जाहिरात
Story ProgressBack

अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये 62 जागांवर निवडून आलेल्या भाजपला यंदा 80 पैकी अर्ध्या मतदारसंघांतही यश मिळवता आलेलं नाही.

Read Time: 2 mins
अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं
लखनऊ:

उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 2019 मध्ये 62 जागांवर निवडून आलेल्या भाजपला यंदा 80 पैकी अर्ध्या मतदारसंघांतही यश मिळवता आलेलं नाही. विशेष म्हणजे भाजपने येथील अयोध्येत राम मंदिर उभारलं, निवडणुकीपूर्वी ते देशवासीयांसाठीही खुलंही केलं. निवडणुकीच्या मुद्द्यातही त्याला महत्त्व दिलं. मात्र त्याचं अयोध्येतील खासदाराच्या उमेदवाराला जिंकून आणणं भाजपला शक्य झालेलं नाही.   

दुसरा धक्का म्हणजे भाजपच्या प्रमुख चेहऱ्यांपैकी एक स्मृती इराणी यांना उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघात पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, (सायंकाळी 7 वाजेपर्यंत) भाजप 32, समाजवादी पार्टी 38, काँग्रेस 6 आरएलडी 2, एएसपीकेआर 1, एडीएएल 1 जागांवर आघाडीवर आहे. एकेकाळी पाच जागांवर विजय मिळवणारा समाजवादी पक्ष 35 हून अधिक जागांवर आघाडीवर आहेत. येथून स्मृती इराणी, मेनका गांधी, आजमगढचे उमेदवार दिनेश लाल यादव पिछाडीवर आहेत. यातही अयोध्यातून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. येथील भाजपचा उमेदवार पिछाडीवर आहे. त्याशिवाय रामाची भूमिका साकारणारे अरूण गोविलदेखील पराभूत झाले आहेत. 

दुसरीकडे रायबरेलीतून राहुल गांधी यांना जवळपास 4 लाखांचं लीड मिळालं आहे. येथून राहुल गांधींना 6,87,649 मतं मिळाली आहेत. मात्र योगींचा जलवा असलेल्या उत्तरप्रदेशात भाजपला इतका मोठा धक्का का बसला?

नक्की वाचा - रायबरेली की वायनाड मतदार संघ सोडणार? राहुल गांधी थेट बोलले

इंडिया आघाडीच्या एकजुटीची भाजपला मोठा धक्का बसला आहे. याशिवाय ईडी-सीबीआयच्या कारवायांविरोधात देशात तयार झालेला माहोलही त्यांच्याविरोधात गेल्याचं दिसून येत आहे. संविधान बदलाचा प्रयत्न सुरू असल्याचा प्रचार हे सगळं भाजपाला भोवलं.दुसरीकडे उ. प्रदेशात भाजपानं दिलेल्या उमेदवारांबाबत प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. त्याशिवाय काँग्रेस आणि सपा एकत्र लढल्यानं भाजपासमोर मोठं आव्हान निर्माण झालं होतं. त्याचा परिणाम निकालात पाहायला मिळाला. विशेष म्हणजे योगी को लाना है, तो मोदी को जाना है' असा प्रचारही राज्यात सुरू होता. दुसरीकडे अतिआत्मविश्वास नडला अशी प्रतिक्रिया विरोधकांकडून दिली जात आहे. केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका, शेतकऱ्यांमध्ये असलेली नाराजी, दलित-मुस्लीम मतांचं ध्रुवीकरण आणि हिंदुत्वावर ध्रुवीकरण करण्यात उत्तर प्रदेशात आलेलं अपयश यामुळं भाजपाचा पराभव झाल्याची टीका होऊ लागली आहे. 

Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
पुण्यात भाजपाचाच कारभारी, धंगेकरांना धोबीपछाड देत मोहोळ विजयाचे मानकरी
अयोध्येत राममंदिर उभारलं, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव; या निकालाने देशाचं वारंच बदललं
Lok sabha election 2024 all party winning candidate list
Next Article
Winning Candidate List : राज्यातील सर्व 48 विजयी उमेदवारांची नावे
;