जाहिरात
15 minutes ago

Election Results 2026 Live: राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांमध्ये जनतेने कोणाला कौल दिलाय, याचं चित्र थोड्याच वेळात स्पष्ट होणार आहे.

Thane Municipal Corporation Election Results 2026 Eknath Shinde's Shiv Sena and BJP Lead in Stronghold

TMC Election 2026: ठाण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवार गटाची कामगिरीही काही जागांवर लक्षवेधी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या 28 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 13 विजयी उमेदवारी शिवसेनेचे आहे.

BMC Election Results 2026 Live: वरळी विधानसभेत सातपैकी सहा ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाचा विजय

वरळी विधानसभेत सातपैकी सहा ठिकाणी मशाली पेटल्या

तर एकाच प्रभागात धनुष्यबाणाचा विजयी 

वॉर्ड क्रमांक 193 हेमांगी वरळीकर विजयी

वॉर्ड क्रमांक 194 निशिकांत शिंदे विजयी

वॉर्ड क्रमांक 195 विजय भणगे विजयी

वॉर्ड क्रमांक 196 पद्मजा चेंबूरकर विजयी

वॉर्ड क्रमांक 198 अबोली खाडे विजय

वॉर्ड क्रमांक 199 माझी महापौर किशोरी पेडणेकर विजयी

फक्त वॉर्ड क्रमांक 197 मध्ये शिंदे गटाचे स्थानिक विभाग अध्यक्ष दत्ता नरवणकर यांच्या पत्नी वनिता नरवणकर विजयी 

Election Results: प्रभाग क्रमांक 227मधून राहुल नार्वेकर यांची बहीण गौरी नार्वेकर विजयी

Election Results 2026 Live: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ठाकरे बंधूंना टोला

Vasai Virar Election: भाजपने आता वसई-विरारच्या विकासासाठी आमच्यासोबत सहकार्य करावे: हितेंद्र ठाकूर

BMC Election result 2026 Winning candidate list shivsena BJP MNS Congress

BMC Election Result 2026 : मुंबई महापालिकेतील कलांच्या आकडेवारीनुसार, महायुती ११९, ठाकरे बंधु, ८३ आणि काँग्रेस-इतर २५ उमेदवार आघाडीवर आहेत. तर अधिकृत ६८ विजयी उमेदवारांचा यादी देखील समोर आली आहे

TMC Election Results 2026 Live ठाणे:राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांचा पराभव

ठाणे:राजन विचारे यांच्या पत्नी नंदिनी विचारे यांचा पराभव 

प्रभाग क्रमांक 12मधून नंदिनी विचारे पराभूत

भाजप उमेदवार काजल गुनिजन विजयी

BMC Election Results 2026 Live: वॉर्ड क्रमांक 97मधून भाजप उमेदवार हेतल गाला विजयी

वॉर्ड क्रमांक 97मधून भाजप उमेदवार हेतल गाला विजयी

वॉर्ड क्रमांक 98मधून भाजप उमेदवार अलका सुभाष केरकर विजयी

वॉर्ड क्रमांक 16मधून भाजप उमेदवार श्वेता कोरगावकर विजयी

BMC Election Results 2026 Live प्रभाग क्रमांक 190मधून भाजपच्या शीतल गंभीर विजयी

प्रभाग क्रमांक 190: भाजपच्या शीतल गंभीर यांचा विजय 

ठाकरे गटाच्या वैशाली पाटणकर यांचा पराभव 

शीतल गंभीर -11,458 मतं 

वैशाली पाटणकर  -11,333 मतं

BMC Election Results 2026 Live: मुंबई -वॉर्ड क्रमांक 15मधून भाजप जिग्नासा शहा विजयी

BMC Election Results 2026 Live: मुंबई -वॉर्ड क्रमांक 15मधून भाजप जिग्नासा शहा विजयी

BMC Election Results 2026 Live: भाजप बंडखोर उमेदवार शिल्पा कळुसकर यांनी मतदारांचे आभार मानले

bjp wins more than 60 seats in navi mumbai corporation election 2026 result ganesh naik horse ride old video viral

नवी मुंबई महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी घेतली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, भाजप-66,शिवसेना-42, शिवसेना (UBT)-2, मनसे-1 जागा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. अशातच गणेश नाईकांचा घोडे सवारीचा जुना व्हिडीओ व्हायरल झालाय.

BMC Election Results 2026 Live: मुंबईतील भाजप कार्यालयात CM देवेंद्र फडणवीसांचे जंगी स्वागत

BMC Election Results 2026 Live: मुंबईतील विजयी 68 उमेदवार

मुंबईतील विजयी 68 उमेदवार

१. रेखा यादव- शिवसेना शिंदे गट

२. तेजस्वी घोसाळकर- भाजप

३. प्रकाश दरेकर- भाजप

४. मंगेश पांगारे- शिवसेना शिंदे गट

५. संजय घाडी- शिवसेना शिंदे गट

६. दीक्षा कारकर- शिवसेना शिंदे गट

९ शिवानंद शेट्टी- भाजप 

१०. जितेंद्र पटेल - भाजप

१२. सारिखा झोरे- ठाकरे गट

१३. राणी द्विवेदी-निघूट - भाजप

१४. सीमा शिंदे- भाजप

२०. दीपक तावडे-  भाजप

२१. लीना पटेल-देहेरकर - भाजप

२२. हिमांशु पारेख- भाजप

२३. शिवकुमार झा- भाजप

२५. निशा परुळेकर-बंगेरा- भाजप

२६. धर्मेंद्र काळे- उबाठा

३२. गीता भंडारी- उबाठा

३३. कमर जहाँ सिद्दीकी- काँग्रेस

३५. योगेश वर्मा- भाजप

३६. सिद्धार्थ शर्मा- भाजप

३७. योगिता कदम- उबाठा

३८. सुरेखा परब- मनसे

३९. पुष्पा कळंबे- उबाठा

४०. तुळशीराम शिंदे- उबाठा

४१. सुहास वाडकर- उबाठा

४६. योगिता कोळी- भाजप

४७. तेजिंदर तिवाना- भाजप

५०. विक्रम राजपूत- भाजप

५१. वर्षा टेंबवलकर- शिवसेना शिंदे गट

५२. प्रिती सातम- भाजप

५३. जितेंद्र वळवी- उबाठा

५६. लक्ष्मी भाटिया- उबाठा

५७. श्रीकला पिल्ले- भाजप

८३. सोनाली साबे- उबाठा

८४. अंजली सामंत- भाजप

८५. मिलिंद शिंदे- भाजप

८७. पूजा महाडेश्वर- उबाठा

८८. श्रवरी परब- उबाठा

८९. गितेश राऊत- उबाठा

९०. ट्युलिप मिरांडा- काँग्रेस

१०३. हेतल मोर्वेकर- भाजप

१०४. प्रकाश गंगाधरे- भाजप

१०६. प्रभाकर शिंदे- भाजप

१०७. नील सोमय्या- भाजप

१२३. सुनील मोरे- उबाठा

१२४. सकीना शेख उबाठा

१२६. अर्चना भालेराव- भाजप

१२७. स्वरुपा पाटील- उबाठा

१२८. सई शिर्के- मनसे

१६३. शैला लांडे- शिवसेना शिंदे गट

१६५. अशरफ आझमी- काँग्रेस

१६६. मीनल तुर्डे- शिवसेना शिंदे गट

१६७. समन आझमी- काँग्रेस

१६८. डॉ. सईदा खान- NCP, अजित पवार

१६९. प्रविणा मोरजकर- उबाठा

१७०. बुशरा मलिक- NCP, अजित पवार

१७१. राणी येरुणकर- उबाठा

१७२. राजश्री शिरवडकर- भाजप

१७३. शिल्पा केळुसकर- भाजप

१७४. साक्षी कनोजिया- भाजप

१७५. मानसी सातमकर- शिंदे

१८२. मिलिंद वैद्य- उबाठा

१८३. आशा काळे, काँग्रेस

१८४. साजिदा खान- काँग्रेस

१८६. अर्चना शिंदे- उबाठा

१८७. जोसेफ कोळी- उबाठा

BMC Election Results 2026 Live: ठाकरे कुटुंबाचे राज्य आता इतिहासजमा झालंय: मंत्री मंगलप्रभात लोढा

BMC Election Results 2026 Live: महायुतीलाच बहुमत मिळणार आहे: CM देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

- सर्वप्रथम महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो.

- 29 पैकी 25 महानगरपालिकांमध्ये भाजप /महायुतीची सत्ता येतेय, महाविजय मिळालेला आहे.

- जनतेसमोर विकासाचा अजेंडा घेऊन गेलो होता.

- महायुतीलाच बहुमत मिळणार आहे.

- महाराष्ट्राचा विश्वास हा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच आहे.

- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचंही स्मरण करतो, त्यांचाही आशीर्वाद आमच्या पाठीशी होता.

Uddhav Thackeray Majority candidates in Parbhani Municipal Corporation 2026 election

ठाण्यात ठाकरेंना मोठा धक्का सहन करावा लागला. पुण्यात तर ठाकरेंना भोपळाही फोडता आला नाही. पुण्यात भाजप ८०, अजित पवार गट ६, काँग्रेस ३, शरद पवार गट ३ जागांवर आघाडीवर आहे.

BMC Election Results 2026 Live: मुंबईत फक्त दोनच भाऊ… लाडका भाऊ आणि देवभाऊ!: मिलिंद देवरा

BMC Election Results 2026 Live: मुंबईत फक्त दोनच भाऊ… लाडका भाऊ आणि देवभाऊ!: मिलिंद देवरा

BMC Election Results 2026 Live: जवळपास 100 वॉर्डमधील मतमोजणीस सुरुवातही नाही : संजय राऊत, नेते, शिवसेना UBT

BMC Election Results 2026 Live: ज्यांनी मुंबई महानगरपालिकेला लुटले आणि या निवडणुकीत लोकांचे लक्ष भावुक मुद्यांकडे आकर्षिक करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मुंबईच्या जनतेने नाकारलंय: मिलिंद देवरा, शिवसेना खासदार

BMC Election Results 2026 Live: वॉर्ड क्रमांक 13 आणि 14मधून भाजप उमेदवार विजयी

मुंबई : वॉर्ड क्रमांक 13मधून भाजपच्या राणी द्विवेदी विजयी 

मुंबई : वॉर्ड क्रमांक 14मधून भाजपच्या सीमा शिंदे विजयी

BMC Election Results 2026 Live: प्रभाग क्रमांक 92मधून काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद इब्राहिम कुरैशी विजयी

BMC Election Results 2026 Live: प्रभाग क्रमांक 92मधून काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद इब्राहिम कुरैशी विजयी 

bjp mp nishikant dubey accepts mns raj Thackeray challenge shared tweet on social media bmc election 2026 result

मुंबई महापालिकेत शिवसेना (UBT)आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना पराभवाच्या उंबारठ्यावर असतानाच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ट्वीट करून खळबळ उडवली आहे.

BMC Election Results 2026 Live: मुलुंड प्रभाग क्रमांक 107चे भाजप उमेदवार नील सोमय्या विजयी

मुलुंड प्रभाग क्रमांक 107चे भाजप उमेदवार नील सोमय्या 21229 इतकी मतं घेऊन विजयी

दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष उमेदवार दिनेश जाधव यांना 6224 मतं

नील सोमय्या यांचा 15,005 मतांनी विजय

मुलुंड मधील सर्व सहा वॉर्डमध्ये भाजपा विजयी

वर्ष 2017 बीएमसी निकालाची मुलुंडमध्ये पुनरावृत्ती

Mumbai BMC Election Results 2026 Live: ठाकरे आणि शिंदेंचे कार्यकर्ते आमनेसामाने, पोलीस सतर्क

  • वरळीच्या मतमतमोजणी केंद्रासमोर जल्लोष करताना ठाकरे शिवसेनेचे कार्यकर्ते आणि शिंदे शिवसेनेचे कार्यकर्ते समोरासमोर  
  • वरळी विधानसभा मतदारसंघातून 197 वॉर्डमधून वनिता नरवणकर या शिंदे शिवसेनेचे उमेदवार विजयाच्या वाटेवर 
  • तर आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेचे चार उमेदवार वरळीतून विजयी 
  • तर पाचवा उमेदवार अबोली गोपाल खाड्येही विजयाच्या वाटेवर 
  • वरळी येथील मतदान मोजणी कक्षाबाहेर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष सुरू 
  • कार्यकर्त्यांमध्ये वादावादी होऊ नये यासाठी पोलीसही सतर्क

BMC Election Results 2026 Live शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर विजयी

मुंबई: प्रभाग क्रमांक 199 मधून शिवसेना ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर विजयी 

BMC Election Results 2026 Live: प्रभाग क्रमांक 223मधून काँग्रेसचे ज्ञानराज निकम विजयी

काँग्रेस पक्षाचा दक्षिण मुंबईत आणखी एक विजय

प्रभाग क्रमांक 223 मधून ज्ञानराज निकम विजयी

एकनाथ शिंदे यांच्या उमेदवार प्रिया पाटील यांचा पराभव

प्रभाग क्रमांक 213मधून काँग्रेसच्या उमेदवार नसीमा जुनेच्या विजयी 

एकनाथ शिंदे यांच्या माजी नगरसेविका अशा मामेडी यांचा पराभव

Vasai Virar Election Results 2026 BVA Secures Majority with 71 Seats BJP loose hitendra thakur

Vasai Virar Election Result 2026: भाजपने 43 जागा जिंकून मुख्य विरोधी पक्षाची जागा भक्कम केली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिल्पा दिवाकर सिंग या एकमेव उमेदवार विजयी झाल्या आहेत. 

Election Results 2026 Live: मुंबई प्रभाग क्रमांक 225मधून भाजपच्या हर्षिता नार्वेकर विजयी

Election Results 2026 Live: मुंबई  प्रभाग क्रमांक 225मधून भाजपच्या हर्षिता नार्वेकर विजयी

Election Results 2026 Live: देवाभाऊचं खरा धुरंधर: चित्रा वाघ, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष

विरोधकाच्या विचारांना पडलं खंडर,  जनतेने ठरवलं की देवाभाऊचं खरा धुरंधर: चित्रा वाघ, भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष

BMC Election Results 2026: Raj Thackeray's MNS Faces Massive Defeat; 'Thackeray Brand' Fails to Stop BJP-Shinde Wave in Mumbai and Beyond

Maharashta Election 2026 : विधानसभा निवडणुकांपाठोपाठ महानगरपालिका निवडणुकीतही राज ठाकरेंच्या पक्षाचा राज्यात सफाया झाला आहे.

Election Results 2026 Live Updates: प्रभाग क्रमांक 72चा निकाल स्थगित

मुंबईतील प्रभाग क्रमांक 72चा निकाल स्थगित

प्रभाग क्रमांक 72मध्ये मतमोजणी प्रक्रियेदरम्यान गोंधळ झाल्याचा शिवसेनेचा (UBT) आरोप

तीन ते चार मत पेट्या गायब असल्याचा आरोप 

राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहून याचा निर्णय स्थगित करण्याची विनंती केली होती 

राज्य निवडणूक आयोगाकडून अनुमती देण्यात आलीय 

Election Results 2026 Live: प्रभाग क्रमांक 197 शिवसेनाशिंदे गटाच्या वनिता नरवणकर विजयी

प्रभाग क्रमांक 197 शिवसेनाशिंदे गटाच्या वनिता नरवणकर विजयी, मनसेला धक्का

मनसे उमेदवार रचना साळवी पराभूत 

Election Results 2026 Live प्रभाग क्रमांक 59: भाजपचे रुपेश गजानन सावरकर विजयी

प्रभाग क्रमांक 59: भाजपचे रुपेश गजानन सावरकर विजयी

KDMC Election Results 2026 Updates: मनसेला कल्याणमध्ये मोठा धक्का

मनसेला कल्याणमध्ये मोठा धक्का

धात्रक परिवरातले तीनही उमेदवार पराभूत

शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, पूजा धात्रक यांचा पराभव

TMC Election Results 2026 Updates: प्रकाश शिंदे विजयी

ठाणे: प्रभाग क्रमांक 17 मधून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे विजयी

Election Results 2026 Live: प्रभाग 5मध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी विजयी

प्रभाग 5मध्ये शिवसेना शिंदे गटाचे संजय घाडी विजयी 

संजय घाडी यांना एकूण 15348 मतं मिळाली 

शिवसेना (UBT) उमेदवार सुजाता पाटेकर यांना 10420 मतं मिळाली. 

TMC Election Results 2026 Updates: मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे पराभूत

ठाणे मनसेचे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे पराभूत 

प्रभाग क्रमांक 02मधून मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांचा पराभव 

भाजपचे मनोहर डुंबरे यांना एकूण 12210 मतं मिळाली. 

TMC Election Results 2026 Updates: शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती पराभूत

TMC Election Results 2026 Updates:  

ठाणे: प्रभाग क्रमांक 13

शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर अशोक वैती पराभूत 

उबाठा गटाचे शहाजी खुस्पे विजय

Mira Bhayandar Municipal Corporation: मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाने जिंकल्या 52 जागा

मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची एक हाती सत्ता

52 जागांवर भाजप विजयी

Election Results 2026 Live: प्रभाग क्रमांक 84, 85मधून भाजप उमेदवार विजयी

प्रभाग क्रमांक : 85

भाजपचे उमेदवार मिलिंद रामनाथ शिंदे विजयी

प्रभाग क्रमांक: 84

भाजप उमेदवार अंजली अभिजीत सामंत विजयी

KDMC Election Results 2026: कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 4मधून शिवसेना शिंदे गटाच्या नमिता पाटील विजयी

कल्याण डोंबिवली प्रभाग क्रमांक 4मधून शिवसेना शिंदे गटाच्या नमिता पाटील 8 मतांनी विजयी, ठाकरे गटाच्या रुपा शेट्टी पराभूत

Election Results 2026 Live: प्रभाग क्रमांक 216मध्ये काँग्रेस उमेदवार राजश्री महेश विजयी

प्रभाग क्रमांक 216मध्ये काँग्रेस उमेदवार राजश्री महेश विजयी

Thane Municipal Corporation Election Results 2026 Eknath Shinde's Shiv Sena and BJP Lead in Stronghold

TMC Election 2026: ठाण्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आणि शरद पवार गटाची कामगिरीही काही जागांवर लक्षवेधी ठरताना दिसत आहे. आतापर्यंत ठाणे महापालिकेच्या 28 जागांचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये 13 विजयी उमेदवारी शिवसेनेचे आहे.

Election Results 2026 Live: वसई विरारमध्ये हितेंद्र ठाकुरच वसई विरारमध्ये ठाकूर

हितेंद्र ठाकुरच वसई विरारमध्ये  ठाकूर 

वसई विरारमध्ये BVAचाच महापौर होणार

बहुजन विकास आघाडीचे 70+1 (काँग्रेस) उमेदवार विजयी

महायुतीचे 44 उमेदवार विजयी (BJP 43+1 शिंदे शिवसेना) 

115 सदस्य असलेल्या वसई विरार महापालिकेवर बहुजनचे वर्चस्व

शिवसेना शिंदे गटाच्या शिल्पा दिवाकर सिंग या एकमेव उमेदवार विजयी

BMC Election Results 2026 Live: उत्सवाचा दिवस आहे: तरुण चुघ, भाजप राष्ट्रीय सरचिटणीस

Election Results 2026 Live: प्रभाग क्रमांक 212 मधून मुलगी गीता गवळी पराभूत

प्रभाग क्रमांक 212 मधून मुलगी गीता गवळी पराभूत 

Election Results 2026 Live: मुंबईत एमआयएमचे चार उमेदवार विजयी

मुंबई : एमआयएमचे चार उमेदवार विजयी

1. प्रभाग क्रमांक 136मधून एमआयएमचे जमीर कुरेशी विजयी 

2. प्रभाग क्रमांक 137मधून पटेल समीर रमजान विजयी 

3. प्रभाग क्रमांक 134मधून मेहजबीन अतिक अहमद विजयी  

4. प्रभाग क्रमांक 145 खैरनूसा अकबर हुसेन विजयी

BMC Election Results 2026 Live:विजयामागील कारण लोकांचं प्रेम आणि त्यांचा बदला आहे: निशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

Mumbai BMC Election Results 2026 Live: निशिकांत शिंदे यांचा विजय, वरळीमध्ये शिवसेनेच्या (UBT) कार्यकर्त्यांचा जल्लोष

BMC election results 2026 Devendra Fadnavis led BJP to victory in the Mumbai Municipal Corporation election

देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे बंधूंच्या युतीचा मराठी मतांवर काही प्रमाणात परिणाम होईल हे जाणून उमेदवार अचूक उभे केले.

Election Results 2026 Live: नवी मुंबईत भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

BMC Election Results 2026 Live: शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव विजयी

BMC Election Results 2026 LIVE: BJP-led Mahayuti Crosses Majority Mark in Mumbai; End of Thackeray's 25-Year Dominance as Raj-Uddhav Alliance Fails

BMC Election 2026 Result Live Update : गेल्या 25 वर्षांपासून मुंबईवर ठाकरेंचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे, मात्र यंदाच्या निवडणुकीत हे समीकरण पूर्णपणे बदलताना दिसत आहे.

BMC Election Results 2026 Live: आमच्याशी गद्दारी केली तेव्हाच जनतेनं त्यांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला होता: सुनील शिंदे, नेते, शिवसेना (UBT)

Election Results 2026 Live:...तोच महाराष्ट्रवर राज्य करेल: नितेश राणे यांचं ट्वीट

BMC Election Results 2026 Shocking results in Mumbai Municipal Corporation elections Shilpa Keluskar, Asha Kale, Dipti Waikar, Samadhan Saravankar, Yogita Gawli, Navnath Ban Captain Malik

सर्वात धक्कादायक आणि आश्चर्यकारक निकाल हा भायखळ्यातून आला आहे.

Mumbai BMC Election Results 2026 Declared For 35 Wards, Check Winners List

BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेमध्ये एकूण 227 जागा असून मुंबईमध्ये भाजपा आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्र लढत आहे. त्यांच्यापुढे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करत आव्हान उभे केले होते.

Election Results 2026 Live Video: 29 महानगरपालिका निवडणुकांचे अचूक निकाल LIVE | Results On NDTV

BMC Mumbai Election Result 2026: AIMIMच्या मेहजबीन खान वॉर्ड क्रमांक 134मधून विजयी

Election Results 2026 Live: वॉर्ड क्रमांक 173 भाजपा बंडखोर शिल्पा केळुसकर विजयी

वॉर्ड क्रमांक 173 भाजपा बंडखोर शिल्पा केळुसकर विजयी 

Election Results 2026 Live: भिवंडी: प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपाचे तीनही उमेदवार विजयी घोषित

भिवंडी: प्रभाग क्रमांक 17 मधील भाजपाचे तीनही उमेदवार विजयी घोषित 

रंजीता मोहन कोंडा- 5478 मतं

संतोष मंजा शेट्टी-8009 मतं 

नंदिनी महेंद्र गायकवाड - 7635 मतं

Election Results 2026 Live: मुंबई महानगरपालिका निवडणुका निकालांचे सर्व अपडेट्स पाहा एका क्लिकवर

BMC Election Results 2026 Live Updates: समाधान सरवणकर यांच्या पराभव आमदार महेश सावंत यांची प्रतिक्रिया

समाधान सरवणकर यांच्या पराभव आमदार महेश सावंत यांची प्रतिक्रिया

मी शपथ घेतली होती की सरवणकर नाव प्रभादेवीमधून पुसून टाकेन.

ज्यांनी बाळासाहेबांना आणि उद्धव ठाकरेंना त्रास दिला, त्यांना जनतेने धडा शिकवला.

मी 2017च्या महापालिका निवडणुकीत नारळ घेऊन उभा होतो, त्यावेळेस मी हरलो. तेव्हा त्यांनी माझ्या घरासमोर नारळ फोडले होते, आज मी त्यांच्या हातात नारळ देणार. 

BMC election 2026 Sada Saravankar's son Samadhan Saravankar defeated; Thackeray group's Nishikant Shinde wins

मुंबई महानगरपालिकेत दादरमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे.

Election Results 2026 Live: हा विजय कार्यकर्त्यांचा आहे:काँग्रेसच्या विजयी उमेदवार आशा काळे यांची पहिली प्रतिक्रिया

विजयामागे खासदार वर्षा गायकवाड आणि आमदार ज्योती गायकवाड यांचा पाठिंबा आणि हा विजय कार्यकर्त्यांचा आहे: काँग्रेसच्या विजयी उमेदवार आशा काळे यांची पहिली प्रतिक्रिया

Municipal Election 2026 Uddhav Thackeray vs BJP BMC election Who will win in Pune, Nashik, Pimpri-Chinchwad Municipal Corporations

आतापर्यंतच्या (११.३० AM) निकालाच्या कलानुसार राज्यातील २८६९ प्रभागांपैकी भाजप ४९६ प्रभागांवर आघाडीवर आहे.

BMC Election Results 2026 Live: समाधान सरवणकर पराभूत, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

सदा सरवणकर यांचे पुत्र समाधान सरवणकर पराभूत; ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे विजयी

BMC Election Results 2026 Live: वॉर्ड क्रमांक 135मधून नवनाथ बन विजयी, भाजप कार्यकर्त्यांचा जल्लोष

Mumbai BMC Election Results 2026 Live: धारावी, मुंबई: प्रभाग क्रमांक 183 मधून काँग्रेसच्या आशा दीपक काळे विजयी, समर्थकांचा जल्लोष

Election Results 2026 Live Updates: रवींद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर पराभूत

Election Results 2026 Live Updates:  ठाकरे गटाचा शिंदेंच्या शिवसेनेला धक्का, रवींद्र वायकर यांच्या कन्या दिप्ती वायकर वॉर्ड क्रमांक 73मधून पराभूत

Election Results 2026 Live: वसई विरारमध्ये भाजपा आणि बविआमध्ये चुरशीचा सामना

वसई विरारमध्ये भाजपा आणि बविआमध्ये चुरशीचा सामना 

वसई विरार शहर महानगरपालिका

बहुजन विकास आघाडी - 70

भाजपा - 43

शिवसेना(उबाठा)- 01

Election Results 2026 Live Updates: मुंबईत काँग्रेसच्या कमर जहाँ सिद्धिकी विजयी

मुंबईत काँग्रेसच्या कमर जहाँ सिद्धिकी विजयी

कमर जहाँ सिद्धिकी या अस्लम शेख यांच्या बहीण आहेत

Election Results 2026 Live Updates: मुंबईत अपक्ष शिल्पा केळुसकर आघाडीवर

मुंबईत अपक्ष शिल्पा केळुसकर आघाडीवर

TMC Election Results 2026 Live: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी

ठाणे महानगरपालिका निवडणूक निकाल:

मुंब्रा प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग 10 मधील नजीब मुल्ला, पूनम माळी, वहिदा खान, सुहास देसाई मोठ्या मताधिक्याने विजयी 

Election Results 2026 Live Updates: दक्षिण मुंबईत भाजपने खातं उघडलंय

दक्षिण मुंबईत भाजपने खातं उघडलंय

प्रभाग क्रमांक 214 आणि 215मधून भाजप विजयी 

उमेदवार अजय पाटील आणि संतोष भाले विजयी

BJP candidate Tejasvee Ghosalkar Wins in BMC Election 2026 Ward 2 with Huge Margin

BMC Election: अभिषेक घोसाळकर यांच्या निधनानंतर आणि तेजस्वी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ही जागा ठाकरे गटासाठी प्रतिष्ठेची होती. मात्र, मतदारांनी तेजस्वी घोसाळकर यांच्यावर विश्वास दर्शवला आहे.

Election Results 2026 Live Updates: मुंबई : भाजपचे नवनाथ बन विजयी

मुंबई : भाजपचे नवनाथ बन विजयी

Election Results 2026 Live Updates:शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद वैद्य यांची विजयाकडे वाटचाल

प्रभाग क्रमांक 182 शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद वैद्य यांची विजयाकडे वाटचाल 

Election Results 2026 Live Updates: भाजपच्या तेजस्वी घोसाळकर विजयी

दहिसर : भाजपच्या तेजस्वी घोसाळकर प्रभाग क्रमांक 2 मधून विजयी

TMC Election Results 2026 Live: AIMIMच्या युनूस शेख यांची मुलगी सहर शेख आघाडीवर

मुंब्रातील प्रभाग क्रमांक 30मध्ये AIMIMच्या युनूस शेख यांची मुलगी सहर शेख आघाडीवर 

Election Results 2026 Live Updates: भाजपाच्या रेखा यादव विजयी

भाजपने मुंबईत खातं उघडलं, प्रभाग क्रमांक 1मधून भाजपच्या रेखा यादव विजयी

Election Results 2026 Live Updates: शिवसेना UBT गटाच्या उमेदवार अस्मिता बनकर आघाडीवर

ठाणे महानगरपालिका  

प्रभाग क्रमांक 19 

दुसरी फेरी 

19 अ

शिवसेना UBT गटाच्या उमेदवार अस्मिता बनकर आघाडीवर- 3033 मत 

शिंदे गटाच्या उमेदवार मीनल संख्ये पिछाडीवर - 10199 मत

नोटा 616 

19 ब 

मनसे उमेदवार प्रमिला मोरे 1444 मत

काँग्रेस उमेदवार जाधव वृषाली 1199 मत  

शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार नम्रता भोसले 10738 मत 

19 क 

शिवसेना UBT गटाचे उमेदवार रवींद्र कवळे 2758 मत

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विकास रेपाळे 10430 मत

Election Results 2026 Live Updates: काँग्रेसच्या आशा काळे विजयी

मुंबईतील पहिला निकाल

वॉर्ड क्रमांक 183मधून काँग्रेसच्या आशा काळे विजयी, काँग्रेसने खात उघडलं

आशा काळे 1450 मतांनी विजयी

BMC Election Results 2026 Live Updates: वॉर्ड क्रमांक 215मध्ये भाजप आघाडीवर

वॉर्ड क्रमांक 215 मध्ये भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गटात कांटे की टक्कर 

  • भाजपचे संतोष ढालेआघाडीवर
  • ठाकरे गटाचे उमेदवार किरण बाळसराफ पिछाडीवर

BMC Election Results 2026 Live: प्रभाग क्रमांक 207मधून योगिता गवळी पिछाडीवर

प्रभाग क्रमांक 207मधून योगिता गवळी पिछाडीवर 

Election Results 2026 Live Updates: चारकोपच्या प्रभाग क्रमांक 20मध्ये मनसे आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत

चारकोपच्या प्रभाग क्रमांक 20मध्ये मनसे आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत 

भाजप उमेदवार दीपक (बाळा) तावडे यांना 3109 मत 

मनसे उमेदवार दिनेश साळवी यांना 3037 मत

BMC Election Results 2026 Live Updates: भायखळा: भाजप उमेदवार रोहिदास लोखंडे आघाडीवर

भायखळा

प्रभाग 207

पहिल्या फेरीत भाजप उमेदवार रोहिदास लोखंडे 234 मतांनी आघाडीवर

- रोहिदास लोखंडे (भाजप) - 3334 मतं 

- योगिता गवळी (अखिल भारतीय सेना): 1434 मतं

- शलाका हरियाण (मनसे) - 3100 मतं

प्रभाग 208

शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार रमाकांत रहाटे आघाडीवर- 4331 मतं

शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजय लिपारे - 2733 मतं 

BMC Election Results 2026 Live वरळी मतमोजणी केंद्रावर 194 प्रभागाची मतमोजणीची आकडेवारी जाहीर करणं थांबवलं

वरळी मतमोजणी केंद्रावर 194 प्रभागाची मतमोजणीची आकडेवारी जाहीर करणं थांबवलं

जाहीर केलेली आकडेवारी पुन्हा काढून टाकण्यात आली 

एकाच टेबलवरील आकडेवारी आधी जाहीर करण्यात आली होती 

परंतु काही वेळाने ही आकडेवारी स्क्रीनवरून हटवण्यात आली 

अद्याप या संदर्भातली कोणतीही माहिती दिली जात नाही आहे

BMC Election Results 2026 Live Updates: किरीट सोमया यांचे पुत्र आणि भाजप उमेदवार नील सोमय्या आघाडीवर

मुलुंडमध्ये  सर्व सहा वॉर्डमध्ये भाजपाचे उमेदवार आघाडीवर 

किरीट सोमया यांचे पुत्र नील सोमय्या आघाडीवर

BMC Election Results 2026 Live Updates: प्रभाग क्रमांक 182 ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद वैद्य आघाडीवर

प्रभाग क्रमांक 182 

ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद वैद्य -2732 आघाडीवर 

भाजप उमेदवार राजन पारकर - 1237 पिछाडीवर

प्रभाग क्रमांक 183 

काँग्रेस उमेदवार आशा काळे आघाडीवर

मनसे उमेदवार पारूबाई कटके पिछाडीवर

BMC Election Results 2026 Live Updates: चारकोपच्या प्रभाग क्रमांक 20मध्ये काँटे की टक्कर

चारकोपच्या प्रभाग क्रमांक 20मध्ये काँटे की टक्कर 

भाजपाचे दीपक (बाला) तावडे आघाडीवर - 3109 मत

मनसे उमदेवार दिनेश साळवी पिछाडीवर -3037 मत

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates: शिवसेना ठाकरे गटाच्या गिता भंडारी आघाडीवर

पी/उत्तर प्रभाग: मालाड प्रभाग उमेदवारांची यादी

प्रभाग क्रमांक 32

गिता भंडारी (शिवसेना UBT) 2476 मतांनी आघाडीवर

मनाली भंडारी (शिवसेना शिंदे गट) पिछाडीवर

BMC Election Results 2026 Live Updates: प्रभाग क्रमांक 19मधून भाजप आघाडीवर

प्रभाग क्रमांक 19मधून भाजप आघाडीवर 

दक्षता श्रीकांत कवठणकर (भारतीय जनता पार्टी) – 3381 मतांनी आघाडीवर 

गुढेकर लीना सुभाष (शिवसेना ठाकरे गट) – 2551 मतांनी पिछाडीवर

BMC Election Results 2026 Live Updates: शिवसेना ठाकरे गटाचे निशिकांत शिंदे आघाडीवर

प्रभादेवी वॉर्ड क्रमांक  194  

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार निशिकांत शिंदे आघाडीवर 

BMC Election Results 2026 Live Updates: प्रभाग क्रमांक 214: भाजप उमेदवार अजय पाटील आघाडीवर

प्रभाग क्रमांक 214: भाजप उमेदवार अजय पाटील आघाडीवर

प्रभाग क्रमांक 215: भाजप उमेदवार संतोष ढाले आघाडीवर 

Election Results 2026 Live Updates: विल्सन कॉलेजमध्ये प्रशासनाचा सावळा गोंधळ

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates:

विल्सन कॉलेजमध्ये प्रशासनाचा सावळा गोंधळ

पोस्टल मतमोजणी पूर्ण होत आली तरी आकडेवारी बाबत कुठलीही स्पष्टता नाही

प्रशासनाकडून माहिती देण्यात असमर्थता

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates: मनसेच्या पारूबाई कटके आघाडीवर

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates: दादर : प्रभाग क्रमांक 183 मनसेच्या पारूबाई कटके पोस्टल मतमोजणीत आघाडीवर 

Vasai Virar Mahanagarpalika Election Results 2026 Live: भाजपचे महेश रामू धांगडा आघाडीवर

वसई विरार शहर महानगरपालिका मतमोजणी: पहिल्या फेरीत भाजप आघाडीवर,  प्रभाग 1 अ मधून भाजपचे महेश रामू धांगडा आघाडीवर तर BVAचे जयंत बसवत पिछाडीवर

TMC Election Results 2026 Live Updates: शिवसेना शिंदे गटाचे राजेंद्र फाटक आघाडीवर

TMC Election Results 2026 Live Updates:  

- शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र फाटक यांचे बंधू प्रभाग क्रमांक 19 (ड) मधून उमेदवार राजेंद्र फाटक आघाडीवर

- प्रभाग क्रमांक 11(अ)मधून भाजपचे उमेदवार दीपक काशिनाथ जाधव आघाडीवर

Election Results 2026 Live:मुंब्रा प्रभाग क्रमांक 02मधून भाजप उमेदवार नाझिया तंबोली पिछाडीवर

मुंब्रा प्रभाग क्रमांक 02मधून भाजप उमेदवार नाझिया तंबोली पिछाडीवर 

प्रभाग क्रमांक 2कमधून भाजप उमेदवार अर्चना किरण मनेरा आघाडीवर

प्रभाग क्रमांक 22ब मधून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुधीर कोकाटे आघाडीवर

प्रभाग क्रमांक 21 (अ)मधून भाजप उमेदवार संजय वाघुले आघाडीवर 

प्रभाग क्रमांक 20 (अ) मधून शिवसेना शिंदे गटाच्या मालती पाटील आघाडीवर 

TMC Election Results 2026 Live Updates: ठाण्यात महायुती आघाडीवर

TMC Election Results 2026 Live Updates:  

ठाण्यात महायुती आघाडीवर

महायुती- 17

इतर- 1

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates: किशोरी पेडणेकर आघाडीवर

मुंबई प्रभाग 199मधून किशोरी पेडणेकर आघाडीवर

Election Results 2026 Live: मुंबईत महायुती आघाडीवर

मुंबईत महायुती आघाडीवर

महायुती- 37

ठाकरे बंधू- 28

काँग्रेस आणि इतर- 4

TMC Election Results 2026 Live Updates: ठाण्यात प्रकाश शिंदे आघाडीवर

ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बंधू प्रकाश शिंदे आघाडीवर

TMC Election Results 2026: ठाणे: अपक्ष उमेदवार नितीन लांडगे आघाडीवर

ठाणे: अपक्ष उमेदवार नितीन लांडगे आघाडीवर

प्रभाग क्रमांक ०४ मध्ये बॅलेट पेपर मतमोजणीमध्ये अपक्ष बंडखोर उमेदवार नितीन लांडगे आघाडीवर तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सिद्धार्थ पांडे पिछाडीवर 

Election Results 2026 Live: ठाकरे गटाचे पद्मजा चेंबरकर आघाडीवर

ठाकरे गटाचे पद्मजा चेंबरकर, विजय भनगे आघाडीवर

Election Results 2026 Live: शिवसेना ठाकरे गट 23 जागांवर आघाडीवर

मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट 23 जागांवर आघाडीवर

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates मुंबईत भाजपाच्या ममता यादवर आघाडीवर

मुंबईत भाजपाच्या ममता यादवर आघाडीवर

मुंबईत शिवसेनेचे अमय घुले आघाडीवर

ठाकरे गटाच्या विशाखा राऊत आघाडीवर

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates: भाजपचे रोहिदास लोखंडे आघाडीवर

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates: 

पहिल्या टप्प्यातील पोस्टल मतदानाचे निकाल हाती 

भायखळा परिसरात भाजपचे रोहिदास लोखंडे यांना पसंती 

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates मनसेचे संदेश देसाई आघाडीवर

मुंबईमध्ये मनसेने खातं उघडलं, संदेश देसाई आघाडीवर

Election Results 2026 Live: महानगरपालिका निवडणूक निकाल: मतमोजणीला सुरुवात

महानगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात

Election Results 2026 Live: कुर्ला महानगरपालिका निवडणुकीच्या पोस्टल मतमोजणीला सुरुवात

Election Results 2026 Live: कुर्ला महानगरपालिका निवडणुकीच्या पोस्टल (156,162,164,)मतमोजणीला सुरुवात

संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी महानगरपालिका आणि निवडणूक विभागाने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केलीय..

पोस्टल मतमोजणीच्या निकालाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले असून कुर्ला परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापलंय.

मतमोजणीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

 

Election Results 2026 Live: वरळी येथील मतदान केंद्रावर पोस्टल मतांच्या छाननीला सुरुवात.

Election Results 2026 Live: वरळी येथील मतदान केंद्रावर पोस्टल मतांच्या छाननीला सुरुवात.

Election Results 2026 Live: आता टक्केवारी जाहीर करायची की नाही हे निवडणूक आयोगाने ठरवावं:रोहित पवार

KDMC Election 2026: कल्याण डोंबिवली मनपासाठी 52.11% मतदान

कल्याण डोंबिवली महापालिकेसाठी 52.11% मतदान. 122 पैकी 102 जागांवर मतदान प्रक्रिया पार पडलीय. 20 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.  

मुंबई: 3 वर्षानंतर सुरू होणार मुंबई महापालिकेतील महापौर दालन

मुंबई: तीन वर्षानंतर सुरू होणार मुंबई महापालिकेतील महापौर दालन

मुंबई महापालिकेची मुदत संपल्यानंतर पालिकेत प्रशासन राज होत 

त्यामुळे महापौर दालन तात्पुरत्या स्वरूपात सील करण्यात आले होते

आज या दालनात कोण महापौर होऊन येणार हे निकालातून स्पष्ट होणार 

 

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates:मुंबई महापालिका निकाल वरळीतील मुख्य लढत

मुंबई महापालिका निकाल वरळीतील मुख्य लढत

१९३ 

ठाकरेंची शिवसेना - हेमांगी वरळीकर - 

शिंदेंची शिवसेना - प्रल्हाद वरळीकर

काँग्रेस - अभिजीत नागवेकर

वंचित बहुजन आघाडी - भुषण चंद्रशेखर नागवेकर

अपक्ष - सुर्यकांत कोळी

अपक्ष - आनंद मयेकर 

१९४ 

ठाकरेंची शिवसेना - निशिकांत शिंदे

शिंदेंची शिवसेना - समाधान सदा सरवणकर

अजित पवार राष्ट्रवादी - पूजा पवार

वंचित बहुजन आघाडी - शंकर गुजेटी (अशोक गुजेटी)

१९५

ठाकरेंची शिवसेना - विजय भणगे

भाजप - राजेश कांगणे

वंचित बहुजन आघाडी - ओमकार मोहन पवार 

अपक्ष - लोखंडे परशुराम बाबुराव 

१९६ 

ठाकरेंची शिवसेना - पद्मजा चेंबूरकर

भाजप - सोनाली सावंत

अजित पवार राष्ट्रवादी - निलम कांबळे

वंचित बहुजन आघाडी रचना अविनाश खुटे

१९७

मनसे- रचना साळवी

शिंदेंची शिवसेना - वनिता दत्ता नरवणकर 

अजित पवार राष्ट्रवादी - फरीन खान

वंचित बहुजन आघाडी - अस्मिता शांताराम डोळस

१९८

ठाकरेंची शिवसेना - अबोली खाड्ये

शिंदेंची शिवसेना - वंदना गवळी (अरुण गवळी सून)

१९९

ठाकरेंची शिवसेना - किशोरी पेडणेकर

शिंदेंची शिवसेना -रुपाली राजेश कुसळे

वंचित बहुजन आघाडी नंदिनी गोतम जाधव

मुंबई महानगरपालिका वर्ष 2012, वर्ष 2017 आणि वर्ष 2026ची मतदानाची टक्केवारी

मुंबई महानगरपालिका वर्ष 2012, वर्ष 2017 आणि वर्ष 2026ची मतदानाची टक्केवारी

मतदानाची टक्केवारी

वर्ष 2012

-44.75 टक्के

वर्ष 2017 

- 55.59 टक्के 

वर्ष 2026

52.94 टक्के 

Mumbai BMC Election Results 2026: राज्यातील महापालिकांमधील मतदानाची टक्केवारी, वाचा एका क्लिकवर

मुंबई महानगरपालिका - 52.94टक्के 

ठाणे महानगरपालिका - 55.59 टक्के

नवी मुंबई महानगरपालिका - 57.15 टक्के

कल्याण डोंबिवली महानगरपालिका -  45 टक्के

वसई-विरार महानगरपालिका -57.12 टक्के

मीरा-भाईंदर महानगरपालिका- 48.64 टक्के

BMC Election Results 2026 Live Updates: मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी एकूण 52.94% मतदान झाले

BMC Election Results 2026 Live Updates: मुंबईमध्ये महापालिका निवडणुकीसाठी एकूण 52.94% मतदान झाले

Navi Mumbai Mahanagarpalika Election Result 2026:नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 57.15% मतदान

Navi Mumbai Mahanagarpalika Election Result 2026:नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 57.15% मतदान

यंदा मतदानाचा टक्का घसरलाय

Panvel Mahanagar Palika Election 2026: पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 55.67 टक्के मतदान

पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 55.67 टक्के मतदान

Mahanagar Palika Election 2026: कुठे किती टक्के झाले मतदान

वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी  एकूण 57.12 टक्के मतदान 

मिरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी  एकूण 48.64 टक्के मतदान 

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates : कडेकोट सुरक्षाव्यवस्था तैनात

महानगरपालिका आयुक्त गगराणी यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करून निवडणूक मतमोजणी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करण्यात आलीय. मतमोजणी केंद्रांची रचना, नियोजन, टेबल मांडणी, अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक, सुरक्षा व्यवस्था, सीसीटीव्ही यंत्रणा, तसेच अग्निशमन व वैद्यकीय सुविधा यांचा सविस्तर आढावा घेऊन त्याबाबतचा तपशील अंतिम करण्यात आलाय. मतमोजणीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी पोलीस विभागाशी समन्वय साधण्यात आलाय. आवश्यक सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. 

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates : 10 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात

बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 अंतर्गत 15 जानेवारी रोजी पार पडलेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी 10 वाजेपासून विविध ठिकाणच्‍या 23 मतमोजणी कक्षात होणार आहे. मतमोजणीदरम्यान सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच कायदा व सुव्यवस्था याबाबत आवश्यक ती दक्षता घेण्यात आलीय.

Thane Municipal Corporation Election Results | शिंदेंचा बालेकिल्ला ठाण्यात मतमोजणीची कशी तयारी? पाहा

Mumbai BMC Election Results 2026 Live Updates: आजपासून विकासाची नवी पहाट, भाजप प्रवक्त्यांचे ट्वीट

Vasai Virar Mahanagarpalika Election Results 2026 Live: वसई विरार शहर महानगरपालिका UPDATE

- वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 57.12% मतदान 

- मीरा भाईंदर महानगरपालिका निवडणुकीसाठी एकूण 48.64% मतदान

Municipal Corporation Election 2026 Result What percentage of voting in mumbai pune municipal corporation

एग्झिट पोलमध्ये महायुतीची सरशी असली तरी प्रत्यक्षात कोणाची सत्ता येणार हे येत्या काही तासात समोर येईल.

Election Results 2026 Live Updates: ठाणे महापालिका निवडणूक, 3 टक्के मतदान घसरले

ठाणे महापालिका निवडणूक एकूण 55.59 टक्के मतदान 

तीन टक्क्यांनी मतदान घसरले 

2017 मध्ये 58.08 मतदान झाले होते. 

घटलेल्या मतदानाचा फटका कोणत्या पक्षाला बसणार याकडे सर्वांचा लागले लक्ष 

हॉली क्रॉस काउंटिंग मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात  

TMC Election Results 2026 Live Updates: ठाण्यामध्ये कोणामध्ये आहे लढत, कोण आहेत उमेदवार?

TMC Election Results 2026 Live Updates: ठाण्यामध्ये कोणामध्ये आहे लढत, कोण आहेत उमेदवार?

RSS Complains to Election Commission Over Misuse of Name by Two Candidates in BMC Polls 2026

आरएसएसने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात खालील उमेदवारांची नावे नमूद केली आहेत. वैशाली जी (वॉर्ड क्रमांक 118), प्रशांत जी (वॉर्ड क्रमांक 122) हे दोन्ही उमेदवार देश जनहित पार्टी तर्फे निवडणूक लढवली.

BMC Election Exit Poll 2026: BJP-led Mahayuti Expected to Win Majority; Thackeray Retains Marathi Vote Bank While Congress Holds Muslim Support

BMC Election Result Exit Poll Live Updates: एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, भाजपला मायानगरीत मोठे यश मिळताना दिसत आहे, तर ठाकरे गटाला मराठी मतदारांनी मोठी साथ दिल्याचे चित्र आहे.

Nashik Election Results 2026 Live: नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण 56.67% मतदान

- नाशिक महापालिका निवडणुकीत एकूण 56.67 टक्के मतदान

- पाच टक्क्यांनी मतदान घसरले

- 2017 मध्ये 61.60 टक्के झाले होते मतदान

- घटलेल्या मतदानाचा फटका कोणत्या पक्षाला बसणार? याकडे लक्ष

Thane, Kalyan-Dombivli & Navi Mumbai Exit Poll 2026: Eknath Shinde and BJP Set for Clean Sweep; Mahayuti Dominates MMR Civic Polls

Maharashtra Election 2026 : ठाणे, कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई या तीन महत्त्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

TMC Election Results 2026 Live Updates: ठाण्यात एकूण 55.59 टक्के मतदान

TMC Election Results 2026 Live Updates: ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण 917123 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क, एकूण 55.59 टक्के मतदान

Election Results 2026 Live Updates : निवडणुकांचा आज निकाल

महापालिका निवडणुकांचा आज निकाल, थोड्याच वेळात होणार मतमोजणीला सुरुवात 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com