भाजपनं विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारींची पहिली यादी जाहीर केली आहे. 99 जणांचा या पहिल्या यादीत समावेश आहे. काही जणांना अजूनही वेटींगवर ठेवण्यात आले आहे. तर काही इच्छुकांना उमेदवारी मिळू शकलेली नाही. त्यामुळे नाराजी मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. अशा वेळी नाराजांसह वेटींगवर असलेले आणि बंडखोरीच्या तयारीत असलेले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर धडकले आहेत. त्यामुळे सागर बंगल्यावर सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. सर्वांना समजावताना फडणवीसांची मात्र दमछाक होत आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
खडकवासला मतदारसंघातील विद्यामान आमदार भीमराव तापकीर यांच्या उमेदवारीला विरोध केला जात आहे. त्यामुळे या मतदार संघातील इच्छुक माजी नगरसेवक नागपुरे आणि समर्थकांकडून फडणवीसांची भेट घेण्यात आली आहे. तर पुणे कंन्टोनमेंटमधून सुनील कांबळेंना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे माजी नगरसेवक भरत वैरागे यांनी या मतदार संघातून उमेदवारी मिळाली यासाठी फडणवीसांचा सागर बंगला गाठला आहे.
ट्रेंडिंग बातमी - महाविकास आघाडीत वाद असलेले 'हे' आहेत 'ते' मतदार संघ
त्यात बरोबर आर्वीचे आमदार दादाराव केचे यांना देखील वेटिंगवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या ऐवजी सुमित वानखेडेंना उमेदवारीची शक्यता आहे. त्यामुळे केचे नाराज आहेत. त्यांनी आत थेट फडणवीसांची भेट घेत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तर कोल्हापुरचीही काही वेगळी स्थिती नाही. धनंजय महाडिक आपला मुलगा कृष्णराजसाठी कोल्हापूर उत्तर मधून उमेदवारी मिळाली यासाठी प्रयत्नशिल आहेत. त्यासाठी उमेदवार अदलाबदल करण्यासंदर्भात भेट त्यांनी फडणवीसांची भेट घेतली.
ट्रेंडिंग बातमी - उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपात धुसफूस, सांगलीत बंडखोरी होणार?
राज पुरोहित यांना कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी हवी होती. मात्र त्यांच्या ऐवजी राहुल नार्वेकर यांनाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पुरोहित हे नाराज आहेत. त्यांनी नाराजी व्यक्त करण्यासाठी फडणवीसांची भेट घेतली. मात्र फडणवीस यांच्या भेटीनंतर त्यांची नाराजी दूर झाली आहे. ही भेट सकारात्मक झाल्याचे त्यांनी सांगितले. भाजप प्रमाणे शिवसेना शिंदे गटाचे नेतेही फडणवीसांना भेटत आहेत. शिवसेनेचे शिंदे गटाकडून इच्छुक असलेले तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत सागर बंगल्यावर पोहोचले होते. तर सोलापूर शहर मध्य मधून भाजपकडून मदत मिळावी अशी त्यांनी मागणी केली.
ट्रेंडिंग बातमी - पहिल्या यादीत नाव का नाही? भाजपचे विद्यमान आमदार थेट बोलून गेले
त्याच बरोबर पुण्यातील नाराज माजी खासदार संजय काकडे ही फडणवीस यांच्या भेटीला आले होते. काकडे तुतारी हाती घेणार अशी चर्चा होती. मात्र काकडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील देवराई आणि आष्टी मतदारसंघात अदलाबदल करण्यात यावी यासाठी माजी विधान परिषद आमदार सुरेश धस फडणवीसांना भेटले. ते आष्टीतून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राम सातपुतेंचे पहिल्या यादीत नाव नाही. लोकसभेत पराभव झाल्यानंतर पुन्हा विधानसभेसाठी उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्यांनी फडणवीसांची भेट घेतली. माळशिरसमधून ते इच्छुक आहेत.
नक्की वाचा: काँग्रेसच्या पहिल्या यादीचा मुहूर्त ठरला? 'या' दिवशी नावं जाहीर होणार
वडगाव शेरी मतदारसंघातून टिंगरेंना पोर्शे अपघातामुळे महायुतीचा विरोध आहे. त्यामुळे भाजपचे जगदीश मुळीक या मतदार संघातून इच्छुक आहेत. ते ही सागर बंगल्यावर धडकले होते. दौंड मतदारसंघातील आमदार राहुल कुल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र अजित पवार गटाचे रमेश थोरात बंडखोरीच्या तयारीत आहेत. महायुतीतील बंडखोरीची शमविण्यासाठी कुल सागर बंगल्यावर आले होते. त्याच बरोबर माजी गृहमंत्री रणजित पाटील अकोट मतदारसंघातून इच्छुक आहेत. भाजपचे विद्यामान आमदार प्रकाश भारसाकळेंना पहिल्या यादीत वेटिंगवर ठेवण्यात आले होते. त्यामुळेच पाटील यांनी फडणवीसांची भेट घेतली.
ट्रेंडिंग बातमी - अंगावरची हळद उतरण्या आधीच नवरदेवाला चुना, नववधूने केला मोठा कांड
पहिल्या यादीत नाव जाहीर झाल्यानंतर अतुल सावे यांनी ही आभार मानण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चंद्रकांत उर्फ राजू नवघरे यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. नवघरे हिंगोली जिल्ह्यातील वसमत मतदारसंघाचे विद्यामान आमदार आहेत. या शिवाय कुलाब्यातून उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकर यांनीही फडणवीसांची भेट घेतली. तर उमरखेड मतदारसंघातून विद्यमान नामदेव ससाणे हे भाजप आमदार आहेत. मात्र पहिल्या यादीत नाव नसल्याने इच्छुक भाविक भगत यांनी फडणवीस यांची भेट घेतली.