राज्य सरकारनं सुरु केलेली 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना महायुतीच्या प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. या योजनेमुळे राज्यातील लाभार्थी महिलांच्या खात्यात महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून प्रत्येक महायुतीचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता या योजनेचा प्रचार करतोय. आगामी निवडणुकीनंतर पुन्हा सत्ता आली तर या योजनेची रक्कम वाढवून 2100 करण्याची घोषणा महायुतीनं केली आहे. पण, याच लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेत असताना भाजपा खासदार धनंजय महाडिक यांची जीभ घसरली.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचार सभेत बोलताना महाडीक यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. सरकारचे पैसे घ्यायचे आणि तिकडे जायचं असं चालणार नाही, असं त्यांनी सांगितलं.
काय म्हणाले महाडिक?
धनंजय महाडिक प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, 'इथं तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या ज्या 1500 रुपये आपल्या योजनेच्या घेतात त्यांचे फोटो काढून घ्या. त्यांची नावं लिहून घ्या. आपल्या शासनाचं घ्याचं आणि त्यांचं गायचं हे नाव चालणार नाही. अनेक जण छाती बडवतात आम्हाला पैसे नकोत, सुरक्षा हवी. तुम्ही राजकारण करता. काँग्रेसच्या रॅलीत महिला दिसल्या तर जाऊन फोटो काढा. आमच्याकडं फोटो द्या आणि आम्ही त्यांची व्यवस्था करतो.' असं महाडिक बजावलं. त्यांच्या भाषणातील ही क्लिप व्हायरल झाली आहे.
( नक्की वाचा : Exclusive : अटलबिहारी वाजपेयी यांच्या फोननंतर बाळासाहेब ठाकरेंनी कोणता निर्णय बदलला? )
प्रणिती शिंदेंची टीका
दरम्यान सोलापूरच्या खासदार आणि काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांनी धनंजय महाडिक यांच्या वक्तव्यावर टीका केली. प्रणिती यांनी त्यांच्या प्रचारसभेत महाडिक यांच्या वक्तव्याची क्लिप दाखवली. भाजपा सरकार महिलांना तुच्छ लेखणारं आहे, असं प्रणिती यावेळी म्हणाल्या. त्यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world