भाजपचे राष्ट्रीय सरचिटणिस विनोद तावडे यांना पैसे वाटताना रंगेहात पकडल्याचा दावा बहुजन विकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनीही आता ही संधी साधत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विनोद तावडे यांच्याकडे 15 कोटी होते अशी आपल्याकडे माहिती आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. त्यातले पाच कोटी पकडले गेले आहेत असंही राऊत म्हणाले. तावडेंची टीप भाजपच्याच बड्या नेत्याने दिल्याचा दावा ही राऊत यांनी केला आहे. भविष्यात तावडे आपल्याला डोईजड जातील म्हणून त्यांचा ठरवून गेम करण्यात आला असंही राऊत यांनी सांगितले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याघटनेनंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार बल्लाबोल केला आहे. भाजपनं आता कितीही लपवायचा प्रयत्न केला. तरी नालासापोरा विरारमध्ये जे घडलं ते कॅमेऱ्या समोर आहे. आता भाजपवाले खुलासे कसले करता. त्यांचा खरा चेहरा उघड झाला. त्यांचा खेळ संपला असचं तावडे यावेळी म्हणाले. पक्षाचा राष्ट्रीय महासचिवच पैसे वाटताना पकडला गेला आहे. त्यांच्याकडे पाच कोटी सापडले. त्याचे वाटप त्यांनी केले. त्याच वेळी त्यांना पकडले. बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पैसे जप्त केले. काहींनी त्यांच्या तोंडावर पैसे फेकल्याचेही दिसत असल्याचं राऊत म्हणाले. शिवाय तावडेंना कोंडून ठेवलं होतं.
ट्रेंडिंग बातमी - "माझी चूक झाली, मला इथून सोडवा, विनोद तावडेंचा फोन", हिंतेंद्र ठाकूरांचा दावा
विनोद तावडे यांचा गेम पक्षातील एका नेत्याने सांगून केला आहे. विनोद तावडे पैसे घेवून येणार आहेत अशी माहिती याच नेत्याने दिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. विनोद तावडे हा एक बहूजन चेहरा आहे. भविष्यात तो आपल्याला जड जाईल. म्हणून त्यांना पकडून देण्यात आलं. त्यासाठी भाजपमध्येच अंतर्गत कारस्थान रचलं गेलं. गृह विभागाला याची जास्त माहिती आहे. विनोद तावडे यांच्यावर गृह विभागाकडून पाळत ठेवण्यात आली होती असा आरोपही यात राऊत यांनी केला आहे. शिवाय ते या जाळ्यात अडकतील असा बंदोबस्त केला गेल्याचा दावाही राऊत यांनी केला.
भाजप नेहमी नैतिकतेच्या गप्पा मारत असते. आता ते किती आणि कसे पैसे वाटत आहेत तेच समोर आले आहे. अशा वेळी भाजप त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारवाई झाल्याशिवाय भाजपला तोंड दाखवता येणार नाही. तावडेंचं कांड झाल्यानं काही जण खूश झाले आहेत. पैसा बाटेंगे तो ही जितेंगे अशी भाजपची भूमिका आहे. पण बाटने वाले को पकडते है हा संदेश पण आता सगळीकडे गेला आहे. तावडे हे राष्ट्रीय सरचिटणिस आहेत. त्यांना पैसे वाटण्याचा चांगला अनूभव आहे. हरियाणा आणि चंदिगडमध्ये त्यांनी हे करून दाखवलं आहे. पण इथं त्यांना पकडलं गेलं असंही राऊत म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - हॉटेलमध्ये अडकलेल्या विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले?
आता भाजप काय खुलासा करणार सांगा असा प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केला. भाजपने प्रत्येक मतदार संघात पंधरा ते वीस कोटी रूपये पोहोचले आहेत. नाशिकच्या ताज हॉटेल मध्येही पैसे पकडले गेले. पैसे वाटपासाठी ठाण्यातल्या माणसांच्या नेमणूका झाल्या आहेत. त्यात राम रेपाळे हा व्यक्ती पैसे घेवून येतो. रात्रीत पैसे वाटतो. हे सर्व पोलिस बंदोबस्तात केलं जात आहे असा आरोपही राऊत यांनी केली. 23 तारखेनंतर या राम रेपाळेचा मी बंदोबस्त करणार आहे असंही राऊत म्हणाले. अशी 18 जणांची पैसे वाटण्यासाठी नियुक्ती झाली आहे असा ही दावा त्यांनी केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world