जाहिरात

Mahayuti Manifesto 2026 : लाडक्या बहि‍णींसाठी डबल धमाका; महायुतीच्या वचननाम्यात मोठ्या घोषणा  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा रोडमॅप वचननाम्यातून प्रसिद्ध केला.

Mahayuti Manifesto 2026 : लाडक्या बहि‍णींसाठी डबल धमाका; महायुतीच्या वचननाम्यात मोठ्या घोषणा  

BMC Election 2026 Grand Alliance's manifesto : मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ साठी भाजपा-शिवसेना-रिपाई (आ) महायुतीचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईचा रोडमॅप वचननाम्यातून प्रसिद्ध केला. या वचननाम्यातून मुंबईतील विविध विभागाच्या विकासाची आखणी करण्यात आली आहे. 

विशेष म्हणजे लाडक्या बहि‍णींकडे महायुतीने विशेष लक्ष दिल्याचं वचननाम्यावरुन दिसून येत आहे. 'लाडकी बहीण' आणि महिला सक्षमीकरणासाठी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहेत. बेस्ट' (BEST) बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली जाणार आहे. महिलांना स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचा उल्लेख वचननाम्यात करण्यात आला आहे. 

महायुतीच्या वचननाम्यात महिलांसाठी मोठ्या घोषणा

 * आर्थिक पाठबळ: 'लाडकी बहीण' योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबनासाठी मदत दिली जाईल.
 * बिनव्याजी कर्ज: महिलांना स्वतःचा लघु उद्योग किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
 * बचत गटांना मदत: महिला बचत गटांना बळकटी देण्यासाठी ३०,००० रुपयांचे आर्थिक अनुदान दिले जाईल.
 * बस प्रवासात सवलत: 'बेस्ट' (BEST) बस प्रवासात महिलांना ५० टक्के सवलत दिली जाईल.
 * पिंक टॅक्सी/रिक्षा: महिलांच्या रोजगारासाठी आणि सुरक्षेसाठी 'पिंक टॅक्सी' आणि 'पिंक रिक्षा' योजनेला प्रोत्साहन दिले जाईल.
 * आरोग्य सुविधा: महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिरे आणि प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत वैद्यकीय तपासणीची सोय केली जाईल.
 * सुरक्षा: महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात सीसीटीव्ही (CCTV) जाळे विस्तारणे आणि रात्रीच्या गस्ती पथकाची (Patrolling) नियुक्ती केली जाईल.

Poonam Maharaj : 'वडापावची गाडी लावून मराठी अस्मिता जीवंत राहणार नाही'; मराठीच्या मुद्द्यावर पुनम महाजनांचा थेट निशाणा

नक्की वाचा - Poonam Maharaj : 'वडापावची गाडी लावून मराठी अस्मिता जीवंत राहणार नाही'; मराठीच्या मुद्द्यावर पुनम महाजनांचा थेट निशाणा

पायाभूत सुविधा आणि वाहतूक

  • खड्डेमुक्त मुंबई: ९ मीटरपेक्षा कमी रुंदीचे रस्ते डांबरी आणि ९ मीटरपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते सिमेंट काँक्रीटचे करणार. वारंवार रस्ते खोदणे बंद करण्यासाठी १७ सेवांकरिता 'यूटिलिटी टनेल' (Utility tunnel) बांधणार.
  • पाताललोक प्रकल्प: कोस्टल रोड, मेट्रो लाईन ३ (अंडरग्राउंड मेट्रो), ठाणे-बोरीवली अंडरग्राउंड टनेल आणि गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचे काम वेगाने पूर्ण करणार.
  • बेस्ट सेवा: २०२९ पर्यंत सर्व बसेस इलेक्ट्रिक (EV) करणार आणि बसेसची संख्या ५,००० वरून १०,००० पर्यंत वाढवणार. महिलांना बस प्रवासात ५० टक्के सवलत दिली जाईल.

पाणीपुरवठा आणि स्वच्छता

  • मुबलक पाणी: मुंबईकरांना २४x७ स्वच्छ पाणी देणार. पाणी दरवाढीला ५ वर्षांसाठी स्थगिती देणार आणि गोराई येथे समुद्र जलनिस्सारण (Desalination) प्रकल्प उभारणार.
  • पूरमुक्त मुंबई: जपानी तंत्रज्ञान आणि तज्ज्ञांच्या मदतीने ५ वर्षात मुंबईला पूर्णपणे पूरमुक्त करण्यासाठी ४ नवीन भूमिगत फ्लडवॉटर टाक्या उभारणार.
  • स्वच्छ मुंबई: 'मागेल त्याला शौचालय' धोरण राबवणार आणि डम्पिंग ग्राउंडवर 'वेस्ट-टू-एनर्जी' प्रकल्प पूर्ण करणार.
Listen to the latest songs, only on JioSaavn.com