संजय तिवारी, यवतमाळ
लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. सर्वच पक्ष जोमाने प्रचाराला लागले आहेत. मात्र वाढत्या उन्हाचा फटका राजकीय नेत्यांना बसताना दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सरसभेत भोवळ आली आहे. भोवळ आल्याने नितीन गडकरी स्टेटवरच खाली कोसळले.
(नक्की वाचा - संभाजीनगरमध्ये महायुतीला दिलासा, विनोद पाटील यांचा निर्णय जाहीर)
नितीन गडकरी यांची आज यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा होती. महायुतीचे उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ यवतमाळच्या पुसद येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करत असताना नितीन गडकरी यांना अचानक भोवळ आली.
(नक्की वाचा -'चूक सुधारा, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल' नवनीत राणांना थेट धमकी)
दरम्यान त्यांचे सुरक्षारक्षक तातडीने धावत आले आणि त्यांना सावरलं. या घटनेनंतर काही वेळ सभेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मात्र काही वेळातच नितीन गडकरी यांना बरं वाटलं आणि त्यांनी तिथे भाषण देखील केलं.
नितीन गडकरी यांनी मानले आभार
पुसद येथील सभेदरम्यान उन्हामुळे मला भोवळ आली. मात्र माझी तब्येत पूर्णपणे बरी आहे. आता मी पुढच्या वरुड येथील सभेसाठी रवाना झालो आहे. तुमचं प्रेम आणि शुभेच्छांसाठी धन्यवाद, असं ट्वीट करत नितीन गडकरी यांनी सर्वांचे आभार मानले.
पुसद, महाराष्ट्र में रैली के दौरान गर्मी की वजह से असहज महसूस किया। लेकिन अब पूरी तरह से स्वस्थ हूँ और अगली सभा में सम्मिलित होने के लिए वरूड के लिए निकल रहा हूँ। आपके स्नेह और शुभकामनाओं के लिए धन्यवाद।
— Nitin Gadkari (मोदी का परिवार) (@nitin_gadkari) April 24, 2024
विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मागील १० वर्षांच्या काळात देशभरात रस्ते-महामार्ग तसेच शिक्षण, स्वास्थ्य व अन्य क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य झाले आहे. केंद्र सरकारच्या विविध योजना ग्रामीण भागापर्यंत यशस्वीरीत्या पोहोचवल्या गेल्या. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील जनतेलाही अनेक महत्वपूर्ण सुविधांचा लाभ घेता येत आहे. सातत्याने विकासाची ओढ असलेली यवतमाळ जिल्ह्यातील जनता यावेळीही सर्वांगीण विकासाचा विश्वास देणाऱ्या भाजप-महायुतीला विजयी करेल असा मला विश्वास आहे, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world