राज ठाकरे यांच्या मनसेने विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या आहेत. पहिल्या यादीत 9 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. तर दुसऱ्या यादीत 45 उमेदवारांची घोषणा करण्यात आली. या दोन्ही यादी जाहीर करताना त्यांनी 9 हा अंक त्यात येईल याची काळजी घेतली आहे. पहिल्या यादीत 9 आकडा आहे. तर दुसऱ्या यादीत 45 म्हणजेच 4+5=9 अशा पद्धतीने 9 हा आकडा साधण्यात आला आहे. या मागे अंकशास्त्र असल्याचे सांगितले जाते. राज ठाकरे यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीमध्ये 9 या अंकाचे विशेष महत्व दिसून आले आहेत.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मनसेने उमेदवारांची यादी जाहीर करताना अंक गणित याकडे आवर्जून लक्ष दिले आहे. गेले अनेक दिवस राजकीय पक्ष उमेदवार जाहीर करताना किधी जाहीर करणार याकडे सगळ्यांचे लक्ष होतं. रात्री उशिरा मनसेने दुसरी यादी जाहीर केली. त्यात त्यांनी 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मनसेसाठी कायम नऊ अंक लकी समजला जातो. त्यामुळेच दुसऱ्या यादीत 45 जणांची घोषणा करतण्यात आली. त्याची बेरीज केली तर ती नऊ होते.
ट्रेंडिंग बातमी - राज यांचा मास्टर स्ट्रोक, लेकाला माहिममधून उमेदवारी का? इतिहास काय सांगतो?
राज ठाकरे त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये नऊ अंकाला प्राधान्य देतात. यामुळे त्यांच्या गाडीचा क्रमांक असो, अथवा कोणती राजकीय भूमिका घ्यायचा दिवस असो त्यावेळी आवर्जून नऊ अंक येईल हे पाहतात. मनसेच्या स्थापना दिवस देखील नऊ तारखेलाच होता. यामुळे नऊ अंकाचे महत्व राज ठाकरेसाठी मोठे आहे. राजकीय नेते भविष्यशास्त्रावर जास्त आधारित असतात असं म्हटलं जातं. उमेदवारांची यादी येताना देखील ते या गोष्टीकडे लक्ष देतात.
ट्रेंडिंग बातमी - वारे वा निवडणूक ! 2 दिवसात 4 पक्षात प्रवेश करणारा उपसरपंच, त्यांनी असं का केलं?
दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुद्धा भविष्यशास्त्रावर विश्वास असल्याचे म्हटले जाते. यामुळेच मुख्यमंत्री होण्या आधी त्यांनी सर्व आमदारांना कामाख्या देवीच्या दर्शनाला नेले होते. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्यानंतर संपुर्ण मंत्रिमंडळ दर्शनासाठी गेले होते. दरम्यान शिवसेना शिंदे गटाची यादी ही जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 45 जणांचा समावेश आहे. या यादीतही नऊ क्रमांक कसा येईल याची काळजी घेण्यात आली आहे.
भविष्यशास्त्र आणि अंकशास्त्राचे एक वेगळे महत्व आहे. अनेकांचा त्यावर विश्वासही आहे. नऊ अंक हा हेतूचा अंक मानला जातो. अंकशास्त्रानुसार पूर्ण अंक आणि शक्तिशाली अंक म्हणून नऊ अंकाकडे पाहिले जाते. असे अंकशास्त्राचे अभ्यासक अमित विभूते सांगतात. परिपूर्णता आणि ताकतवर या हेतूने नऊ अंकाचा विचार आवर्जून केला जातो. यामुळेच नऊ अंकाला अनेक जण प्राधान्य देतात. त्यामुळे मनसे आणि शिवसेनेच्या यादीत नऊचा प्राधान्य दिसून येत असल्याची चर्चा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world