संजय तिवारी, प्रतिनिधी
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 13 दिवसांमध्ये महाराष्ट्रभरात फिरून महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. 18 तारखेला म्हणजे प्रचाराच्या अखेरच्या दिवशी होणाऱ्या चार सभांसह त्यांच्या एकूण जाहीरसभा तसेच रोड शोजची संख्या 72 होईल.
गेल्या दोन आठवड्यांपासून अख्खा महाराष्ट्र नितीन गडकरी यांच्या सभांचा झंझावात आणि त्यांना मिळणारा प्रतिसाद अनुभवत आहे. महायुतीच्या उमेदवारांना बळ देण्यासाठी गडकरी यांनी दररोज सरासरी सात सभांना संबोधित केले. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई असा जवळजवळ पूर्ण महाराष्ट्र गडकरी यांनी पालथा घातला.
नक्की वाचा - पुढचा मुख्यमंत्री कोण? थेट नाव सांगितलं, शिंदेंचा शिलेदार शेवटी बोललाच
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी नितीन गडकरी हे भाजपचे स्टार प्रचारक आहेत. त्यामुळे महाराष्ट्रभर त्यांचा प्रचारदौरा होणार हे आधीच निश्चित होते. त्यानुसार 4 नोव्हेंबरला नागपूरमधून त्यांच्या सभांना सुरुवात झाली. पहिल्या दिवशी दक्षिण, पूर्व आणि मध्य नागपुरात त्यांच्या सभा झाल्या. त्यानंतर ७ ते 17 नोव्हेंबर या कालावधीत त्यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी नॉन स्टॉप जाहीरसभा घेतल्या. गडचिरोली ते मुंबई अख्खा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातला.
9 नोव्हेंबरला तर कारंजा-घाडगे, पुलगाव, समुद्रपूर, वर्धा, हिंगणघाट आणि हिंगणा (बुटीबोरी) अशा सहा मतदारसंघांमध्ये एकाच दिवशी त्यांनी सभा घेतल्या. 15 नोव्हेंबरला एकाच दिवशी आठ मतदारसंघांमध्ये सभा घेतल्या. या दिवशी आष्टी, कुरखेडा, नागभीड, उमरेड, कामठी, दक्षिण नागपूर, मध्य नागपूर व पूर्व नागपूर अशा आठ मतदारसंघांमध्ये त्यांनी सभा घेतल्या.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
प्रचाराच्या अखेरच्या दिवशीही चार सभा
18 नोव्हेंबरला (सोमवार) प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. अखेरच्या दिवशी देखील गडकरी यांच्या चार सभा होणार आहेत. यातील दोन सभा गोंदियातील सडक अर्जुनी व तिरोडा येथे तर प्रत्येकी एक सभा आणि कामठीत एक व मध्य नागपुरातील गोळीबार चौकात एक अशा चार सभा होणार आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world