जाहिरात

'विजयराज शिंदे ही चिल्लर केस, त्याच्या बापात दम असेल तर...' महायुतीत वाद पेटला

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

'विजयराज शिंदे ही चिल्लर केस, त्याच्या बापात दम असेल तर...' महायुतीत वाद पेटला
बुलढाणा:

शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांना बुलढाणा विधानसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाली आहे. महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्याने इथे भाजपमध्ये नाराज आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे शिंदे गटाचे संजय गायकवाड हे चांगलेच संतापले आहेत. संजय गायकवाड हे वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. आता ही त्यांनी आपल्याच मित्र पक्षाच्या बंडखोरी उमेदवारावर असेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यामुळे महायुतीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बुलढाण्यात महायुतीतील बंडखोरीचा वाद मिटताना दिसत नाही. भाजपचे बंडखोर उमेदवार विजयराज शिंदे यांनी बंडखोरी मागे घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या मतदार संघातले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय गायकवाड हे चांगलेच भडकले आहेत. त्यांनी भाजपच्या विजयराज शिंदे यांना खरी खोटी सुनावली आहे. शिंदे हा चिल्लर माणूस असून त्याच्या बापात हिम्मत असेल तर त्याने निवडणूक लढवावीच. असं आव्हान त्यांनी विजयराज शिंदे यांना दिले आहे. त्यांच्या या वक्तव्या मुळे बुलढाण्याचा महायुतीत वाद चिघळण्याची दाट शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'क्लिन बोल्ड डिपॉझिट गुल' पहिल्याच सभेत मुख्यमंत्र्यांची जोरदार फटकेबाजी

बुलढाणा विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करत भाजपा नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महायुतीमध्ये मतांचे विभाजन होऊ नये यासाठी पक्ष नेतृत्व आणि आपापल्या पक्षातील बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यास सुरुवात केली आहे. भाजपा नेते विजयराज शिंदे यांना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईला बोलावलं होतं. मात्र या बैठकीनंतर मी निर्णय जाहीर करेल असे शिंदे यांनी सांगितले होते. मात्र मी गायकवाडला उमेदवारी मागितली नाही. पक्षाला उमेदवारी मागितली आहे. पक्ष ठरवेल लढायचं की नाही लढायचं असे शिंदे यांनी सांगितले. त्यांना हे बोलण्याचा अधिकारच नाही. पक्षाने जर मैत्रीपूर्ण लढाईची परवानगी दिली तर त्याच्या बापात किती दम आहे 23 तारखे नंतर समजेल असे शिंदे म्हणाले. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com