लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे झाले असून आणखी पाच टप्पे बाकी आहेत. राज्यात आणखी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. मे महिन्यातील वाढत्या तापमानाबरोबरच प्रचाराचा पारा देखील वाढलाय. प्रत्यक्ष भेटीपासून ते डिजिटल जाहिरातीपर्यंत सर्व मार्गांनी राजकीय पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्तारुढ आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिरातीवर खळबळजनक आरोप केलाय.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
ठाकरे गटाच्या जाहिरातीत पॉर्न स्टार?
उबाठा गटाकडून महिला अत्याचाराच्या प्रश्नावर एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्या जाहिरातीमध्ये एका पॉर्न स्टारनं काम केलंय, असा आरोप चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. आदूबाळाने या आधीच राज्यात नाईट लाईफचा आग्रह धरला होता. त्यांना आता पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कुती रुजवायची आहे का? असा प्रश्न वाघ यांनी विचारला. 'उबाठा' च्या जाहिरातीमध्ये पॉर्न स्टार झळकतो. त्यांना अन्य कलाकार मिळाला नाही का? या जाहिरातीमुळे राज्यातील महिलांची मान शरमेनं खाली झुकली आहे. जाहिरात तयार करणारी कंपनी आणि ठाकरे यांचा काही संबंध आहे का? असा प्रश्नही वाघ यांनी यावेळी विचारला.
चित्रा वाघ यांनी त्यानंतर सोशल मीडिया नेटवर्क X वर पोस्ट केलीय. तुमच्या जाहिरातीत ‘बाप'च जर पॉर्नस्टार असेल, तर काय करायचे..? तो पॉर्नस्टार आहे की नाही, या एका प्रश्नाचे उत्तर तेवढे द्या..!' असा सवाल त्यांनी केला आहे.
उबाठ्यांच्या दिवट्यांवर बोललं तर अंधारातील सटरफटर चिलटं फडफडतात…
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) May 2, 2024
फडफडणारी मशाल विझण्याआधी आपला बुडाखालचा अंधार पाहिला तर अधिक बरे..
आणि उपदेशाच्या उचापती करण्यापेक्षा साधं उत्तर देत का नाही…?
तुमच्या जाहिरातीत ‘बाप'च जर पॉर्नस्टार असेल, तर काय करायचे..?
तो पॉर्नस्टार आहे की… pic.twitter.com/G5Ls0Fvqxo
उबाठा गटाकडून उत्तर
चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उत्तर देण्यात आलंय. 'महिलांच्या लैंगिक शोषण केल्याचा आरोप असलेल्या उमेदवाराला भाजपानं पाठिंबा दिला आहे. ही शरमेची बाब आहे,' असं उत्तर 'उबाठा' पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी दिलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world