
John Abraham Property News: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने त्याने तीन फ्लॅट्स भाडेतत्त्वार दिले आहेत. याद्वारे तो दरमहिन्याला मोठी रक्कम मिळवणार आहे. मुंबईतील पॉश परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वांद्रे पश्चिम भागातील एकाच हाऊसिंग सोसायटीमध्ये त्याचे तीन फ्लॅट्स आहेत. याद्वारे पुढील पाच वर्षात जॉन अब्राहम जवळपास 4.3 कोटी रुपये कमावणार असल्याचे कळतंय. नोंदणी दस्तऐवजाद्वारे (Registry Documents) ही माहिती समोर आलीय. स्क्वेअर यार्डने (Square Yards) ही माहिती महाराष्ट्र रजिस्ट्रेशन विभागाच्या वेबसाइटद्वारे मिळवलीय.
पाचव्या वर्षी 8 लाख रुपये मासिक भाडे
'द सी ग्लिम्प्स को ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी' (The Sea Glimpse Co-operative Housing Society) येथे जॉन अब्राहमचे तीन (John Abraham Property News) फ्लॅट्स आहेत. वांद्रे पश्चिम परिसरातील ही उच्चभ्रू रहिवासी सोसायटी मानली जाते. मे 2025 मध्ये झालेल्या या कराराअंतर्गत तीन फ्लॅट्सचे मासिक भाडे सुरुवातीच्या वर्षामध्ये प्रत्येक महिन्यानुसार 6 लाख 30 हजार रुपये इतके निश्चित करण्यात आलंय. प्रत्येक वर्षात भाड्याच्या किंमतीमध्ये वाढ होत जाणार आहे. शेवटच्या वर्षात म्हणजे पाचव्या वर्षामध्ये मासिक भाडे 8 लाख रुपये इतके असेल.
(नक्की वाचा: Shilpa Shetty: शिल्पा शेट्टीचा हा लुक पाहून म्हणाल, 'एक नंबर तुझी कंबर...')
सिक्युरिटी डिपॉजिट 36 लाख रुपये
भाडे करार पाच वर्षांसाठी म्हणजेच 60 महिन्यांसाठी निश्चित करण्यात आलाय. करारानुसार पहिल्या दोन वर्षांत भाड्यामध्ये दरवर्षी सुमारे आठ टक्के वाढ होईल आणि पुढील दोन वर्षांत ही वाढ दरवर्षी सुमारे पाच टक्के इतकी होईल. या करारानुसार भाडेकरूंनी अभिनेता जॉन अब्राहमला (John Abraham Property News) सिक्युरिटी डिपॉजिट म्हणून 36 लाख रुपये इतके रक्कम दिलीय. याशिवाय रजिस्ट्रीसाठी 1.12 लाख रुपये स्टॅम्प ड्युटी आणि 1 हजार रुपये नोंदणी शुल्क देखील भरण्यात आले आहे.
(नक्की वाचा: Hina Khan Wedding: आयुष्यभरासाठीचे बंधन... हिना खानने बॉयफ्रेंड रॉकीसोबत केले लग्न PHOTOS)
जॉन अब्राहमच्या फ्लॅट्सच्या भाड्याची रक्कम कशी असेल?
- कालावधी 12 महिने पहिले 12 महिने मासिक भाडे 6,30,000
- दुसरे 12 महिने मासिक भाडे 6,77,250
- तिसरे 12 महिने मासिक भाडे 7,30,000
- चौथे 12 महिने मासिक भाडे 7,65,000
- पाचवे 12 महिने मासिक भाडे 8,00,000
- अनामत रक्कम 36,00,000
(नक्की वाचा: परेश रावलच्या 'हेराफेरी 3'मधील एक्झिटवर अक्षय कुमारची पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाला....)
वांद्रे : मुंबईतील महागडा परिसर
वांद्रे पश्चिम भाग म्हणजे मुंबईतील सर्वात महागडे ठिकाण ओळखले जाते. येथे अभिनेता शाहरुख खान, सलमान खान, रणबीर कपूर, जान्हवी कपूर आणि तृप्ती डिमरी यासह कित्येक कलाकार राहतात. या परिसरात उच्चभ्रू रहिवासी सोसायटी, हेरिटेज बंगले आहेत आणि हीच या परिसराची खासियत आहे. या भागाबाबत सांगायचे झाले तर हा परिसर वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, वांद्रे रेल्वे स्टेशन आणि मेट्रो मार्गाशी जोडला गेलाय. तसेच बीकेसी आणि लोअर परळ यासारखे व्यावसायिक केंद्रे देखील जवळ आहेत.
अभिनयापासून ते प्रोडक्शनपर्यतचा प्रवास
जॉन अब्राहमने (John Abraham Property News) 2003मध्ये 'जिस्म' सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 2004मध्ये त्याने 'धूम' सिनेमामध्ये खलनायकाची भूमिका साकारली होती, या सिनेमाद्वारे जॉनला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. यानंतर वॉटर, गरम मसाला, दोस्ताना, फोर्स, रेस 2, मद्रास कॅफे, सत्यमेव जयते, बाटला हाउस आणि पठान (2023) यासारख्या सिनेमांमध्ये जॉनने दमदार भूमिका केल्या आहेत. आता नुकतेच त्याचा 'हाउसफुल-5' सिनेमा देखील रिलीज झालाय.
जॉन अब्राहमने वर्ष 2012मध्ये J.A. Entertainment नावाची स्वतःची प्रोडक्शन कंपनी सुरू केली आणि 'विक्की डोनर' हा त्याचा पहिला सिनेमा होता, या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. सध्या अभिनय आणि प्रोडक्शनसह जॉन रिअल इस्टेट गुंतवणुकीतूनही मोठी कमाई करत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world