जाहिरात
This Article is From Apr 25, 2024

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'शपथनामा प्रकाशित', 'ही' आहेत 5 प्रमुख आश्वासने

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'शपथनामा प्रकाशित', 'ही' आहेत 5 प्रमुख आश्वासने
मुंबई:

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आज ( गुरूवारी ) आपला निवडणूक जाहीरनामा प्रकाशित केला. यावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते. या जाहीरनाम्यात महिला आणि युवकांसाठी मोठी आश्वासने देण्यात आली आहेत. शिवाय शेतकरीही या जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी आहे. जाहीरनाम्याला 'शपथनामा' असे नाव देण्यात आले आहे.      

पवारांच्या 'शपथनाम्यात' काय? 

1)  शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग नेमणार

2)  महिला सुरक्षेसाठी कडक कायदे करणार 

3) शेती शैक्षणिक गोष्टींवर जीएसटी रद्द करणार

4) सरकारी कंत्राटी नोकर भरती रद्द करणार

5) महिला मुलींच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करणार 

हेही वाचा - आढळराव नाही तर 'हे' होते शिरूरचे पहिल्या पसंतीचे उमेदवार, कोल्हेंचा मोठा गौप्यस्फोट


या शिवाय कोणती आश्वासने ?


राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केलेल्या शपथनाम्यात ही प्रमुख आश्वासने देण्यात आली आहेत. ही आश्वासने पाहीली असता महिला, युवक आणि शेतकरी या शपथपत्राच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. शिवाय स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षा शुल्क माफ करणार असल्याचे आश्वासनही यात देण्यात आले आहे. शिवाय  जातिनीहाय जनगणना करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. अंगणवाडी सेविकांची संख्या आणि मानधन वाढवणार असल्याचेही आश्वासन देण्यात आले आहे.   

शपथनाम्यातील ठळक मुद्दे..

* डिग्री डिप्लोमा झाल्यानंतर पहिल्या वर्षी नोकरी मिळेपर्यंत 8,000 हजार रुपये स्टायपेन्ड देणार

* स्त्री शिक्षणातले अडथळे दूर करणार

* महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे करणार

* महिलांना तातडीने आरक्षण देण्याची मागणी करणार

* शेतकऱ्यांना किमान आधारभूत दर

* केंद्राचा हस्तक्षेप न करता एक आयोग निर्माण करणार

* नवीन पद्धती तंत्रज्ञान याला जास्त बळकटी देणार

* आम्ही 500 रुपयांपर्यंत गॅस सिलेंडर देऊ

* पेट्रोल डिझेल वरील कर पुनर्निमानीत करू

* शासकीय नोकऱ्यांत महिलांना 50 टक्के आरक्षण देऊ

* सरकारी यंत्रणेत कंत्राटी भरती कायमची बंद करू

* 50% च्या वरील आरक्षणाचा कायदा दूर करू

* इंदिरा सहानी प्रकरणातील 50% ची अट दूर करू

* खाजगीकरणावर मर्यादा आणू

* अग्नीवीर योजना रद्द करणार

* चीनकडून सीमेवर घुसखोरी चालूये त्यावर आमचे खासदार आवाज उठवणार

* लोकांचा निवडणुकीवर विश्वास बसला पाहिजे

* न्याययंत्रणा वेगवान करण्यासाठी बजेट देऊ

* सरकारी नोकऱ्या रिक्त जागा भरण्याचं काम करू

* 8500 रुपये स्टायपेंड पहिल्या वर्षी दर महिन्याला देऊ

* स्पर्धा परीक्षांचं शुल्क माफ केलं जाईल

* महिला व मुलींच्या शिक्षणातील अडथळे दूर करू

* शाळा महाविद्यालयात सेफ्टी ऑडीट केलं जाईल

* शेतकऱ्यांसाठी आयोग स्थापन करणार त्यात केंद्राचा राजकीय हस्तक्षेप कमी करू

* शासकीय क्षेत्रात कंत्राटी भरती बंद करू

* जातनिहाय जनगणना करण्यासाठी आग्रह करू यानंतर आरक्षणातील 50 टक्क्यांची अट दूर करण्याचं काम करू

* खासगी शैक्षणिक संस्थात महिलांना आरक्षण देणार

* रेशनकार्ड पात्रतेच्या निकषात सुधारणा करणार

* ज्येष्ठ नागरिकांसाठी राष्ट्रीय पातळीवर आयोग सुरू करू

* आरोग्यासाठी 2028-29 पर्यंत तरतूद 4 टक्क्यांपर्यंत वाढवू तसेच राज्यातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करणार.

* स्वतंत्र जीएसटी समिती स्थापन करणार. 

* शैक्षणिक आणि शेतीविषयक वस्तूंवर जीएसटी आकारणार नाही.

* कामगारांचं किमान वेतन प्रतिदिन 400 रुपये असेल यासाठी प्रयत्न करू

Listen to the latest songs, only on JioSaavn.com