग्रेस 100 ते 105 जागांवर लढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसने 17 जागा लढवल्या होत्या, त्यातील 13 उमेदवार विजयी झाले आहेत. तर उबाठाला 9, शरद पवार गटाला 8 जागांवर विजय मिळवता आला आहे. या निवडणुकीत काँग्रेसने स्वत:ला सिद्ध केलं आहे. त्यामुळे विधानसभेत काँग्रेसचे अधिक जागांचा दावा केला जाऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 

NDTV च्या हाती आलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट 90 ते 95 जागांवर आणि शरद पवार गटाला 80 ते 85 जागा मिळतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. लोकसभा निवडणूक एकत्र लढवून राज्यात चांगली कामगिरी करणाऱ्या महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चाचपणी सुरू केली आहे. विधानसभा निवडणुकीला अजून चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. मात्र त्यापूर्वी निवडणुकीच्या तयारीला योग्य वेळ मिळावा म्हणून जागावाटप लवकर पूर्ण करण्याचा संकल्प महाविकास आघाडीतील तीनही प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी केला असल्याचे आघाडीतील एका नेत्याने सांगितले.

नक्की वाचा - लोकसभा अध्यक्षपदावरून पेच फसणार? इंडिया आघाडीनं डाव टाकला

शनिवारी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेपूर्वी मविआतील काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धवसेना या तीन प्रमुख पक्षांमध्ये जागावाटपाची प्राथमिक बैठक झाली. सर्व पक्षांच्या विद्यमान आमदारांच्या जागांव्यतिरिक्त कोणत्या जागांवर कोणत्या पक्षाची ताकद आहे, याची चाचपणी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर करणार आहे. त्यादृष्टीने ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्याचे समजते.

कोण किती जागांवर लढण्याची शक्यता? 

काँग्रेस : 100 ते 105
उद्धवसेना :  90 ते 95
शरद पवार गट : 80 ते 85

जिथे ताकद तिथे जागा 

विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भाग, मुंबईतील काही भागांत काँग्रेसची ताकद आहे तिथे त्यांना जास्त जागा दिल्या जातील. कोकणासह मुंबई, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील काही भागांत उद्धवसेनेची ताकद आहे. शरद पवार गटाची पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यातील काही भागांत ताकद असल्याने त्यांना तिथल्या जागा दिल्या जाण्याची शक्यता आहे.

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
'ईव्हीएमला मोबाईल जोडता येत नाही'; EVM वादावर निवडणूक अधिकाऱ्याचं स्पष्टीकरण
Big News : आगामी विधानसभेसाठी कोण किती जागा लढवणार? मविआचा संभावित फॉर्म्युला NDTVच्या हाती
NCP Sharad Pawar group claims six out of eight assembly constituencies of Pune
Next Article
शरद पवार की उद्धव ठाकरे, विधानसभेत कोण लढवणार पुण्यातील सर्वाधिक जागा? 
;