जाहिरात

Saif Ali Khan : प्रेयसीसमोर तुफान राडा, सैफ अली खानला ठोकल्या होत्या बेड्या

सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्याने महिलेने चोराला पाहून आरडाओरडा केला, ते ऐकून बाहेर आलेल्या सैफ अली खानवर चोराने हल्ला केला होता (Attack on Saif Ali Khan). याच सैफ अली खानवर जवळपास 13 वर्षांपूर्वी एक बालंट आलं होतं. (Saif Ali Khan Arrest)

Saif Ali Khan : प्रेयसीसमोर तुफान राडा, सैफ अली खानला ठोकल्या होत्या बेड्या
मुंबई:

अभिनेता सैफ अली खान याच्यावर गुरुवारी पहाटे हल्ला झाला. या हल्ल्यात सैफ जखमी झाला होता आणि त्याच्यावर मुंबईतील लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital)  शस्त्रक्रिया करण्यात आली. 16 जानेवारी रोजी पहाटेच्या सुमारास एक चोर सैफच्या घरात घुसला होता. सैफ अली खानच्या घरात काम करणाऱ्याने महिलेने चोराला पाहून आरडाओरडा केला, ते ऐकून बाहेर आलेल्या सैफ अली खानवर चोराने हल्ला केला होता. याच सैफ अली खानवर जवळपास 13 वर्षांपूर्वी एक बालंट आलं होतं. त्याला अटक झाली मात्र नंतर त्याला जामिनावर सोडण्यातही आलं. 

नक्की वाचा : हल्ल्यामागे सैफच्याच घरातील व्यक्ती? 8 प्रश्न जे मुंबई पोलिसांना करतायत हैराण

हे प्रकरण आहे 11 डिसेंबर 2012चं सैफ अली खान आणि त्याचे मित्र ताज हॉटेलमध्ये जपानी रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी करीना आणि तो दोघे प्रेमात पडलेले होते आणि ते दोघे एकमेकांसोबत वरचेवर एकत्र दिसू लागले होते. अभिनेत्री अमृता अरोरा देखील या दोघांसोबत होती. सैफचे काही मित्रदेखील त्याच्यासोबत हॉटेलमध्ये आले होते. या सगळ्यांची मिळून धमाल सुरू होती. मोठा ग्रुप असल्याने या सगळ्यांचा गोंगाट सुरू होता. हा गोंगाट सहन न झाल्याने इक्बाल शर्मा नावाच्या माणसाने या सगळ्यांना हटकलं होतं. शर्मा हा भारतीय वंशाचा दक्षिण आफ्रिकेचा नागरीक आहे. 

नक्की वाचा : सैफवर हल्ला झाला तेव्हा करीना काय करत होती? पुढे काय झाले...

शर्माने हटकल्यानंतर सैफ आणि त्याच्या मित्रांसोबत वाद सुरू झाला. पंचतारांकीत हॉटेलमध्ये धाब्यावर जेवायला येणारे भांडतात तसे भांडण सुरू झाले. हॉटेलमध्ये जेवायला आलेली उच्चभ्रू मंडळी अवाक होऊन हा तमाशा पाहात होती. सैफ अली खान याला चित्रपटांमध्ये असा तमाशा घालताना पाहणाऱ्या या मंडळींना प्रत्यक्षात हा प्रसंग घडताना दिसत होता. शर्माने या प्रकारानंतर सांगितले की सैफने त्याच्या सासऱ्यांना तोंडावर आणि नंतर पोटात बुक्के मारले. ते जमिनीवर पडल्यानंतर त्यांना उचलण्यासाठी गेलेल्या इक्बाल शर्माच्या सासऱ्यांना सैफच्या मित्रानेही मारहाण केली. 

नक्की वाचा : सैफच्या घरातील जिन्यावरुन पळताना दिसला आरोपी पाहा Exclusive Video

इक्बाल शर्मा याने पोलिसांत धाव घेतली आणि सैफसह त्याच्या मित्रांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणात सैफ 12 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजता पोलिसांसमोर स्वत: हजर झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याची काही वेळातच जामिनावर मुक्तताही करण्यात आली होती. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com