Live Updates : जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात सहभाग नसल्याचा आव आणणाऱ्या पाकिस्तानचा खोटेपणा समोर आला आहे. गुप्तचर यंत्रणा पाकिस्तानाची कट कारस्थाने उघड करत आहेत. पहलगाम येथे 26 पर्यटकांच्या हत्येत सहभागी असलेल्या दहशतवाद्यांपैकी एक हाशिम मुसा हा पाकिस्तानी लष्कराचा पॅरा कमांडो असल्याची माहिती समोर आली आहे.
लासलगावची मिरची थेट लंडन व दुबईच्या बाजारपेठेत
आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ म्हणून ओळख असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतून आता मिरची थेट लंडन व दुबईच्या बाजारपेठेत दाखल झाली आहे. लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या खाणगाव उपबाजार आवार येथे मिरचीची आवक दिवसेंदिवस वाढत असून गारपिटीमुळे द्राक्ष बागांचे होणाऱ्या नुकसानामुळे बहुतेक द्राक्ष उत्पादक शेतकरी मिरची पिकाकडे वळले असून, निर्यातक्षम मिरचीचे उत्पादन घेत असल्याने गेल्या पाच वर्षात भाजीपाला पिकांची 167.38 कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे यात एकट्या मिरचीची 77 कोटी सात लाख 75 हजार रुपयांची उलाढाल झाली आहे आशिया खंडातल्या ओमान कतार दुबई तसेच थेट लंडनच्या बाजारपेठेत देखील लासलगावची मिरची दाखल झाली आहे.
Pahalgam Attack : महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य : CM फडणवीस
जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यातील मृतांना राज्य मंत्रिमंडळ बैठकीत भावपूर्ण श्रद्धांजली.
महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना 50 लाख रुपये अर्थसहाय्य देण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. या कुटुंबीयांच्या शिक्षण, रोजगाराकडे राज्य सरकार लक्ष देणार.
जगदाळे कुटुंबातील मुलीला मुख्यमंत्र्यांचा विशेषाधिकार वापरत त्यांना आता शासकीय नोकरी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर केला.
Solapur Crime News : जावयाकडून सासऱ्याची भोसकून हत्या, सोलापुरातील खळबळजनक घटना
सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात जावयानेच सासऱ्याचा भोकसून खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कौटुंबिक वादातून जावयाने सासू, सासरे आणि मेव्हणा यांच्यावर चाकूने वार केले. सासू आणि मेव्हण्यावर सोलापुरात उपचार सुरू आहेत.
गेल्या अडीच वर्षापासून पत्नीला नांदवायला पाठवत नाही. कोर्टात पोटगीसाठी दावा केल्यामुळे जावई मंगेश सलगर याने चिडून सासू-सासरे आणि मेव्हणा यांच्यावर 27 एप्रिल रात्री बारा वाजता चाकूने केला हल्ला.
जावई मंगेश सलगर याने चाकूने वार करून 112 नंबरवर कॉल करून पाच-सहा जण मारत असल्याची तक्रार केली होती. मंगेश याने स्वतःलाही मारून घेत जखमी केले. बापूराव तुळशीराम मासाळ असे मयत झालेल्या सासऱ्याचे नाव आहे. मोहोळ पोलीस ठाण्यात मंगेश सलगर याच्या विरोधात गुन्हा दाखल.
LIVE Updates: नाशिकच्या वणीजवळ भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात, 20 भाविक जखमी
नाशिकच्या वणी जवळ भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात
- चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भाविकांनी भरलेला टेम्पो वळणावर पलटला
- नवसस्पुर्तीसाठी आलेले 20 भाविक जखमी
- अपघातात लहान मुलांसह महिला, पुरुष जखमी
- जखमींना वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात तर गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवले
LIVE Updates: परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची आज दुसरी सुनावणी, प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वत: युक्तिवाद करणार आहेत. पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे. यासाठी सोमनाथ यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्यावेळी न्यायालयाने याचिका दाखल करून घेत सरकारला नोटीस काढली होती.
LIVE Updates: पहलगाममध्ये दहशत माजवणारा हाशिम मुसा पाकिस्तानचा कमांडो
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या तीन दहशतवाद्यांमध्ये अली भाई आणि आदिल हुसेन ठोकर यांचा समावेश होता, तसेच हाशिम मुसा उर्फ सुलेमान (दहशतवादी हाशिम मुसा) हे नावही समोर आले.आता दहशतवाद्यांबद्दल एक धक्कादायक खुलासा झाला आहे. त्याचे पाकिस्तानशी असलेले कनेक्शन समोर आले आहे. पहलगाममध्ये बंदुकीने दहशत माजवणारा हा दहशतवादी पाकिस्तानी सैन्यात पॅरा कमांडो निघाला .हाशिम मुसा, (पहलगाम दहशतवादी हाशिम मुसा) हा पाकिस्तानी सैन्याच्या विशेष दलाचा माजी पॅरा कमांडर आहे. दहशतवादी कटाच्या तपासादरम्यान याची पुष्टी झाली.
LIVE Updates: पहलगाम दहशतवादी हल्ला, एनआयएकडून कसून चौकशी
राष्ट्रीय तपास संस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल एनआयए पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणी गेले आणि गुन्ह्याचे दृश्य पुन्हा तयार केले. याआधीही एनआयएच्या पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी जाऊन ते दृश्य पुन्हा तयार केले होते.
गुन्ह्याच्या ठिकाणी पोहोचण्याची आणि अशा प्रकारे तपास करण्याची एनआयएची प्रक्रिया पुढील काही दिवस सुरू राहील. पहलगाम दहशतवादी घटनेच्या ठिकाणी काम करणाऱ्या स्थानिकांची, झिपलाइनसह, चौकशी केली जाईल
एनआयए गुजराती पर्यटक ऋषी भट्ट आणि ज्यांच्या व्हिडिओमध्ये दहशतवादी कैद झाले आहेत अशा इतर लोकांचीही चौकशी करू शकते. राष्ट्रीय तपास संस्था व्हिडिओ फुटेजच्या आधारे तांत्रिक पुरावे गोळा करत आहे.
LIVE Updates: सोलापूर विमानतळावरुन 26 मेपासून विमानसेवा सुरु होणार
- सोलापूर विमानतळावरून विमान सेवा 26 मे पासून सुरू होणार, 16 मे पासून विमानसेवेची बुकिंग होणार सुरू..
- आठवड्यातून दोन दिवस सोलापूर गोवा विमानसेवा असणार, सोमवार आणि शुक्रवार गोव्यासाठी असणार उडान..
- 16 मे पासून ऑनलाईन आणि विमानतळावरून तिकीट बुकिंगची सुविधा..
- गोव्यातून सोलापूर साठी सकाळी 7.20 मिनिटांनी विमान उडेल तर सोलापुरातून गोव्यासाठी 8:50 मिनिटाने विमान उडणार..
- सोलापूर विमानतळ विमान सेवेसाठी पूर्णपणे सज्ज
Pune News: पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आंदोलन
पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच आंदोलन
पीएमआरडीए डीपी रद्द केल्याच्या निषेधार्थ. राष्ट्रवादीच आंदोलन
पीएमआरडीए डीपी रद्द का केला याचा भंडाफोड करणार प्रशांत जगताप
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शरद पवार गटाच आंदोलन
आरक्षण टाकण्यासाठी पैसे घेतल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप
कारवाई करण्याची सरकारकडे मागणी
LIVE Updates: वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध याचिका फेटाळल्या
वक्फ सुधारणा कायद्याविरुद्ध याचिका फेटाळल्या
- सर्वोच्च न्यायालयाने याचिकांवर सुनावणी करण्यास नकार दिला
- सर्वोच्च न्यायालय फक्त पाच याचिकांवर सुनावणी घेणार
- टीएमसी नेते डेरेक ओ'ब्रायन, पीडीपी आणि इम्रान प्रतापगढी यांच्यासह २५ याचिकांवर सुनावणी नाकारली
Live Update : वांद्रे पश्चिमेकडील शोरूममला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाकडून 'फायर रोबोट'ची मदत
#WATCH | Maharashtra | Firefighting teams bring in a 'fire-robot' at the site where a fire broke out in a showroom in Mumbai's Bandra, which later engulfed the entire mall.
— ANI (@ANI) April 29, 2025
No casualties have been reported. https://t.co/eekRFukyXo pic.twitter.com/7CS5ieONqL
Live Update : वांद्रे पश्चिमेकडील आगीत संपूर्ण माॅल जळून खाक, 6 तास उलटले तरी अद्याप आगीवर नियंत्रण नाही
सहा तास उलटून गेले तरी अद्याप आगीवर नियंत्रण नाही
NDRF टीम माॅलच्या आतमध्ये जाऊन आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे
परिसरात आगीच्या धुराचे मोठे लोट
आगीत संपूर्ण माॅल जळून खाक
Live Update : परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची आज दुसरी सुनावणी
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वत: युक्तिवाद करणार आहेत. पोलीस कोठडीत पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला आहे. यासाठी सोमनाथ यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. गेल्यावेळी न्यायालयाने याचिका दाखल करून घेत सरकारला नोटीस काढली होती.
Live Update : बुद्धगया मंदिर कायदा रद्द करून महाविहार बौद्धांना मिळावे यासाठी मोर्चा
बिहार राज्यातील महाबोधी महाविहार पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात मिळावे या मागणीसाठी देशभर सुरू असलेल्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी सिंधुदुर्गातील बौद्ध बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात जिल्ह्यातील बुद्ध बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दि बुद्धिस्ट फेडरेशन ऑफ सिंधुदुर्ग यांच्या नेतृत्वाखाली ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन बिहारचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात आले.
Live Update : चंद्रभागेचे प्रदूषण रोखण्यासाठी दहा वर्षानंतर पहिले पाऊल..
नमामी चंद्रभागा अभियानांतर्गत चंद्रभागा नदी प्रदूषण रोखण्यासाठीचा पहिला टप्पा म्हणून पंढरपूरच्या भीमा नदीवरील गुरसाळे गावात सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभे करण्यात आले आहेत. १ कोटी ८० लाख रुपये खर्च करून नव्याने सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी उभारलेले केंद्र भीमा अर्थात चंद्रभागा नदीमध्ये मिसळले जाणारे शेतीचे घरगुती व औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी यांच्यावर प्रक्रिया करून पुन्हा नदीत सोडले जाणार आहे. त्यामुळे निश्चितच पंढरपुरात नदी प्रदूषण रोखण्यासाठीचे पाहिले पाऊल उचलले गेल्याचे दिसून येत आहे. नमामी चंद्रभागा अभियान हे गेल्या दहा वर्षापूर्वी सुरू करण्यात आले होते. तब्बल दहा वर्षानंतर नदी प्रदूषण रोखण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.
Live Update : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
या पत्राद्वारे त्यांनी दोन्हीही सभागृहात विशेष अधिवेशन घेण्यात यावं ही विनंती करण्यात आली आहे.
22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे निष्पाप नागरिकांवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याला तोंड देण्यासाठी आपल्या सामूहिक दृढनिश्चयाचे आणि इच्छाशक्तीचे हे एक शक्तिशाली प्रदर्शन असेल.
आम्हाला आशा आहे की अधिवेशन त्यानुसार बोलावले जाईल. ही मागणी या पत्रद्वारे केली आहे
Live Update : गंगापूर धरणातून तब्बल 1000 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडलं
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून आज तब्बल 1000 क्युसेक्स पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात आलं आहे. एक लहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी हे पाणी सोडण्यात आलं आहे. येणं उन्हाळ्यात गोदावरीला पूर आल्याचे दृश्य रामकुंड परिसरात दिसून येत आहे..
Live Update : शिक्षा संपताच 13 बांगलादेशींना मायदेशी पाठवणार - जिल्हा पोलीस अधीक्षक
रत्नागिरी तालुक्यातील निरुळ येथील चिरेखाणीवर आढळून आलेल्या आणि भारतामध्ये बेकायदेशीररीत्या वास्तव करणाऱ्या १३ बांगलादेशींना न्यायालयाने ठोठावलेली सहा महिन्याची शिक्षा 14 मे रोजी संपणार आहे. त्यानंतर या सर्वांची बांग्लादेशात रवानगी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. या तेरा जणांना बांगलादेश-भारताच्या सीमेवरील सुरक्षा यंत्रणेच्या म्हणजेच बीएसएफच्या ताब्यात दिले जाणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितलं आहे.
जिल्हा पोलीस दलाच्या दहशतवादी विरोधी पथकाने 11 नोव्हेंबर 2024 ला मिळालेल्या माहितीवरून पूर्णगड पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून भारतामध्ये अनधिकृत प्रवेश केलेल्या 13 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतलं होतं.या प्रकरणी रत्नागिरी न्यायालयाने या 13 आरोपींना प्रत्येकी 6 महिने साधी कैद तसेच 500 रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती.
Live Update : गडचिरोलीतील जंगलात बालकासह अर्धवट जळालेल्या व्यक्तीचा मृतदेह, परिसरात खळबळ
गडचिरोलीतील आरमोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अरसोडाच्या जंगलात अर्धवट जळालेल्या आणि कुजलेल्या अवस्थेतील व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. या मृतदेहाच्या डाव्या पायाजवळ आणि उजव्या हातात लहान बालकाचाही पंजा आढळला आहे. त्यामुळे माय-लेक किंवा बाप-लेकाला मारून मृतदेहाची जंगलात विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न तर झाला नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. ही व्यक्ती कोण आणि त्यांचा मृतदेह या जंगलात कसा आला, हे शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे आले आहे.
Live Update : भुसावळ शहराचे तापमान 43.5 अंशावर, जनजीवनावर परिणाम
भुसावळ शहराच्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भुसावळ शहरात सोमवारी 43.5° तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उच्चांकी तापमानामुळे जनजीवनावर परिणाम होत असून उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. तर पुढील आठवडाभर उच्चांकी तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Live Update : राहुल गांधी रायबरेली आणि अमेठीच्या दौऱ्यावर
#WATCH | Delhi | Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi arrives at the airport.
— ANI (@ANI) April 29, 2025
He will be on a tour to Raebareli on 29th and Amethi on 30th April. pic.twitter.com/sHFAOo9UOk
Live Update : वांद्रे पश्चिमेकडील मॉलला भीषण आग, क्रोमाच्या शोरूममध्ये अग्नितांडव
#WATCH | Maharashtra | A fire broke out at a showroom in Mumbai. Fire tenders are present at the spot, and operations are underway to douse the fire. No causality has been reported.
— ANI (@ANI) April 29, 2025
More details awaited. pic.twitter.com/nHEssi80eH
Live Update : मालेगावात वक्फ सुधारणा विधेयकास महिलांनी केला विरोध
केंद्र सरकारने लागू केलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाला विरोध करण्यासाठी नाशिकच्या मालेगावात मिल्लत मदरसा येथे आयोजित निषेध सभेला मुस्लीम महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत या कायद्याला जोरदार विरोध केला. वक्फ सुधारणा कायदा मुस्लिमांच्या विरोधात असल्याचा आरोप या सभेत करण्यात आला. मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सचिव मौलाना उमरैन महेफुज रहेमान यांच्या नेतृत्वाखाली मालेगावात तीन दिवसीय आंदोलन छेडण्याचा येत आहे. त्यासाठी ही निषेध सभा घेण्यात आली होती. आज पुरुषांची निषेध सभा तर उद्या बत्ती गुल आंदोलन करण्यात येणार आहे.