उद्धव ठाकरे हे सध्या भलतेच आक्रमक झाले आहेत. निवडणुकीचा प्रचार सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरें यांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यांनी पाटण इथं जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी शंभूराज देसाई यांचा गद्दार म्हणून उल्लेख केला. त्यांचा उल्लेख लुटमार करणार मंत्री असाही त्यांनी केला. या गद्दाराला पाडा असं आवाहन ही त्यांनी यावेळी केलं.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
पाटण विधानसभा मतदार संघातून विद्यमान मंत्री शंभूराज देसाई हे शिवसेना शिंदे गटातून रिंगणात आहेत. त्यांच्यावरून उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. शंभूराज देसाई यांना गृहमंत्री केलं. पण त्यांनी गद्दारांनाच मदत केली. गृहमंत्रिपदाचा गैरवापर त्यांनी यावेळी केला. गद्दारांना पळून जाण्यात त्यांनी मदत केली. त्यांना जर ढोकळा आवडत असेल तर त्यांनी गुजरातला जाऊन रहावे. ते महाराष्ट्रात का राहात आहेत अशी विचारणा त्यांनी केली.
ट्रेंडिंग बातमी - पुढचा मुख्यमंत्री कोण? थेट नाव सांगितलं, शिंदेंचा शिलेदार शेवटी बोललाच
शंभूराज म्हणजे लुटमार करणारा मंत्री असं ही ठाकरे यावेळी म्हणाले. यांची अनेक प्रकरणं आहेत. सत्ता आल्यानंतर याची सर्व प्रकरणं मार्गी लावणार. ज्या वेळी गद्दारी झाली त्यावेळी हाच लांडगा सर्वात पुढे होता असा उल्लेखही उद्धव ठाकरे यांनी केला. त्यामुळे याला पाडा असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं. शिवसैनिक एकदा भिडला की तो सर्वांना नडला. हे सर्वांना माहित आहे. या निवडणुकीत पैशाचा पाऊस पडणार आहे. त्याला कुणीही भुलू नका असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. इतके वर्ष तुम्ही या लोकांची ओझी डोक्यावर घेतली आहेत. ती आता खाली उतरवा असं ही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - प्रियांका गांधींनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेसमधलं साम्य, पाहा VIDEO
ठाकरे यांच्या या आरोपांनी शंभूराज देसाई यांनी उत्तर दिलं आहे. ज्या वेळी आम्ही गेलो ते सर्वां समोर गेले. लपून गेलो नाही. ती त्या वेळी गृहराज्यमंत्री होतो. मी कोणता ही पदाचा गैरवापर केला नाही. उलट त्या वेळी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते. त्यांना सर्व गोष्टी सांगितल्या जातात. असं असतानाही त्यांना समजले नसेल तर ते त्यांचे फेल्यूअर आहे असे शंभुराज देसाई म्हणाले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world