जाहिरात

विधानसभेत महायुती किती जागा जिंकणार? फडणवीसांचा आकडा काय?

विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? भाजपला किती जागा मिळणार? निवडणुकीनंतर कोणाची मदत घ्यावी लागेल का या सारख्या प्रश्नांची बेधडक उत्तरं फडणवीस यांनी दिली आहेत.

विधानसभेत महायुती किती जागा जिंकणार? फडणवीसांचा आकडा काय?
मुंबई:

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल काय असेल? भाजपला किती जागा मिळणार? निवडणुकीनंतर कोणाची मदत घ्यावी लागेल का या सारख्या प्रश्नांची बेधडक उत्तरं फडणवीस यांनी दिली आहेत. NDTV मराठीनं 'महाराष्ट्राचा जाहीरनामा' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. शिवाय महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचे चित्र कसे आहे हे पण स्पष्ट केले. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

भाजपला किती जागा मिळणार? 

महायुतीत भाजप हा मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला किती जागा मिळतील याबाबत देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आले. विजयही होणाऱ्या जागांचा आकडा काय असेल.  त्यावर बोलताना फडणवीसांनी आपले स्पष्ट मत व्यक्त केले. मी आकडा लावणाऱ्यां पैकी नाही. त्यामुळे मी आकडा सांगणार नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठी संधी आहे. शिवाय भाजपच हाच महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष बनेल असेही त्यांनी सांगितले. शिवाय मित्र पक्षाच्या मदतीने आम्ही सरकारही बनवू असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.   

ट्रेंडिंग बातमी - NDTV Conclave:'आम्ही ठाकरेंच्या डिझाईनला बळी पडलो' प्रकाश आंबेडकर थेट बोलले

'एकट्याच्या जोरावर विजय शक्य नाही'

महायुतीत भाजप, शिंदे शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आहे. महायुती म्हणून या विधानसभा आम्हाला विजय नक्की मिळेल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. एकट्या भाजपला स्वबळावर विजय मिळणार नाही. पण मित्रपक्षाच्या मदतीने विजय नक्कीच मिळेल. त्यातही भाजप हा सर्वात मोठा पक्ष असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महायुती असल्याने अनेक गोष्टीत तडजोड करावी लागली आहे. त्यामुळे पक्षातील चांगल्या लोकांवर अन्याय झाला आहे हे मान्य आहे. त्याचे वाईट नक्कीच वाटतं. उद्धव ठाकरेंच्या पहिल्या उमेदवारी यादीत जवळपास 17 जण हे भाजपचेच आहेत. त्यामुळे जिकडे संधी मिळेल तिकडे लोक जातत अशी स्थिती सध्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - Maharashtracha Jahirnama : 'जरांगे फॅक्टर' मराठवाड्यातल्या एक-दोन जिल्ह्यात मर्यादित, छगन भुजबळांचं टीकास्त्र

'फेक नेरटिव्ह चालणार नाही' 

प्रत्येक निवडणूक ही वेगळी असते. मतदार हे सर्वांनाच आश्चर्यचकीत करत असतात. हरियाणा त्याचे उत्तम उदाहरण आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बऱ्यापैकी यश मिळाले. पण ते फेक नरेटिव्हमुळे मिळाले होते असे फडणवीस म्हणाले. मात्र हे फेक नरेटिव्ह विधानसभा निवडणुकीत चालणार नाही. आघाडी आणि युतीमधील मतांचे अंतर हे फार कमी आहे. काँग्रेसच्या फेक नरेटिव्हला युती थेट नरेटिव्हने उत्तर दिले आहे. त्यामुळे या निवडणुकीत युतीचा विजय निश्चित आहे. राहुल गांधी यांनी आरक्षण संपवणार असे वक्तव्य अमेरिकेत केले. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर आला आहे. त्यामुळे दलित मतदार हे युतीच्या बाजूनेच येतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.     

ट्रेंडिंग बातमी - Maharashtracha Jahirnama LIVE Updates: 'लाडकी बहीण' ही फक्त निवडणूक योजना - संजय राऊत

उमेदवारी देताना कोणता विचार? 

भाजपने उमेदवारी देताना विद्यमान आमदारांनाच पुन्हा मैदानात उतरवले आहे. तर काहींची उमेदवारी कापण्यात आली आहे. त्यांना उमदेवारी नाकारण्यात आली आहे. याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. उमेदवारी देताना तीन प्रकारचा अभ्यास केला गेला. त्यानंतर उमेदवारी निश्चित करण्यात आली. त्यात विद्यमान आमदारांबाबत नाराजीचा अभ्यास केला गेला. शिवाय ज्यांच्या बाबतीत नाराजी जास्त त्यांना उमेदवारी नाही, ज्यांच्याबाबत नाराजी कमी त्यांना मात्र उमेदवारी देण्यात आली आहे.