Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election 2026 : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून यंदा प्रचाराच्या मुद्द्यांपेक्षा उमेदवारांच्या संपत्तीचीच चर्चा शहरात जास्त रंगली आहे. दिग्गज राजकीय नेत्यांच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी या निवडणुकीत मोठ्या उत्साहात उडी घेतली आहे. निवडणूक विभागाला सादर केलेल्या शपथपत्रातून या उमेदवारांची 'आर्थिक ताकद' समोर आली असून, अनेक तरुण उमेदवारांकडे कोट्यवधींची मालमत्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मर्सिडीज ते एक किलो सोने: उमेदवारांची श्रीमंती
निवडणूक शपथपत्रानुसार, पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्याकडे दीड कोटी रुपयांची आलिशान मर्सिडीज कार आहे. विशेष म्हणजे २०१५ मध्ये त्यांची मालमत्ता २५ लाख होती, ती आता सुमारे २७ कोटींवर पोहोचली आहे. दुसरीकडे, शिंदे सेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे पुत्र ऋषिकेश जैस्वाल यांच्याकडे तब्बल एक किलो सोने असल्याची माहिती समोर आली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांच्याकडेही २७ कोटींची मालमत्ता असून ४० तोळे सोने आहे.
कुणाकडे कोट्यवधींचे येणे, तर कुणी कर्जमुक्त
पालकमंत्री शिरसाट यांच्या कन्या हर्षदा शिरसाट या व्यवसायाने पायलट आहेत. त्यांच्याकडे दीड कोटींची मालमत्ता असली, तरी विविध कंपन्या आणि व्यक्तींकडून त्यांना २ कोटी २९ लाख रुपये येणे बाकी आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्यांच्याकडे सोने किंवा हिऱ्याचे कोणतेही दागिने नाहीत. दुसरीकडे, अंबादास दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांची मालमत्ता ८८ लाख रुपये असून, त्यांच्यावर एक रुपयाचेही कर्ज नाही, हे विशेष.
ओबेरॉय आणि व्यास: सर्वात श्रीमंत उमेदवार
यंदाच्या निवडणुकीत सर्वात श्रीमंत उमेदवार म्हणून माजी महापौर मनमोहनसिंग ओबेरॉय यांचे पुत्र सतींदरसिंग ओबेरॉय यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांची एकूण मालमत्ता ६२ कोटी ५९ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्यापाठोपाठ व्यापारी मिथुन सतीश व्यास यांचा क्रमांक लागतो, ज्यांची संपत्ती ५०.८ कोटी रुपये आहे. ही निवडणूक आता केवळ लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी राहिली नसून, शहरातील बड्या राजकीय घराण्यांचे वर्चस्व आणि आर्थिक ताकद सिद्ध करण्याची लढाई ठरताना दिसत आहे.
सिद्धांत संजय सिरसाट : वय - ३४ वर्ष : शिक्षण - बी कॉम
कुटुंबाची जंगम मालमत्ता - ९०६८९१४० कोटी
कुटुंबाची स्थावर मालमत्ता - १७५८३४२०० कोटी
बँकेचे कर्ज -१५२१६५२३ कोटी
उधार, देणी - १७९१७३५२९ कोटी
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न - ७०७५२६५ लाख
२०१५ च्या निवडणुकीतील स्थावर व जंगम मालमत्ता - २५००००० लाख
व्यवसाय : शेती व व्यापार
वाहने : मर्सिडीज ४५०, किंमत दीड कोटी, ५ जेसीबी, २ हायवा, १ पोकलँड अंदाजे किंमत २ कोटी ९० लाख ८२ हजार
ऋषिकेश प्रदीप जैस्वाल : वय ३१, शिक्षण - बीबीए
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता : ३७२२६०८३ कोटी
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता : ३३८८०४९४ कोटी
एकूण मालमत्ता : ७११०६५७७ कोटी
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न : ४१३२५४० लाख
सोने - स्वतःच्या नावे ४७२ ग्रॅम, पत्नीच्या नावे - ६०९ ग्रॅम
उधार देणी : २ कोटी ३० लाख (यामध्ये पत्नी काजल यांच्याकडून १९ लाख उधार घेतले)
राजेंद्र एकनाथ दानवे : वय - ५१ वर्ष - शिक्षण - १० वी
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता: ५५४६०४७ लाख
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता: ३३१०९४४ लाख
कुटुंबाची एकूण मालमत्ता : ८८५६९९१ लाख
पत्नीच्या नावे दागिने: ५३४२४०० लाख
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ; ७०३२५० लाख
एकूण कर्ज : निरंक
व्यवसाय : व्यापार
सचिन सूर्यकांत खैरे : वय - ४४ ; शिक्षण - बी कॉम
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता: १११७५४५२ कोटी
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता: १६७८६६६० कोटी
कुटुंबाची एकूण मालमत्ता : २७९६२११२ कोटी
कुटुंबावरील एकूण कर्ज : १४००००० लाख
कुटुंबाकडे असलेले एकूण सोने - ४० तोळे
२०१५ मध्ये जाहीर केलेली स्थावर व जंगम मालमत्ता - १४७५७१४६ कोटी
व्यवसाय : शेती व व्यापार
वाहने - दोन दुचाकी किंमत १ लाख रुपये
हर्षदा संजय शिरसाट : वय - ३० वर्ष : शिक्षण - वैमानिक
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता: ११८१८९०५ कोटी
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता: २८११८८८ लाख
कुटुंबाची एकूण मालमत्ता : १४६३०७९३ कोटी
एकूण वार्षिक उत्पन्न : ५६९४३८० लाख
एकूण येणे रक्कम : ३२९१४२५७ कोटी
कुटुंबावरील एकूण कर्ज : ५९११३८२ लाख
व्यवसाय : शेती व व्यापार
वाहने - स्कॉर्पिओ किंमत १८ लाख ३७ हजार, दोन दुचाकी किंमत १ लाख ४० हजार, ट्रॅक्टर २ किंमत १६ लाख २७ हजार
सय्यद उसामा अब्दुल कादीर : वय - ३२ वर्ष : शिक्षण - बीए हिंदी
कुटुंबाची एकूण जंगम मालमत्ता: ८५९२८२ लाख
कुटुंबाची एकूण स्थावर मालमत्ता: २१३८४००० कोटी
कुटुंबाची एकूण मालमत्ता : २२२४३२८२ कोटी
कुटुंबाचे उत्पन्न : ४४५५७१ लाख
कुटुंबावरील एकूण कर्ज : निरंक
व्यवसाय : शेती व व्यापार
मिथुन सतीश व्यास : वय - ४३ : शिक्षण - बीकॉम
कुटुंबाची जंगम मालमत्ता : ३१४७२५५२ कोटी
कुटुंबाची स्थावर मालमत्ता : ४७६६३७०१३ कोटी
एकूण मालमत्ता : ५०८१०९५६५ कोटी
कुटुंबाचे एकूण उत्पन्न : २६२५३१० लाख
कर्ज : ११७३२८७ लाख
वाहने : ३२.८७ लाख रुपयांची हुंदाईची चारचाकी
व्यवसाय : व्यापार
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
