जाहिरात

विधानपरिषद निवडणुकीत 'फडणवीस पॅटर्न' कायम, शरद पवार-ठाकरेंना दिला धोबीपछाड

Vidhan Parishad Election Result : विधानपरिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांची जादू कायम असल्याचं निकालानंतर सिद्ध झालं आहे.

विधानपरिषद निवडणुकीत 'फडणवीस पॅटर्न' कायम, शरद पवार-ठाकरेंना दिला धोबीपछाड
Vidhan Parishad Election Result : देवेंद्र फडणवीस महायुतीच्या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत.
मुंबई:


Vidhan Parishad Election Result : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी (12 जुलै) मतदान झालं. या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची बनली होती. या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांची जादू कायम आहे. 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सलग तिसऱ्यांदा फडणवीस पॅटर्न यशस्वी

विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे 5 तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी 2 उमेदवार रिंगणात होते. त्यांना महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांचं आव्हान होतं. महायुतीचे सर्व 9 उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पिछेहाटीनंतर महायुतीचे मतं फुटणार असं मानलं जात होतं. पण, फडणवीस यांनी त्यांचा पॅटर्न यशस्वी केलाय.

यापूर्वी 10 जून 2022 रोजी झालेली राज्यसभा आणि 20 जून 2022 रोजी झालेल्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला धक्का दिला होता. या दोन्ही निवडणुकीत भाजपाचे उमेदवार अतिरिक्त मतं घेत विजयी झाले होते. या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं होतं. 

विधानपरिषदेच्या या निवडणुकीतही देवेंद्र फडणवीस यांच्यावरच महायुतीची सर्व जबाबदारी फडणवीसांकडं देण्यात आली होती. फडणवीसांनी पुन्हा एकदा धक्कादायक निकालाची परंपरा कायम राखली आहे. या निवडणुकीत फडणवीसांनी भाजपाचे चारही उमेदवार पहिल्याच फेरीत जिंकून आणले. त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांचाही विजय निश्चित केला.

( नक्की वाचा : Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय )
 

दुसऱ्या फेरीत भाजपाचे समर्थक सदाभाऊ खोत विजयी झाले. त्यामुळे महायुतीचे सर्व 9 उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या आमदारांना फोडण्यात शरद पवार यशस्वी होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. पण फडणवीसांनी तो अंदाज चुकवला आहे.  

महाविकास आघाडीचं मत फुटल्याचं या निकालातून स्पष्ट झालं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीनं हे निकाल महायुतीमधील पक्षांचा उत्साह वाढवणारे आहेत. त्याचबरोबर महायुतीमधील देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
Pankaja Munde : पंकजा मुंडेंचं पावणेपाच वर्षांनी कमबॅक, विधानपरिषद निवडणुकीत दणदणीत विजय
विधानपरिषद निवडणुकीत 'फडणवीस पॅटर्न' कायम, शरद पवार-ठाकरेंना दिला धोबीपछाड
vidhan-parishad-election-result-mahavikas-agadi-cross-voting-analysis
Next Article
Vidhan Parishad Election Result : महाविकास आघाडी फुटली! वाचा कोणत्या आमदारांनी दिला धक्का