
Weight Loss News: लठ्ठपणामुळे केवळ शरीराचे बेढब होत नाही तर शारीरिक समस्या देखील वाढतात. उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार यासारख्या समस्या वाढण्याचा धोका निर्माण होतो. याव्यतिरिक्त लठ्ठपणामुळे व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावरही परिणाम होतात. बसताना-उठताना समस्या होणे, शरीराचे पोश्चर बिघडणे, विविध अवयव दुखणे यासह सुटलेल्या पोटामुळे आवडीचा पोशाखही परिधान करणे शक्य होत नाही. वजन वाढीच्या समस्येमुळे त्रस्त असलेले लोक वेटलॉससाठी कित्येक उपाय करतात. बाबा रामदेव यांनी सांगितलेला रामबाण उपाय जाणून घेऊया... वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन करावे आणि कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या, याबाबतची माहिती बाबा रामदेव यांनी व्हिडीओद्वारे सांगितलीय.
कोणत्या पद्धत नियमित वजन कमी करू शकतो?| How To Lose Weight Daily
बाबा रामदेव यांनी सांगितले की, जंकफूड आणि जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यासही वजन वाढू लागते. याऐवजी डाएटमध्ये फळभाज्या, फळांचा समावेश करावा. दुसरीकडे दरदिवशी वजन कमी करणे शक्य आहे, असेही बाबा रामदेव यांनी म्हटलंय. योग, आयुर्वेद आणि खाण्यापिण्याच्या सवयींची योग्य काळजी घेतल्यास वजन कमी होऊ शकते. डाएटमध्ये सॅलेड, खरबूज आणि कलिगंडचा समावेश करावा. यासह उकडलेल्या भाज्यांचेही सेवन करावे. असा डाएट फॉलो केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. खाण्यापिण्याव्यतिरिक्त नियमित योग किंवा व्यायाम केल्यास वजन घटण्यास मदत मिळते.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
(नक्की वाचा: Weight Loss Diet: पटापट वजन कमी करण्यासाठी या पिठाचे करा सेवन, डाएटिशियनने सांगितली योग्य पद्धत)
हा उपायही ठरू शकतो फायदेशीर
नियमित दुधीचा रस प्यायल्यासही वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. दुधीमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, जे पचनप्रक्रियेसाठी फायदेशीर असते. दुधीच्या रसामध्ये कॅलरीचे प्रमाण देखील कमी असते. या ज्युसमुळे शरीर हायड्रेटही राहते आणि शरीरामध्ये फायबरची कमतरता निर्माण होत नाही. बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठीही दुधीचा रस पिऊ शकता. या रसामुळे शरीर डिटॉक्स होते आणि त्वचेवर नैसर्गिक तेज येते. त्वचा चमकदार आणि मऊ सुद्धा होते.
(नक्की वाचा: Weight Loss Tips: या पिठामुळे 20 पट जलदगतीने फॅट्स होतील बर्न, जाणून घ्या डॉक्टरांनी सांगितलेला उपाय)
अश्वगंधा
अश्वगंधा (Ashwagandha) आयुर्वेदिक औषध आहे. अश्वगंधाची पाने चावून खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. या पानांमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. अश्वगंधामुळे तणाव कमी होण्यापासून ते शरीराला ऊर्जा मिळेपर्यंत असंख्य लाभ मिळतात.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world