जाहिरात

बेलापूरमध्ये चौरंगी लढत पण चर्चा मात्र 'या' अपक्ष उमेदवाराचीच

मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या बरोबर अपक्ष विजय नाहटा आणि मनसेचे गजानन काळे मैदानात आले. त्यामुळे ही लढत चौरंगी झाली आहे.

बेलापूरमध्ये चौरंगी लढत पण चर्चा मात्र 'या' अपक्ष उमेदवाराचीच
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

राजकीय दुष्ट्या संवेदनशील म्हणून बेलापूर विधानसभा मतदार संघाकडे पाहीले जाते. या मतदार संघात विद्यमान आमदार मंदा म्हात्रे आणि संदीप नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यांच्या बरोबर अपक्ष विजय नाहटा आणि मनसेचे गजानन काळे मैदानात आले. त्यामुळे ही लढतmahaassemblyelections2024  चौरंगी झाली असून चुरशीची ही झाली आहे. असं असलं तरी बेलापूर विधानसभा मतदार संघात उच्च शिक्षित असलेल्या अपक्ष उमेदवार डॉ. मंगेश आमले यांची जोरदार चर्चा सुरू आहे. डॉ. आमले निवडणुका जाहीर झाल्यापासून बेलापूरमधल्या गल्ल्या, वाड्या, वस्त्या आणि उच्चभ्रू इमारतीमध्ये प्रचाराची राळ उडवून दिली आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डॉ. मंगेश आमले यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तिकिटवर निवडणुकीसाठी तयारी सुरू केली होती. मात्र ऐनवेळी झालेल्या राजकीय फेरबदलामुळे तिकीट न मिळाल्याने आमले निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष उतरले आहेत. डॉ. आमलेंनी आयआयटी मुंबईमधून एमटेक केले आहे. गेली अनेक वर्षे त्यांनी आयटी क्षेत्रात एक यशस्वी व्यावसायिक म्हणून कार्य केले आहे. व्यावसायिक जबाबदारी पार पाडत असताना सातत्याने सामाजीक बांधिलकी जपणारे आमले निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

ट्रेंडिंग बातमी - मुख्यमंत्री येती घरी, खड्डे भरणीचा मुहूर्त ठरी!; अंबरनाथकरांमध्ये रंगली चर्चा

बेलापूरमध्ये भाजपच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचे मोठे आव्हान आहे. भाजपने आपले कार्यकर्ते आणि स्थानिक महायुतीच्या पाठींब्यावर मंदा म्हात्रेच्या विजयासाठी संपूर्ण ताकद लावली आहे. त्याचबरोबर, शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर विजय नाहाटा आणि तुतारीच्या निशाणीवर लढणारे संदीप नाईक हे देखील या निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता आहे. त्यात डॉ. मंगेश आमले हे पुर्ण ताकदीनं निवडणूक मैदानात उतरले आहेत. मनसेचे गजानन काळेही निवडणूक मैदानात आहेत.

ट्रेंडिंग बातमी - जेंव्हा काँग्रेस अध्यक्षांच्या आईला निजामाच्या सैन्यानी जाळलं, योगींच्या भाषणानंतर जागा झाला इतिहास

 भौगोलिक रचना आणि जातीय समीकरणचा विचार करता बेलापूर विधानसभा मतदारसंघ कॉस्मोपाॉलिटीन आणि उचभ्रू वस्तीचा आहे. वाशी, सानपाडा, पामबीच रोड, नेरूळ, सीबीडी हा मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू लोकांचा भाग आहे. तर तुर्भे हा अत्यल्प उत्पन्न गट आणि झोपडपट्टी बहूल भाग आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत येथून 55 नगरसेवक निवडून जातात. मराठी माणसांबरोबर इतर राज्यातील मतदारसंख्या चांगली असल्याने याचा प्रभाव मतदानावर पडते. 2014 च्या निवडणुकीत हे दिसून आलं. मोठ्या प्रमाणावर उच्चभ्रू वस्ती असलेल्या या मतदार संघात आपल्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा डॉ. आमले करत आहेत. बलाढ्य प्रतिस्पर्ध्या समोर आमलेंचा टिकाव लागणार का? हे आता पहावं लागेल. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com