महायुतीत नाशिक लोकसभेवर तोडगा निघण्या ऐवजी त्याचा गुंता आणखी वाढताना दिसतोय. ही जागा भाजप, शिवसेना शिंदे गटाला की अजित पवारांच्या राष्ट्रवादीला याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. एकीकडे छगन भुजबळांनी निवडणुकीतून माघारीची घोषणा केली. पण राष्ट्रवादीने दाव काही सोडला नाही. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाने तयारीला लागावे अशा सुचना एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. असं असलं ती त्यांनी उमेदवार काही जाहीर केलेला नाही. त्यात आता आणखी एक ट्वीस्ट निर्माण झाला आहे. महंत अनिकेत शास्त्री यांनी आपल्याला भाजप श्रेष्ठींनी नाशिकसाठी तयारी करण्याचे आदेश दिल्याचे वक्तव्य करत एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे आता महायुतीत या जागेवरून घमासान होणार अशीच चर्चा आहे.
'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा
महंत अनिकेत शास्त्री भरणार अर्ज
अनिकेत शास्री यांनी आपल्याला भाजप श्रेष्ठींनी तयारी करण्याचे आदेश दिले आहेत असा दावा केला आहे. त्यानुसार त्यांनी उमेदवारी अर्ज ही घेतला आहे. सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव केल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय आपल्याला हे आदेश केंद्रीय भाजप नेत्यांबरोबरच राज्यातल्या नेत्यांनीही दिले असल्याचे स्पष्ट केले. नाशिक हे हिंदू धर्मासाठी महत्वाचे ठिकाण आहे. कोणत्याही क्षणी उमेदवारी जाहीर होऊ शकते असेही ते म्हणाले. खासदार साक्षी महाराज यांचा आपल्याला आशिर्वाद आहे असंही त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी पाठोपाठ भाजपनेही या जागेवरचा आपला दावा सोडलेला नाही. त्यामुळे महायुतीत नाशिक बद्दल नक्की काय चाललं आहे याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान शांतिगिरी महाराजांनीही उमेदवारी अर्ज घेतला आहे.
हेही वाचा - 'पैसे घेऊन मतदान न करणे गुन्हा नाही' माजी आमदाराचा अजब सल्ला
हेमंत गोडसे यांनीही घेतला अर्ज
नाशिक लोकसभेतून निवडणूक लढण्यास विद्यामान खासदार हेमंत गोडसे इच्छुक आहेत. मात्र त्यांची उमेदवारी अजूनही जाहीर झालेली नाही. शिवाय अजय बोरस्तेही इच्छुक आहेत. त्यात हेमंत गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्जही घेतला आहे. मात्र त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही. तर छगन भुजबळ यांचे निकटवर्ती दिलीप खैरे यांनी ही उमेदवारी अर्ज घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील प्रत्येक इच्छुकाने उमेदावारी अर्ज घेतला आहे. मात्र कोण अधिकृत उमेदवार असणार याचा सस्पेन्स मात्र कायम आहे.
महाविकास आघाडीच मुसंडी
महायुतीचा उमेदवार अजूनही जाहीर झालेला नाही. अशा वेळी महाविकास आघाडीचे आपला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. ही जागा शिवसेना ठाकरे गटाला गेली आहे. त्यांनी राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी प्रचारात मुसंडी मारली आहे. ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळेल अशी आशा विजय करंजकर यांना होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. ही बाब सोडली तर महाविकास आघाडीकडून प्रचारात आघाडी घेण्यात आली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world