
Solicitor General Tushar Mehta on Udhayanidhi Stalin : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांना मोठा दिलासा दिला. सनातन धर्माबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल उदयनिधी यांच्याविरुद्ध परवानगीशिवाय कोणताही नवीन FIR दाखल केला जाऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. भारताचे मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठाने उदयनिधी स्टॅलिन यांना हा दिलासा दिला. तसेच सर्वोच्च न्यायालयाने सनातन धर्मावरील कथित टिप्पणी प्रकरणात उदयनिधी स्टॅलिन यांना सक्तीच्या कारवाईपासून संरक्षण देणाऱ्या अंतरिम आदेशाचा कालावधीही वाढवला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
सॉलिसिटर जनरल तुषार मेहतांचा युक्तिवाद
सुनावणीला महाराष्ट्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता उपस्थित होते. जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला म्हटलं की,"सनातन धर्म निर्मूलन' परिषदेत उपमुख्यमंत्र्यांनी मलेरिया, कोरोना, डेंग्यू इत्यादींप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन केले पाहिजे असं वक्तव्य केले होते. जर इतर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इस्लाम धर्म नष्ट करण्याबद्दल बोलले असते तर काय झाले असते? याची कल्पना करा. ज्या समुदायाचे उच्चाटन करण्याचा प्रयत्न केला जातो तो हिंसक प्रतिक्रिया देत नाही किंवा हिंसाचाराची धमकी देत नाही म्हणून, त्याला सतत लक्ष्य केले पाहिजे का?. उदयनिधी स्टॅलिन यांनी दिलेले विधान आक्षेपार्ह आहे."
(नक्की वाचा- Exclusive : संतोष देशमुखांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर, मन सून्न करणारी माहिती समोर)
खंडपीठाने मेहता यांना सांगितले की, "आम्ही या प्रकरणाच्या गुणवत्तेत जाणार नाही. प्रश्न फक्त एवढाच आहे की ते प्रकरण एखाद्या ठिकाणी हलवावे का?” मेहता म्हणाले की, हिंदूंनी प्रतिक्रिया दिली नाही म्हणून, एखाद्या नेत्याला असे म्हणण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. सरन्यायाधीश म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने कोणत्याही शब्दांवर भाष्य करावे असे आम्हाला आवडणार नाही, त्याचा खटल्यावर परिणाम होतो."
(नक्की वाचा - Political News : फडणवीस सरकारचा आणखी एक निर्णय, एकनाथ शिंदेंना धक्का)
काय आहे प्रकरण?
द्रमुक नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सप्टेंबर 2023 मध्ये चेन्नईमध्ये 'सनातन निर्मूलन' या विषयावर आयोजित कार्यक्रमात बोलताना सनातन धर्मावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. उदयनिथी यांनी सनातन धर्माची तुलना कोरोना व्हायरस, मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. या साथीच्या आजारांप्रमाणे सनातन धर्माचे उच्चाटन केले पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. उदयनिधी यांच्या या वक्तव्यानंतर, महाराष्ट्र, बिहार, जम्मू आणि कर्नाटकसह देशातील अनेक भागात त्यांच्याविरुद्ध अनेक एफआयआर दाखल करण्यात आले. स्टॅलिन यांनी अनेक राज्यांमध्ये त्यांच्याविरुद्ध प्रलंबित असलेल्या एफआयआर एकत्रित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world