Siya Goyal Case: पुण्यातील उद्योगपती केतन अग्रवालच्या हत्येप्रकरणी सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी करणे मध्य प्रदेशातील एका महिला डॉक्टरला चांगलेच भोवले आहे. डॉक्टरांची मोठी संघटना असलेल्या 'ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशन'ने (AIDSA) याविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. संघटनेने मध्य प्रदेश टीमच्या कोषाध्यक्ष डॉ. मुस्कान सोनी यांना तातडीने त्यांच्या पदावरून हटवले आहे. यासोबतच असोसिएशनने त्यांचे प्राथमिक सदस्यत्व देखील पाच वर्षांसाठी निलंबित केले आहे. डॉ. मुस्कान यांची टिप्पणी वैद्यकीय क्षेत्रातील नियम आणि प्रतिष्ठेच्या पूर्णपणे विरोधात होती, असे संघटनेचे म्हणणे आहे.
(नक्की वाचा: Siya Goyal: सिया आणि केतनच्या कारमध्ये काय घडलं? ड्रायव्हरने पाहिलेला तो सीन सियाला जेलमध्ये सडवणार!)
इन्स्टाग्राम पोस्ट, आरोपीची पाठराखण आणि #IHateMen मुळे लोकांचा संताप
हा संपूर्ण वाद तेव्हा सुरू झाला जेव्हा डॉ. मुस्कान सोनी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला. ही पोस्ट पुण्याच्या बहुचर्चित केतन अग्रवाल मर्डर केसशी संबंधित होती, ज्यामध्ये केतनची होणारी पत्नी सिया गोयल हिच्यावर हत्येचा आरोप आहे. डॉ. मुस्कान यांनी आपल्या या पोस्टमध्ये कथित मुख्य आरोपी सिया गोयल हिची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला, शिवाय मृत केतन अग्रवालला असलेल्या टक्कलवरूनही चेष्टा केली.

डॉ. मुस्कान यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, "जर असा खोटेपणा कराल तर साहजिकच तुम्ही मारले जाल." यासोबतच त्यांनी या पोस्टमध्ये #IHateMen या हॅशटॅगचाही उल्लेख केला होता. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताच लोकांचा संताप अनावर झाला. एवढी असंवेदनशील आणि बेजबाबदार टिप्पणी केल्याबद्दल लोकांनी महिला डॉक्टरवर कडाडून टीका केली आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
(नक्की वाचा: Siya Goyal: सिया गोयलचं प्रत्येक राज 'या' व्यक्तीला होतं माहित? मैत्री, प्रेम अन् हत्येमागे तिसरी व्यक्ती)
माफीनामा फेटाळला; संघटनेने म्हटले, 'अशी विचारसरणी खपवून घेणार नाही'
प्रकरण खूप वाढल्यानंतर आणि चौफेर दबाव येताच डॉ. मुस्कान सोनी यांनी सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये त्यांनी आपल्या पूर्वीच्या वक्तव्याबाबत आणि शब्दांच्या निवडीबाबत जाहीर माफी मागितली. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला उद्देश नव्हता, असे त्यांनी सांगितले. पण ऑल इंडिया डेंटल स्टुडंट्स अँड सर्जन्स असोसिएशनच्या (AIDSA) शिस्तपालन समितीने त्यांचा माफीनामा स्वीकारला नाही. संघटनेने आपल्या अधिकृत आदेशात म्हटले आहे की, डॉ. मुस्कान यांचे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह, आक्रमक आणि अपमानास्पद होते. समाजात संवेदनशीलता टिकवून ठेवणे हे डॉक्टरांचे काम असते पण त्यांच्या पोस्टमुळे समाजात चुकीचा आणि द्वेषपूर्ण संदेश गेला आहे. भविष्यात कोणीही असे कृत्य करण्याचे धाडस करू नये, म्हणून त्यांच्यावर 5 वर्षांची दीर्घकालीन बंदी घालण्याची कठोर कारवाई संघटनेने केली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world