सातारा लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीसाठी निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. कारण महायुतीकडून उदयराजे भोसले हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीच्या शशिकांत शिंदे यांचं आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. मात्र शशिकांत शिंदे लाखो मतांच्या फरकाने जिंकून येतील, असा विश्वास राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.
(नक्की वाचा - मनसे महायुतीच्या या उमेदवारांचा प्रचार करणार नाही; शालिनी ठाकरेंचं ट्वीट)
जयंत पाटील यांनी उदयनराजे यांना उमेदवारी उशीराने मिळण्याबाबत म्हटलं की, उदयनराजेंना महायुतीकडून उमेदवारी उशीरा दिली यातच त्यांचा पराभव झाला आहे. उदयनराजे यांना तिकीट द्यावं की नाही या विचारात भाजपा होती. त्यामुळे उदयनराजे यांचा पराभव निश्चित आहे. शशिकांत शिंदे यांच्या प्रचारानिमित्त जयंत पाटील जावळी तालुक्यामध्ये केळघर येथे आले होते.
शरद पवार गटाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा सामान्य जनता उत्साहाने प्रचार करत आहे. त्यांना नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शशिकांत शिंदे १०० टक्के मोठ्या मतांच्या फरकाने जिंकून येतील, असा दावा देखील जयंत पाटील यांनी केला आहे.
(नक्की वाचा - 'फडणवीसांना अटकेची भीती तर शिंदेंना...' राऊतांचा 'त्या' आरोपावर मोठा गौप्यस्फोट)
साताऱ्यात दुहेरी लढत
सातारा लोकसभा मतदारसंघात प्रमुख लढत उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात होणार आहे. या मतदारसंघात एकूण ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २५ उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. तीन अर्ज रद्द करण्यात आले. तर ५ उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतले. त्यामुळे आता एकूण १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world