जाहिरात

मावळ पॅटर्नचा फटका महायुतीच्या सुनील शेळके यांना बसणार? गणित काय?

जिल्ह्यातील 21 मतदार संघापैकी 20 मतदार संघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होत आहे. मात्र मावळमध्ये महायुती विरुद्ध अपक्ष अशी चुरशीची लढत रंगली आहे.

मावळ पॅटर्नचा फटका महायुतीच्या सुनील शेळके यांना बसणार? गणित काय?
पुणे:

सूरज कसबे

पुणे जिल्ह्यातील राजकारणात सध्या मावळ विधानसभा मतदार संघाची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. जिल्ह्यातील 21 मतदार संघापैकी 20 मतदार संघात  महायुती विरुद्ध महाविकास आघाडी  अशी थेट लढत होत आहे. मात्र मावळमध्ये महायुती विरुद्ध अपक्ष अशी चुरशीची लढत रंगली आहे.त्यातच लोकसभेला ज्याप्रमाणे सांगली पॅटर्न राबविण्यात आला त्याच धर्तीवर मावळात मावळ पॅटर्न राबविण्यात येत असल्याची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. मावळ विधानसभा मतदार संघात निवडणुकीच्या रिंगणात 6 उमेदवार आहेत. त्यात मुख्य लढत ही महायुती मधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुनिल शेळके आणि  राष्ट्रवादीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या बापू भेगडे यांच्यात होत आहे.

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विधानसभा निवडणुकीत मावळ विधानसभा मतदार संघावर भारतीय जनता पक्षाने दावा केला होता. मात्र महायुतीत ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटली. त्यानंतर राष्ट्रवादीची अधिकृत उमेदवारी सुनिल शेळके यांना देण्यात आली. त्यातच उमेदवारी न मिळाल्याने  नाराज असलेले राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचं जाहीर केलं. त्याच भूमिकेवर ते ठाम राहिले. महाविकास आघाडीला या मतदार संघात सक्षम उमेदवार न मिळाल्याने त्यांनी अखेर अपक्ष बापू भेगडे यांना पाठिंबा दर्शविला आहे.  तर दुसरीकडे उमेदवारी न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाने मतदार संघात मावळ पॅटर्न राबविण्यास सुरुवात केली आहे. सध्या याच मावळ पॅटर्नची चर्चा मतदार संघातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात रंगू लागली आहे. त्यामुळे सांगली प्रमाणे मावळ पॅटर्न यशस्वी ठरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

ट्रेंडिंग बातमी - 'मोदींना महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांची जागा दाखवली' पवारांनी तोफ डागली

लोकसभा निवडणुकीत सांगली लोकसभा मतदार संघात सांगली पॅटर्न राबविण्यात आला. त्यात काँग्रेस पक्षाचे बंडखोर विशाल पाटील यांचा दणदणीत विजय झाला. ते खासदार झाले. त्यात त्यांना मदत केली ती काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी. आता याचीच पुनरावृत्ती मावळ मतदारसंघांमध्ये सुद्धा होत आहे. महायुतीने सुनील शेळके यांना उमेदवारी दिल्याने भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री असलेल्या बाळा भेगडे यांनी त्यांच्या 40 सहकाऱ्यांसह राजीनामे दिले. शिवाय अपक्ष बापू भेगडे यांचं काम करायचं ठरवलं आहे.  

ट्रेंडिंग बातमी - 'महाराष्ट्राला काँग्रेसचं ATM करु नका,' पंतप्रधान मोदींचं मतदारांना आवाहन

भारतीय जनता पक्षाच्या देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षादेश दिला असताना सुद्धा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे हे आपल्या भूमिकेवर ते ठाम आहेत. कोणत्याही परिस्थितीत बापू भेगडे यांना निवडून आणल्याशिवाय माघार घेणार नसल्याचेते बोलत आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही बापू भेगडे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळं हा मावळ पॅटर्न कितपत  सक्सेसफुल ठरतो ? हे  निवडणूक  निकालानंतरच समजेल.

ट्रेंडिंग बातमी - मविआचे सरकार आल्यास संघावर बंदी घालण्याचा विचार करणार ! काँग्रेसचे उलेमा बोर्डाला लेखी आश्वासन

महायुतीचे उमेदवार सुनिल शेळके हे माझ्या सोबत माझी जनता आहे. मी केलेल्या विकास कामाच्या जोरावर मी पुन्हा विजयी होईल असं म्हणत आहेत. त्यामुळे मावळात पुन्हा सुनील शेळके याचा विजय होतो की , राबविण्यात आलेल्या मावळ पॅटर्न यशस्वी होऊन बापू भेगडे आमदार होणार हे येत्या 23 तारखेच्या निकालाला नंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र दोन्ही गट आपणच जिंकणार असा दावा करत आहेत. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com