जाहिरात

'महायुतीच्या उमेदवाराकडून पैसे घ्या पण मतदान मात्र...' पवारांसमोर काय घडलं?

ही सभा जरी शरद पवारांची असली तरी ती गाजवली ठाकरेंच्या खासदारांनीच. त्यांनी शरद पवारांच्याच समोर मतदारांना असा काही सल्ला दिली की शरद पवार हे मंचावरून बघतच राहीले.

'महायुतीच्या उमेदवाराकडून पैसे घ्या पण मतदान मात्र...' पवारांसमोर काय घडलं?
बुलढाणा:

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता ऐन रंगात आली आहे. आरोप प्रत्यारोप होत आहेत. अशात परभणी जिल्ह्यातील जिंतूर मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विजय भांबळे यांच्या प्रचारासाठी शरद पवार आले होते. त्यावेळी व्यासपीठावर परभणीचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव ही उपस्थित होते. ही सभा जरी शरद पवारांची असली तरी ती गाजवली ठाकरेंच्या खासदारांनीच. त्यांनी शरद पवारांच्याच समोर मतदारांना असा काही सल्ला दिली की शरद पवार हे मंचावरून बघतच राहीले. तर उपस्थितांनी त्याला भरधोस प्रतिसाद दिला. त्याचीच चर्चा सध्या मतदार संघात सुरू आहे.   

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रचार सभे वेळी खासदार संजय जाधव यांनी विद्यमान आमदार मेघना बोर्डीकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या हे लोक हवेत आहेत. त्यांना जमिनीवर आणलं पाहीजे. लोकसभेला लोकांनी धक्का दिला आहे. आता विधानसभेतही हेच करण्याची वेळ आली आहे. विद्यमान आमदार या चार आणे परभणी, चार आणे जिंतूरमध्ये आणि आठ आणे पुण्यात असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्यातला माणूस हवाय की नॉट रिचेबल माणूस हवाय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थितांना केला. 

ट्रेंडिंग बातमी - '... तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना थेट गोळ्या घातल्या असत्या' राणे हे काय बोलून गेले

सध्या मताला पाच हजार रूपये दिले जात असल्याची चर्चा आहे. तशी त्या माणसांची मानसिकता आहे. हे सर्व पैसे जिल्ह्या बँकेचे आहेत. काही पैसे रस्त्यातून आले आहेत. हे पैसे तुमचे आमचे खाल्लेले पैसे आहेत. त्यामुळे है पैसे घ्या. मागे पुढे पाहू नका. शेवटी मतदान तुम्हाला करायचे आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराकडून पैसे घ्या पण मतदान करताना तुतारी वाजवूनच बाहेर या असा सल्लाच खासदार जाधव यांनी दिला. 

ट्रेंडिंग बातमी - निवृत्तीचा निर्णय घेण्याआधी शरद पवारांनी काय केलं? अजित पवारांनीच सांगितली Inside Story

संजय जाधव भाषण करत असताना शरद पवार हे व्यासपीठावर उपस्थित होते. ते जाधव यांच्याकडे पाहातच राहीले. मेघना बोर्डीकर यांना सर्व पद आपल्याच घरात हवी आहेत. ही माणसं मढ्याच्या टाळू वरचं लोणी खाणारी आहेत. त्यांना आता त्यांची जागा दाखवा असे आवाहनही यावेळी जाधव यांनी केलं. त्यांच्या कोणत्याही अमिशाला बळी पडू नका. पण पैसे देत असतील तर ते घ्या आणि शेवटी तुतारी वाजवा असेही ते बेधडक पणे म्हणाले. विद्यमान आमदारांमुळे मतदार संघात एकही अधिकारी थांबत नाही. ते वैतागून निघून जातात असा आरोपही त्यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - 'औरंगाबादचं नाव बदलू नका, पुण्याचं नाव संभाजीनगर करा' आंबेडकर असं का म्हणाले?

जिंतूर सेलू विधानसभा मतदार संघात भाजपच्या मेघना बोर्डीकर आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विजय भांबळे हे मैदानात आहेत. 2019 च्या निवडणूकीत बोर्डीकर यांनी भांबळे यांचा निसटता पराभव केला होता. केवळ तीन हजार मताच्या फरकाने बोर्डीकर या विजयी झाल्या होत्या. त्यामुळे या पराभवाची परतफेड करण्यासाठी भांबळे हे इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी थेट शरद पवार आले होते. त्यांनीहा भांबळे यांना विजयी करण्याचे आवाहन केले. मात्र या सभेत  खासदार संजय जाधव यांनी केलेली जोरदार बॅटींगच सर्वांच्या लक्षात राहीली.  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com