Nashik Lok Sabha Election : नाशिक लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर झालाय. नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा उमेदवारी मिळालीय. नाशिकच्या जागेसाठी महायुतीमधील तिन्ही पक्ष आग्रही होते. त्यामुळे याबाबतची घोषणा लांबली होती. अखेर शिवसेनेकडं ही जागा कायम ठेवण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यशस्वी झालेत.
नाशिक लोकसभा मतदारसंघातून 2009 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ विजयी झाले होते. त्यानंतर 2014 आणि 2019 साली शिवसेनेच्या हेमंत गोडसे यांनी बाजी मारली. गोडसे यांनी 2014 मध्ये छगन भुजबळांचा तर मागील लोकसभा निवडणुकीत समीर भुजबळांचा पराभव केला होता. नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे.
ठाणे-कल्याणचे उमेदवारही ठरले
शिवसेना शिंदे गटाकडून ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर नरेश म्हस्के आणि कल्याणमधून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे गटातील उमेदवारांची संख्या आता 15 झाली आहे.
( नक्की वाचा : पालघरची जागा भाजपा लढवणार, 'NDTV मराठी' च्या लोकार्पण कार्यक्रमात फडणवीसांची घोषणा )
आता फक्त पालघर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर होणे बाकी आहे. पालघरची जागा भाजपा लढवणार असून आज किंवा उद्या उमेदवाराची घोषणा होईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'NDTV मराठी' च्या लोकार्पण कार्यक्रमात केली आहे,.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world