जाहिरात

'माझे कार्यकर्ते मुस्लीम, भाजपचे काम करणार नाही, माझी हाकलपट्टी करा' शिंदेंच्या सेनेत हायव्होल्टेज ड्रामा

शिवाय भाजप सोबत झालेली युती आपल्याला अजीबात मान्य नाही. गेली 20 वर्षा आम्ही भाजप सोबत लढत आहोत असं ते म्हणाले.

'माझे कार्यकर्ते मुस्लीम, भाजपचे काम करणार नाही, माझी हाकलपट्टी करा' शिंदेंच्या सेनेत हायव्होल्टेज ड्रामा
  • कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत विविध उमेदवारांमध्ये नाराजी आणि युतीविरोधी भावना उफाळून आल्या आहेत
  • कैलाश शिंदे यांनी पक्षातून आपली हकालपट्टी करण्याची मागणी केली असून पक्षाच्या कामकाजावरही टीका केली आहे
  • त्यांनी भाजपसोबत झालेल्या युतीवर नाराजी व्यक्त करत आपला निषेध नोंदवला आहे.
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
कल्याण:

अमजद खान 

Kalyan News: कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत आता नारीज नाट्य चांगलेच रंगले आहेत. काहींना उमेदवारी मिळाली नाही म्हणून तर काहींना प्रभाग सुटला नाही म्हणून. तर काही जण युती झाले आहे म्हणून नाराज आहेत. ही नाराजी आता बाहेर येवू लागली आहे. त्यातूनच एकनाथ शिंदेंचे कट्टर समर्थक कैलाश शिंदे यांनी माझी पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी एकनाथ शिंदेंकडेच केली आहे. त्यासाठी त्यांनी पत्र लिहीले आहे. त्यात त्यांनी आपली हकालपट्टी का करा याची कारणेच दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपवर आगपाखड करताना आपल्या पक्षावरही टीकेची झोड उठवली आहे. या मुळे कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलेच तापवे आहे. 

शिंदे यांनी शिंदेनाच लिहीलेल्या पत्राची सध्या चांगलीच चर्चा आहे. ते पत्रात लिहीतात कल्याण डोंबिवली महापालिकेत (KDMC)  चार प्रभागाची निवडणूक लागली आहे. सामान्य उमेदवाराला चार प्रभागाचा खर्च परवडणारा नाही. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची पक्षाला कदर राहीलेली नाही. आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांच्याबरोबर आम्ही काम केलं असं कैलाश शिंदे यांनी या पत्रात म्हटलं आहे.  एकनाथ शिंदे गुजरातला गेले. तेव्हा त्यांच्या समर्थनार्थ प्रथम मी पोस्ट टाकली होती. पक्षात सगळी दहिहंडी झाली आहे अशी टीका ही त्यांनी केली. जुने लोक हे खालच्या थराला आहेत. काल पक्षात आलेले वरच्या थरावर गेले आहेत. त्यांनी पदं दिली जात आहेत अशी नाराजी ही त्यांनी व्यक्त केली. 

नक्की वाचा - Trending News: सर्वच पक्षांना घराणेशाहीची लागण!, कोणाच्या नातेवाईकांना मिळाली उमेदवारी? पाहा संपूर्ण लिस्ट

शिवाय भाजप सोबत झालेली युती आपल्याला अजीबात मान्य नाही. गेली 20 वर्षा आम्ही भाजप सोबत लढत आहोत. भाजप हा पक्ष आपल्याला बिल्कुल आवडत नाही. त्यांनी लोकसभेनंतर विधानसभेला शिवसेनेचे काम केले नाही. त्यांचे काम आता आम्ही का करावे? युती झाली असती काय आणि झाली नसती काय आम्ही भाजपचा कधीच प्रचार केला नसता असं ही ते म्हणाले. शिवाय आपवे कार्यकर्ते हे मुस्लीम आहेत. पण भाजपवाले त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी देत आहेत. त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कोणत्या तोंडाने मते मागायला जायची असा प्रश्न ही त्यांनी केला आहे. त्यांनी पक्षाच्या सध्याच्या कार्यपद्धतीबाबतही नाराजी व्यक्त केली. त्याच बरोबर भाजपसोबत युतीची गरजच नव्हती असंही 

नक्की वाचा - Pune News: 'सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळणार', बड्या नेत्याच्या बड्या दाव्याने राजकारणात खळबळ

अशा स्थितीत पक्षात राहून काम कसं करायचं. त्यामुळे नाव खराब करण्यापेक्षा मला पक्षातून काढून टाका अशी थेट मागणी कैलास शिंदे यांनी पत्रा द्वारे एकनाथ शिंदेंकडे केली आहे. यापुढे शांतीत आयुष्य जगायचं आहे. भाजपसोबतची युती ही मान्य नाही. भाजप मला आवडत नाही. ही युती  वैगरे काही नाही तो देखावा आहे. विधानसभेला भाजपने आमचं काम केलं नाही. राजेश मोरेचे ही काम केले नाही. श्रीकांत शिंदेचे काम केले नाही. त्यामुळे सर्वाचा विचार करून बाजूला होण्याचा निर्णय घेतला असल्याचं ही त्यांनी या निमित्ताने सांगितलं. त्यांचे पत्र सध्या जोरदार व्हायरल होत आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com