जाहिरात

Viral video: अश्लील डान्स, महिलेच्या गालावर नोट ही चिटकवली, 'आमदार'साहेबांचा कारनामा आला समोर

महिला गायिकेने गाणं सुरू केलं. त्यावेळी मंचावर जावून आमदार साहेबांनी असा काही डान्स केला की तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

Viral video: अश्लील डान्स, महिलेच्या गालावर नोट ही चिटकवली, 'आमदार'साहेबांचा कारनामा आला समोर

सध्या एक आमदार साहेबांचा व्हिडीओ जोरदार व्हारयल होत आहे. त्या आमदाराचं नाव आहे गोपाल मंडल. गोपाल मंडल हे नेहमीची चर्चेत असतात. ते नितीश कुमारांच्या जनता दल युनायटेडचे आमदार आहेत. मंडल यांनी होळीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात त्यांच्या मतदार संघातील अनेक नेत्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी महिला गायिकेने गाणं सुरू केलं. त्यावेळी मंचावर जावून आमदार साहेबांनी असा काही डान्स केला की तो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

व्हिडीओमध्ये आमदार गोपाळ मंडल हे डान्स करताना दिसत आहे. ते त्या महिला गायकच्या कंबरेत हात टाकताना दिसत आहेत. शिवाय खिशातून पैसे काढून ते तिला देण्या ऐवजी ते तिच्या गालांवर चिटकवत आहेत. यावेळी आमदार साहेब ही गाणं गात आहेत. बरं ते तेवढ्यावर थांबत नाहीत. तर ते चित्रविचित्र हावभाव करताना दिसत आहेत. त्यांचा हाच व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. आमदारांच्या या कृत्यामुळे महिला कलाकारही असुरक्षित समजत असल्याचे दिसते. 

ट्रेंडिंग बातमी - Marathi language: 'का मराठीत बोलू, महाराष्ट्र विकत घेतला का?', ही मुजोरी कधीपर्यंत चालणार?

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने टीकेची झोड उठवली आहे. अशा पद्धतीने डान्स आणि हावभाव करणं म्हणजे नितीश कुमारांच्या नेतृत्वाखालील जनता दलात संस्काराची कमी आहे असं म्हणावं लागेल अशी टीका आरजेडीचे नेते रणविजय साहू असं म्हणाले. जर मंडल यांची ही कृती पक्षाला मान्य नसेल तर त्यांनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई केली पाहीजे अशी मागणी ही त्यांनी यावेळी केली. 

ट्रेंडिंग बातमी - Pune News: पुण्यात नेमकं चाललंय काय? मसाज करण्याच्या बहाण्याने महिलेला टॉप काढायला लावला अन्...

 केवल जनता दल युनायटेडने याबाबत कारवाई करून भागणार नाही. तर याबाबत राष्ट्रवादाची शपथ घेणारे आणि त्यांचे सहकारी भाजपने ही याबाबत बोलणं गरजेचं आहे असं आरजेडीचे आमदार मुकेश यादव म्हणाले. गोपाळ मंडल हे त्यांच्या कृत्यामुळे नेहमीच चर्चेत राहीले आहे. दिल्लीला राजधानी एक्सप्रेसने जात असताना ते कमी कपड्यात रेल्वेत फिरत होते. त्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास झाला होता. त्याची ही मोठी चर्चा झाली होती.