जाहिरात

Ladki Bahin Scheme : 'त्या ' महिलांना वगळणार, 'लाडकी बहीण' योजनेबाबत CM फडणवीसांची घोषणा

Mukhyamantri Mazi ladki bahin scheme : नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.

Ladki Bahin Scheme : 'त्या ' महिलांना वगळणार, 'लाडकी बहीण' योजनेबाबत CM फडणवीसांची घोषणा
मुंबई:

Mukhyamantri Mazi ladki bahin scheme : नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतमध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा महत्त्वाचा वाटा होता. शिंदे सरकारमध्ये या योजनेच्या अंतर्गत 18 ते 60 वयोगटातील पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना 1500 रुपये देण्यात आले. ही रक्कम 2100 करण्याचं आश्वासन महायुतीनं दिलं होतं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय म्हणाले मुख्यमंत्री?

नवं सरकार आल्यानंतर 'लाडकी बहीण' योजनेतील लाभार्थ्यांची छाननी होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत पहिल्याच पत्रकार परिषदेत महत्त्वाची घोषणा केली आहे.

लाडकी बहीण योजना आम्ही सुरुच ठेवणार आहोत. महिलांना महिना 2100 रुपये देणार आहोत. आम्ही या योजनेच्या बजेटचा आढावा घेऊ. त्याचबरोबर जी आश्वासनं दिली ती पूर्ण करु, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. त्याचबरोबर निकषाच्या बाहेर कुणी असेल तर त्यांना वगळण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण महिलांनी केलं. निकषाच्या बाहेरील कुणी या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्याचा फेरविचार करु. पण, या योजनेचा सरसकट फेरविचार करण्याची घोषणा नाही, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

निवडणुकीतील पराभव, टोमणे आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतरही कसं केलं फडणवीसांनी कमबॅक?

Dec 05, 2024 17:49 pm IST

निवडणुकीतील पराभव, टोमणे आणि सत्तेपासून दूर राहिल्यानंतरही कसं केलं फडणवीसांनी कमबॅक?

मंत्रिमंडळ विस्तार कधी?

देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रकार परिषदेमध्ये विरोधकांचाही सन्मान करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूर अधिवेशनापूर्वी होणार असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.  करणार आहोत. सर्व गोष्टी फायनल झाल्या आहेत. काही खात्यांबाबतचा प्रश्न शिल्लक आहे. मात्र आम्ही एकत्र बसून त्यावर तोडगा काढू, असं त्ांनी सांगितलं. विधानसभा अध्यक्षाची निवड मुंबईच्या अधिवेशनात करणार आहोत. 9  डिसेंबरला ही निवड होईल. त्यानंतर राज्यपालांचे अभिभाषण होईल. तीन दिवसाचे विशेष अधिवेशन मुंबईत होईल. त्याची शिफारस राज्यपालांना केली आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com