पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत भाजपाच्या वतीनं 'सेवा पंधरवडा' उपक्रम राबवला जाणार आहे. या अंतर्गत राज्यभरात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोदी विकास मॅरेथॉन आणि क्रीडा स्पर्धा यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Live Update : पुण्यात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
पुण्यात ऑनलाइन खरेदीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक
क्रेडिट कार्ड हॅक करत लोकांना गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळी गजाआड
वाघोली पोलिसांची कारवाई
पुणेकरांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या ३ आरोपींना वाघोली पोलिसांकडून अटक
आरोपींकडून १२ लाख रुपयांचे ४५ महागडे मोबाईल पोलिसांनी केले जप्त
ऑनलाइन फसवणूक करत आरोपींनी हे मोबाईल घेतले होते विकत
अस्लम मोफिद खान ,आदिब रिझवान खान,फरहान इब्राहिम ऊनवाला अशी अटक केलेल्या तीन आरोपींची नावे
हे तीनही आरोपी गुजरात राज्याचे असून अनेकांची क्रेडिट कार्ड हॅक करत हे गेल्या अनेक दिवसांपासून करत होते ऑनलाईन खरेदी आणि फसवणूक
क्रेडिट कार्डवरील माहिती हॅक करून मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेटची या आरोपींकडून करण्यात आली होती खरेदी
Live Update : अमरावतीच्या वीरगव्हाण येथील बेपत्ता मुलगा तलावात मृतावस्थेत आढळून आला
ध्रुप विजय राठोड हा ११ वर्षीय मुलगा 14 सप्टेंबर पासून होता बेपत्ता...
पोलिसांच्या मदतीने ध्रुपचा मृतदेह बाहेर काढून मृताचे तिवसा ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आले..
ध्रुपच्या शरीरावर कपडे नाहीत, तो तीन मित्रांसोबत 14 सप्टेंबरला पोहायला गेल्याची माहिती समोर येत आहे...
मात्र मित्रांनी या घटनेविषयी माहिती दिली नाही, यामुळे या घटनेविषयी घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे...
आमदार राजेश वानखडे यांच्या पत्नी आरती यांनी वीरगव्हाण गावात भेट देत कुटुंबीयांचे सांत्वन केले...
वीरगव्हाण येथे शोककळा पसरली असून ग्रुपच्या आई-वडील व नातेवाईकांचा आक्रोश अन् वेदनांचा टाहो पाहायला मिळतात...
Live Update : वर्ध्यात साकारणार राज्यातील पहिला पाण्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प
वर्ध्यात साकारणार राज्यातील पहिला पाण्यावर तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प
आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा धरणावर उभारणार तरंगता 505 मेगावँट क्षमतेचा प्रकल्प
काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र शासनाची महाजेनको व केंद्र शासनाची नवरत्न कम्पनी सतलज जलविद्युत निगम यांना संयुक्त कम्पनी स्थापन करण्यास मिळाली मान्यता
आमदार सुमीत वानखडे यांच्या प्रयत्नांना मोठे यश
Live Update : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात आज मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र केले जाणार वाटप
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात आज मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र केले जाणार वाटप.
हिंगोलीत पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते कुणबी प्रमाणपत्राच वाटप होणार असल्याची प्रशासनाची माहिती..
पालकमंत्री झिरवाळ यांच्या हस्ते 50 कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचं जिल्हा प्रशासनाच उद्दिष्ट.. मात्र पालकमंत्री नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेणार असल्याने पंधरा ते वीस प्रमाणपत्र केले जाणार पालकमंत्र्यांच्या हस्ते वाटप..
हिंगोली सेनगाव कळमनुरी औंढा वसमत या तालुक्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते मराठा समाजाला केले जाणार वाटप..
Live Update : मुंबईत 1 जून ते 16 सप्टेंबर दरम्यान एकूण 5,579.8 मिमी इतक्या पावसाची नोंद
कुलाबा , सांताक्रूझ केंद्र सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद
ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेनंतर सुरू झालेल्या पावसाने सरासरी ओलांडली. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या सरासरीपेक्षा दुप्पट पावसाची नोंद
याआधी ऑगस्ट 2020 मध्ये 1240.1 मिमी पावसाची नोंद झाली
तत्पूर्वी ऑगस्ट 2010 मध्ये 1023.3 मिमी पावसाची नोंद झाली होती
Live Update : वर्धा-पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
चंद्रपूर जिल्ह्यातील वर्धा आणि पैनगंगा नद्यांना आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील शेतकरी उध्वस्त झाले आहेत. वार्षिक सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाल्याने कोरपना, राजुरा आणि गोंडपिपरी तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. कापूस, तूर, सोयाबीन यासह शेतकऱ्यांची उभी पिके वाहून गेल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.
Live Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात भाजपाच्या वतीनं 'सेवा पंधरवडा' उपक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत भाजपाच्या वतीनं 'सेवा पंधरवडा' उपक्रम राबवला जाणार आहे. या अंतर्गत राज्यभरात स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, नेत्र तपासणी, चष्मा वाटप, मोदी विकास मॅरेथॉन आणि क्रीडा स्पर्धा यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन आलं आहे. याशिवाय, कौशल्य विकास विभागाच्या पुढाकारानं राज्यातील 419 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) हजारो विद्यार्थी 750 गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवणार आहेत.
Live Update : पाचोरा तालुक्यात 12 गावांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे मोठे नुकसान
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात दोन दिवसात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शिंदाड, सातगाव डोंगरी, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वडगाव, वेरुळी, पिंपरी, गहुले, वाडीशेवाळे,खडकदेवळा या 12 गावांमध्ये मोठे नुकसान झाले असून प्राथमिक अहवालानुसार नुकसानग्रस्त 12 गावांमध्ये 1 हजार 879 पशुधनाची जीवित हानी झाली असून यामध्ये गाय, म्हैस, बकऱ्या, कोंबड्या यांचा समावेश आहे. तर पुराच्या पाण्यामुळे 56 घरांचे पूर्णपणे नुकसान झाले असून 273 घरांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुराचे पाणी गावांमध्ये शिरून 361 कुटुंबांचे संसार उपयोगी साहित्याचे देखील नुकसान झाले आहे. या नुकसानीचा प्राथमिक अहवाल हा विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.