आज देशभरात बकरी ईदीचा उत्साह पाहायला मिळत आहे. त्याशिवाय देशभरातील आणि महाराष्ट्रातील राजकीय त्याशिवाय इतरही अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर.
बकरी ईद म्हणजे नेमकं काय?
केंद्रीय नेतृत्व आठवड्याभरात देवेंद्र फडणवीसांबाबत निर्णय घेणार
समता परिषदेच्या बैठकीत वकील मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीबाबत चर्चा
समता परिषदेच्या बैठकीत वकील मंगेश ससाने आणि लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीबाबत चर्चा
मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीदरम्यान या दोघांशीही फोनवरून संपर्क साधला आणि समता परिषद पाठीशी असल्याच आश्वासन दिलं. दोघांनीही तब्येतीची काळजी घ्यावी अशीही भुजबळांनी विनंती केली.
ओबीसी प्रवर्गातून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण नको या आंदोलकांच्या भूमिकेशी आम्ही देखील ठाम आहोत अशीही फोनवरून चर्चा केली. गेल्याा 4 दिवसांपासून वकील मंगेश ससाणे यांच पुण्यात तर लक्ष्मण हाके यांचं वडीगोद्री गावात मागील 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे.
बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी हाती धरला नांगर
बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी हाती धरला नांगर
बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी बीड येथील नियोजन समितीच्या बैठकीला जात असताना रामगड टेकडीच्या पायथ्याशी रस्त्यात गाडी थांबवून त्यांनी शेतात खरिपाच्या पिकाबद्दला शेतकऱ्याची चर्चा केली. यावेळी त्यांनी नांगर हाती धरत पेरणीही केली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत पाणी पातळीत घसरण
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी सर्वाधिक साठवण क्षमता असलेल्या भातसा आणि अप्पर वैतरणा तलावांची पाणीपातळीत घसरण पावसाच्या कमतेने पाणीसाठा कमी
भातसामध्ये शून्य टक्के, तर अप्पर वैतरणात शून्य टक्के, तानसा 22 टक्के, तुलसी 24.46 टक्के, मोडकसागर 15.73 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांत पाणी पातळीत घसरण मुंबईतील सात तलावात एकूण 5.38 टक्के पाणीसाठा आहे, मागील वर्षी याचवेळी मुंबईतील तलावक्षेत्रात 8.48 टक्के धरणसाठा होता.
मुंबईला दररोज दररोज 3 हजार 850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा विविध जलवाहिन्यांद्वारे करण्यात येतो
. मुंबईतील सात तलावांतील उपलब्ध पाणीसाठा आणि अतिरिक्त पाणीसाठ्याचा आढावा या आठवड्याच्या अखेरीस घेण्यात येणार आहे. दरम्यान, असं असलं तरी राज्यात पुन्हा एकदा 19 जूनपासून मान्सून सक्रिय होणार आहे, मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात 21 जूनपासून चांगल्या पावसाची शक्यता आहे
कांजनजुंगा एक्सप्रेस आणि मालगाडी अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
कांजनजुंगा एक्सप्रेस आणि मालगाडी अपघातात आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू
#WATCH | Teams of NDRF and Police are present at Kanchenjunga Express train accident site in Ruidhasa, Darjeeling district of West Bengal; 5 passengers have died in the accident pic.twitter.com/PCtqpoMncU
— ANI (@ANI) June 17, 2024
सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारनं लेखी द्यावं या मागणीवर लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे ठाम आहेत. त्यांची प्रकृती खालावत आहे. यासाठी सरकारचं शिष्टमंडळ लक्ष्मण हाकेंच्या भेटीला दाखल झाले होते. मात्र यामध्ये अतुल सावे, भागवत कराडांना मनधरणी करण्यात अपयश आलं. शिष्टमंडळाने मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्याचं आश्वासन दिलं आहे.
उद्या दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक
उद्या दिल्लीत भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक; फडणवीस, बावनकुळे, दानवेंसह विनोद तावडेंना पाचारण
माथेरानच्या पेब किल्ल्यावर तरुणीचा पाय घसरून खोल दरीत कोसळली, गंभीर दुखापत
माथेरानच्या पेब किल्ल्यावर तरुणीचा पाय घसरून खोल दरीत कोसळली, गंभीर दुखापत
अंधेरी येथे राहणारी 16 वर्षीय रिया साबळे या तरुणीचा माथेरानच्या पेब किल्ल्यावर पाय घसरून जवळपास 50 फूट खोल दरीत कोसळल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. हातापायाला, पाठीला आणि कमरेला जबर दुखापत झालेल्या अवस्थेत सह्याद्री रेस्क्यू टीमचे वैभव नाईक, सुनील ढोले, सुनील कोळी, महेश काळे, चेतन कळंबे यांनी नेरळ पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक शिवाजी ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमोल साळुंखे यांच्यासह बचाव कार्य केले. अधिक उपचारासाठी जखमी तरुणीला कर्जत येथील रायगड हॉस्पिटल येथे हलवण्यात आले आहे.
'रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही', संजय राऊतांचे धक्कादायक आरोप
वनराई पोलिस स्टेशनचे पी आई राजभर हे अचानक रजेवर का गेले?
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 17, 2024
वायकर याना विजयी करणारा मोबाईल फ़ोन पोलिसस्टेशन मधून
बदलण्याचा प्रयत्न झाला.
वायकर यांचा खास माणूस(जो त्यांचा नातेवाईक असल्याचे सांगितले जाते)
retd.पी आई सातारकर हे वनराई पोलीसस्टेशनात चार दिवसा पासून कायडील करत होते?… https://t.co/Dfq9ClfVah
MHT-CET चे निकाल जाहीर , 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल
MHT-CET चे निकाल जाहीर , 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल
अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या राज्य समाईक प्रवेश परीक्षेत (MHT-CET) पीसीबी आणि पीसीएम गटातील 37 विद्यार्थ्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत.
भाजपचे खासदार उदयनराजे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची घेतली भेट
भाजपचे खासदार उदयनराजे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची घेतली भेट
यावेळी सुमारे 1 तास विविध विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाली. शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदारसंघातून उदयनराजे यांना 3000 मतांचा तोटा झाला असून या बाबत ही दोघांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
'राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार असेल तर ते मलाच', कोणाचा दावा?
अजित पवार गटातून केंद्रात कोण होणार मंत्री? 'राष्ट्रवादी अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार असेल तर ते मलाच'
मंत्रिपदाबाबत खुद्द सुनेत्रा पवार यांनीही इच्छा बोलून दाखवली होती. “मला संधी मिळाली तर नक्कीच त्या संधीचे सोने करण्यासाठी मी प्रयत्न करेन”, असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं होतं. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मंत्रिपदाबाबत मोठं भाष्य केलं आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला केंद्रात मंत्रिपद मिळणार असेल तर ते मलाच मिळेल”, असा दावा प्रफुल्ल पटेलांनी केला आहे.
हज यात्रेला गेलेल्या जॉर्डनच्या 14 जणांचा उष्माघातानं मृत्यू
हज यात्रेला गेलेल्या जॉर्डनच्या 14 जणांचा उष्माघातानं मृत्यू
जम्मू काश्मीरच्या रामबान जिल्ह्यात रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी, जगातल्या सर्वात उंच पुलावरुन रेल्वेची चाचणी
जम्मू काश्मीरच्या रामबान जिल्ह्यात रेल्वेची ऐतिहासिक कामगिरी, जगातल्या सर्वात उंच पुलावरुन
रेल्वेची चाचणी
1st trial train between Sangaldan to Reasi
— DD News (@DDNewslive) June 16, 2024
Today marked a significant milestone as an electric engine trial was successfully conducted on the world's tallest rail bridge. The trial run took place between Sangaldan Railway Station and Reasi Railway Station.@RailMinIndia |… pic.twitter.com/jpHKPfF4wC
भुजबळांनी बोलावली आज समता परिषदेची महत्त्वाची बैठक
नाराजीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ सक्रिय झाले असून समता परीषदेची आज महत्वाची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यामुळे भुजबळांचा अजेंडा काय असेल याकडे सर्वांचच विशेष लक्ष आहे.
बकरी ईदीच्या निमित्ताने माहिमच्या दर्ग्यात मुस्लीम बांधवांकडून नमाज अदा
#WATCH | Mumbai, Maharashtra: Devotees offer the Namaz for the Eid Al Adha festival at Mahim's Makhdoom Ali Mahimi mosque pic.twitter.com/OP9xMG5MNL
— ANI (@ANI) June 17, 2024