जाहिरात

' तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर' शिंदेंचे आमदार असं का बोलले?

सुनिल तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे. हा वेळीच कापला पाहीजे. नाही तर महायुती खराब होईल अशी टीका ही महेंद्र थोरवे यांनी केली आहे.

' तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर' शिंदेंचे आमदार असं का बोलले?
रायगड:

महायुतीत रायगडमध्ये मिठाचा खड पडला आहे.  कर्जत खोपोली विधानसभा मतदार संघाचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनाच लक्ष केले आहे. थोरवे यांनी तटकरेंवर गंभीर आरोप करत त्यांन महायुतीतू काढून टाकण्याची मागणी केली आहे. शिवाय सुनिल तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे. तो वेळीच कापून काढला पाहीजे नाही तर महायुती खराब होईल इतक्या टोकाची भाषा वापरली आहे. तटकरेंची आपण महायुतीच्या बड्या नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचेही थोरवे म्हणाले. कर्जत मतदार संघात तटकरेंना भिकही घालणार नाही असेही ते म्हणाले आहेत.  

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कर्जत खोपोली विधानसभा मतदार संघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाला गेला आहे. शिंदेंच्या शिवसेनेनं इथे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना उमेदवारी दिली आहे. हा मतदार संघ आपल्याला मिळावा यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने जोर लावला होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी इथे बंडखोरी करत महेंद्र थोरवे यांना आव्हान दिलं आहे. सुधाकर घारे यांना सुनिल तटकरेंचीच फूस असल्याचा आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर थोरवे यांनी  सुनिल तटकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे रायगडमध्ये महायुतीत मिठाचा खडा पडला आहे.   

ट्रेंडिंग बातमी - पहिल्याच सभेत उद्धव ठाकरेंच्या 3 मोठ्या घोषणा, विरोधकांवरही तुटून पडले

सुनिल तटकरे हे भ्रष्टाचारामध्ये बरबटले आहेत. त्यांचे पुर्ण कुटुंब भ्रष्टाचारात डुबले आहे. भ्रष्टाचार कसा करायचा हे तटकरेंना बरोबर माहित आहे. ज्या लोकांनी तटकरेंना मदत केली त्यांनाच तटकरेंनी दगा दिला. बँ. एक. आर. अंतूले असतील किंवा शेकापचे जयंत पाटील असतील यांचे राजकारण तटकरेंनी संपवले. असा गंभीर आरोप महेंद्र थोरवे यांनी केला आहे. कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांचेही राजकारण तटकरे यांनी बिघडवले. लाड हे तटकरेंसाठी प्रामाणिक पणे काम करत होते. अशा वेळी सुधाकर घारे नावाचं पिल्लू तटकरे यांनीच पुढे आणले असा आरोपही त्यांनी केला. 

ट्रेंडिंग बातमी - 'खोडा घालणाऱ्यांना कोल्हापुरी जोडा दाखवा..', साताऱ्यातील सभेत CM शिंदे कडाडले; ठाकरेंवर हल्लाबोल

थोरवे येवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी सुनिल तटकरे हे महायुतीला लागलेला कॅन्सर आहे. हा वेळीच कापला पाहीजे. नाही तर महायुती खराब होईल अशी टीका ही केली. सुनिल तटकरे यांचा डिएनए पाहीला तर तो गद्दार असाच निघेल. त्यामुळे अशा तटकरेंना महायुतीतून हद्दपार करावे अशी मागणीच महेंद्र थोरवे यांनी केली आहे. याबाबत आपण महायुतीच्या तीन्ही नेत्यांकडे तक्रार करणार असल्याचे थोरवे म्हणाले. त्यामुळे शिंदे शिवसेना आणि तटकरे यांच्यातील हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता आहे. येवढ्या टोकाची टीका थोरवे यांनी केल्याने त्याचा फटका शिवसेनेच्या इतर उमेदवारांनाही जिल्ह्यात बसण्याची दाट शक्यता आहे. 

(नक्की वाचा-   "प्रवक्ते पद गेलं तरी चालेल...", कराळे मास्तरांनी घेतली आपल्याच पक्षाची 'शाळा')

कर्जत विधानसभा मतदार संघात महायुतीत बंडखोरी झाली आहे. इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या सुधाकर घारे यांनी बंजखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. घारे यांना सुनिल तटकरेंचा पाठींबा आहे. त्यामुळे महेंद्र थोरवे हे चिडले आहेत. त्यांनी थेट तटकरेंनाच लक्ष केले आहे. या मतदार संघात महेंद्र थोरवे, सुधाकर घारे आणि उबाठाचे नितीन सावंत यांच्यात लढत होत आहे. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याकडे लक्ष लागले आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com