जाहिरात
Story ProgressBack

सांगलीकरांचा नाद नाय! निवडणूक निकालासाठी लागली बुलेट आणि युनिकॉर्न पणाला

Sangli Lok Sabha Election : सांगलीचा नवा खासदार कोण होणार? ही चर्चा फक्त शाब्दिक पातळीवर राहिली नसून त्यासाठी लागलेली एक पैज सध्या चांगलीच गाजतीय. 

Read Time: 2 mins
सांगलीकरांचा नाद नाय! निवडणूक निकालासाठी लागली बुलेट आणि युनिकॉर्न पणाला
सांगली:


शरद सातपुते, प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे आता संपले आहेत. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागातील मतदारसंघातील मतदान पूर्ण झालंय. अनेक दिग्गजांचं भवितव्य आता निश्चित झालं असून 4 जून रोजी त्यांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातील लढत ही यंदा चांगलीच लक्षवेधी ठरली. सांगलीमध्ये तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान झालं. त्यानंतर आता सांगलीचा नवा खासदार कोण होणार? याची चर्चा सांगलीकरांमध्ये रंगत आहे. ही चर्चा फक्त शाब्दिक पातळीवर राहिली नसून त्यासाठी लागलेली एक पैज सध्या चांगलीच गाजतीय. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यातील दोघांमध्ये एकमेकांना वाहनं देण्याची पैज लागली आहे. अपक्ष उमेदवार विशाल पाटील जिंकून आले, तर एकाने आपली युनिकॉर्न गाडी देईन अशी पैज लावलीय. तर भाजपा उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले तर आपली बुलेट गाडी देईन अशी पैज लावलीय. 

( नक्की वाचा : 'निवडून येणार अन् काँग्रेस खासदार म्हणूनच राहणार' )
 

रमेश संभाजी जाधव आणि  गौस मुबारक मुलाणी असे पैज लावलेल्यांची नावे आहेत. विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. या पैजेसाठी काही जणांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव आणि स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोण ही शर्यत जिंकणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
भाजप कोट्यातील एका जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा दावा? विधानपरिषद निवडणुकीपूर्वी मोठ्या हालचाली
सांगलीकरांचा नाद नाय! निवडणूक निकालासाठी लागली बुलेट आणि युनिकॉर्न पणाला
Will Varsha Gaikwad of Congress win or Ujjwal Nikam of BJP will win North Mumbai Lok Sabha constituency
Next Article
उत्तर मध्य मुंबईत तगडी लढत, गायकवाड की निकम? कौल कुणाला?
;